Health Care : एका बाजूला मार्चचा महिना संपणार असून उन्हाच्या झळा बसण्यास सुरूवात होणार आहे. या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. बदलत्या ऋतूमुळे बहुतांशजण आजारी पडतात. तुम्हालाही बदलत्या ऋतूमुळे त्रास होते तर आजच तुमच्या काही सवयाींमध्ये बदल केला पाहिजे.
हाइड्रेट राहा
हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, बदलत्या ऋतूत तुम्ही हाइड्रेट राहणे अत्यंत गरजेचे असते. दिवसभर पुरेशा पाण्याचे सेवन करावे. जेणेकरुन शरिराला उर्जा मिळेल. बदलत्या ऋतूमुळे आपली पचक्रियेचा वेग मंदावला जातो. अशातच कमी पाणी प्यायल्यास पचनक्रियेला नुकसान होऊ शकते. यामुळे दिवसभरात कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी प्या.
हेल्दी डाएट
हेल्दी राहण्यासाठी तुम्ही डाएट फॉलो केले पाहिजे. तुमच्या जेवणात प्रोटीन्स, व्हिटॅमिन, मिनिरल्स, कॅल्शिअम योग्य प्रमाणात असावेत. याशिवाय नट्स, फ्रुट्सचेही सेवन करावे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल.
मेडिटेशन
बदलत्या ऋतूचा आपल्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होते. काहीवेळेस बदलत्या ऋतूमुळे आपला स्वभाव चिडचिडा होण्यासह एंक्झायटीची समस्यही निर्माण होते. यावेळी स्वत:ला रिलॅक्स ठेवण्यासाठी मेडिटेशन, योगाभ्यास करण्याची गरज आहे. यामुळे तणावाचा स्तर कमी होण्यास मदत मिळेल. मानसिक आरोग्य सुधारले जाईल.
एक्सरसाइज
दररोज थोडावेळ एक्सरसाइज करणे अत्यंत गरजेचे आहे. झोप पुर्ण न झाल्याने एक्सरसाइज करण्यास वेळ मिळत नाही आणि याचा आरोग्यावर परिणाम होतो. याशिवाय आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवू शकतात. एक्सरसाइज केल्याने ब्लड सर्कुलेशन योग्य राहते. याशिवाय संपूर्ण आरोग्यही फिट राहण्यास मदत होते. (Health Care)
झोप
बदलत्या ऋतूचा झोपेवरही परिणाम होते. बिघडलेल्या झोपेच्या पॅटर्नमुळे तुम्हाला काही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशातच कमीत कमी आठ तासांची पुरेशी झोप घ्यावी.