Health Care Tips : वाढत्या वयासह आपले सौंदर्य हळूहळू कमी होऊ लागते. अशातच वयाच्या चाळीशीनंतर व्यक्तीचे सौंदर्य कमी होऊ लागते. या वयात प्रत्येकजण प्रौढ दिसतो. भले ही महिलांना त्यांचे वय विचारल्यानंतर वाईट वाटते. पण चेहऱ्यावरुन त्यांचे वय कळून येते. वाढत्या वयासह महिलांनी आपल्या हेल्थकडे लक्ष द्यावे. याशिवाय वजन देखील वाढले जाते. यामुळे त्या वयापेक्षा अधिक वृद्ध दिसू लागतात.
वयाच्या चाळीशीत येण्याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही तुमची पर्सनालिटी मेंटन करणे आणि नटणे सोडून द्यावे. या वयात स्वत:ला फिट आणि स्टायलिश दिसण्यासाठी योग्य डाएटसोबत काही टिप्स तुम्ही फॉलो करू शकता. जाणून घेऊया याबद्दल अधिक….
योग्य मेकअप प्रोडक्ट्सचा वापर
मेकअप केल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात. पण ब्युटी प्रोडक्ट्सचा अत्याधिक वापर केल्याने त्वचेला नुकसान पोहोचू शकते. अशातच वयाच्या चाळीशीनंतर ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर अत्याधिक करू नये. अशा प्रोडक्ट्सचा वापर करावा ज्यामध्ये मॉश्चराइजिंग गुण असतात. याशिवाय मेकअपसाठी लिक्विड प्रोडक्ट्सचा वापर करावा.
योग्य इनरवेअरची निवड
प्रत्येक वयातील महिलांनी योग्य इनरवेअरची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण यामुळे तुमची फिगर मेंटन राहण्यास मदत होते. याशिवाय वयाच्या चाळीशीनंतर योग्य फिटिंग असणारे इनरवेअर निवडावी.
व्यायामासाठी वेळ ठरवा
महिलांनी घरातील कामांमधून स्वत:साठी वेळ काढावा. जेणेकरुन तुम्ही हेल्दी आणि फिट राहण्यास मदत होईल.
नाइट केअर रुटीन
बहुतांश महिला अशी चूक करतात की, संपूर्ण दिवस त्वचेची काळजी घेतात. पण रात्रीच्या वेळेस त्वचेची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतात. खरंतर रात्रीच्या वेळेस स्किन सेल्स रीजेनरेट होातत. तुम्ही वयाच्या चाळीशीत असल्यास रात्री झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून त्यावर मॉइश्चराइजर लावण्यास विसरू नका. (Health Care Tips)
अधिकाधिक लिक्विड फूडचे सेवन करा
वाढते वय लपवण्यासाठी केमिकल युक्त ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करण्याऐवजी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये अधिकाधिक लिक्विड फूडचा वापर करावा. शरिरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास त्वचेवर फाइन लाइंस दिसून येतात. दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे. याशिवाय फळांचा ज्यूस, भाज्यांचे सूप तुम्ही पिऊ शकता.