Home » मासे खाताना चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

मासे खाताना चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

मासे खाताना त्यासोबत डेअरी प्रोडक्ट्स, आंबट फळं अथवा तळलेले पदार्थ खाऊ नये असा सल्ला तज्ञांकडून दिला जातो. पुढील काही पदार्थ जे मासे खाताना टाळले पाहिजेत. याचबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

by Team Gajawaja
0 comment
Health Care
Share

तुम्ही नॉन-व्हेजिटेरियन असल्यास मासे खायला नक्कीच आवडत असेल. माश्यांच्या माध्यमातून शरीराला लीन प्रोटीन, व्हिटॅमिन डी, ओमेगा-3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात मिळते. शरीराला पुरेशा प्रमाणात हे प्रोटीन्स मिळाल्यास एकूणच आरोग्यासह रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळू शकते. पण मासे खाताना त्यासोबत काही पदार्थ खाणे आवर्जुन टाळले पाहिजे. अन्यथा आरोग्याचे गंभीर नुकसान होऊ शकते. (Health Care)

मासे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण काही पदार्थांसोबत ते खाल्ल्याने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात. पुढील पदार्थ हे मासे खाताना टाळले पाहिजेत.

दूधाचे पदार्थ
मासे खाताना दूध, दही अथवा दूधाचे कोणतेही पदार्थ खाऊ नयेत. यामुळे पचनासंबंधित समस्या उद्भवू शकते. दूधाचे पदार्थ आणि मासे यांचे कॉम्बिनेशन हे पचनास अडथळा आणू शकतात.

आंबट फळं
मासे आणि आंबट फळं खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आंबट फळांमध्ये अॅसिड असते जे मासे खाताना त्यामधील प्रोटीन सोबत शरीरात विरूद्ध काम करते. याच कारणास्तव आरोग्याला नुकसान पोहचू शकते.

प्रोसेस्ड आणि तळलेले पदार्थ
अधिक प्रोसेस्ड आणि तळलेले पदार्थ मासे खाताना टाळावेत. यामुळे माशांमधून मिळणारी पोषण तत्त्व शरीराला मिळत नाहीत. तळलेल्या पदार्थांमध्ये ट्रांस वसाचा स्तर अधिक असतो, जो हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. (Health Care)

Debunking the Myth: Is Drinking Milk After Eating Fish a Health Hazard? - Healthwire

बीन्स आणि शेंगदाणे
बीन्स आणि शेंगदाणे चुकूनही मासे खाताना खाऊ नये. बीन्समध्ये उच्च प्रमाणात रॅफिनोज नावाची कॉम्पेक्स साखर असते, जी शरीराला पचण्यास कठीण जाते. बीन्स मध्ये फायबर देखील भरपूर प्रमाणात असतात. पण फायबरचे अधिक सेवन केल्यास पोटात गॅसची समस्या उद्भवू शकते. बीन्स आणि शेंगदाणे मासे खाताना खाल्ले तर पोट फुगण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.

स्टार्चयुक्त पदार्थ
मासे हे बटाटे किंवा पास्ता सारख्या स्टार्चयुक्त पदार्थांसोबत कधीच खाऊ नयेत. यामुळे शरीरात अति प्रमाणात कॅलरीज आणि कार्बोहाइड्रेट जमा होतो आणि त्याचा पाचनक्रियेवर परिणाम होतो.

मसालेदार पदार्थ
मसालेदार पदार्थांसोबत मासे खाणे टाळावे.यामुळे पोटात गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि ब्लोटिंगची समस्या उद्भवू शकते.

(टीप : या लेखातील माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)


हेही वाचा- मध गरम करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.