Health Care in Summer : उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या आरोग्याची दुप्पट काळजी घेणे अत्यावश्यक असते. खासकरुन अशा व्यक्तींनी जे फिल्ड वर्क करतात. कारण त्यांना दिवसभर ऑफिसबाहेर राहून काम करावे लागते. अशातच सनस्ट्रोकचा धोका निर्माण होऊ शकतो. याशिवाय कडाक्याच्या उन्हात सातत्याने फिरत राहिल्याने उलटी होणे, चक्कर येणे आणि तापसारख्या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. यामुळे आपल्या डाएटमध्ये काही गोष्टींचा समावेश करणे अत्यावश्यक आहे.
काहीजणांना उन्हाळ्यात कोल्डड्रिंक किंवा आयस्क्रिम खायला फार आवडते. पण यामुळेही आरोग्याचे नुकसान होऊ शकते. अशातच डाएटमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
कलिंगड
उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगडचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कलिंगडमध्ये अत्याधिक प्रमाणात पाण्याचे प्रमाण असल्याने शरिराला भासणारी पाण्याची गरज पुरवली जाऊ शकते. याशिवाय तुम्ही डिहाइड्रेशनच्या समस्येपासून दूर राहू शकता. कलिंगडचे सेवन सकाळच्या नाश्त्यावेळी करू शकता.
काकडी
काकडीचे सेवन सॅलडच्या माध्यमातून करू शकता. यामुळे शरिर आतमधून थंड राहण्यास मदत होते. यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात काकडीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय काकडीमध्ये काही पोषण तत्त्वे असतात. जे शरिरासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. तुम्ही काकडीचा ज्यूसही पिऊ शकता.
दही किंवा छास
उन्हाळ्याच्या दिवसात दही किंवा छासचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. याचे सेवन केल्याने शरिराला थंडावा मिळतो. याशिवाय दह्यात प्रोबायोटिक्स असतात. जे पचनासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. तुम्ही घरुन छास किंवा दही आपल्यासोबत घेऊन ऑफिसला जाऊ शकता. (Health Care in Summer)
लिंबू पाणी
उन्हाळ्याच्या दिवसात लिंबू पाण्याचे सेवन करणे अत्यावश्यक असते. यामुळे पचनासंबंधित समस्या जसे की, अपचन आणि गॅसच्या समस्येपासून दूर राहू शकता. शरिराला आतमधून थंडावा मिळण्यासाठी लिंबू पाणी बेस्ट पर्याय आहे. यामुळे तुम्ही फिल्ड वर्क करत असाल तर लिंबू पाण्याचे सेवन नक्की करा. पण दररोज लिंबू पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकते. यामुळे दररोज वेगवेगश्या गोष्टींचे सेवन करावे.