Home » बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर ठेवतील ही फायबरयुक्त फळ

बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर ठेवतील ही फायबरयुक्त फळ

पोटासंबंधित समस्या बहुतांशजणांना उद्भवल्याचे आपण पाहतो. यामागील मोठे कारण म्हणजे सध्याची बिघडलेली लाइफस्टाइल आण जंक फूडचे अत्याधिक प्रमाणात सेवन करणे.

by Team Gajawaja
0 comment
Health Care
Share

Health Care : पोटासंबंधित समस्या बहुतांशजणांना उद्भवल्याचे आपण पाहतो. यामागील मोठे कारण म्हणजे सध्याची बिघडलेली लाइफस्टाइल आण जंक फूडचे अत्याधिक प्रमाणात सेवन करणे. काहीजण घाईघाईत फूड खातात आणि ते शरिरात व्यवस्थितीत पचले जात नाहीत. यामुळेच बद्धकोष्ठतेसारखी समस्या उद्भवू शकते. जर वेळीच बद्धकोष्ठतेच्या समस्येकडे लक्ष न दिल्यास मोठी समस्या होऊ शकते. याशिवाय आधीच बद्धकोष्ठतेच्या समस्येचा सामना करत असल्यास खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे. आहारात फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. जाणून घेऊया अशी कोणती फळे आहेत ज्यामध्ये फायबरचे प्रमाण उत्तम असते. ही फळे डाएटमध्ये खाल्ल्याने कशाप्रकारे बद्धकोष्ठतेच्या गंभीर समस्येपासून दूर राहू शकता.

सफरचंद
सफरचंद असे एक फल आहे ज्यामुळे पोटासंबंधित समस्येपासून तुम्ही दूर राहू शकता. याचे दररोज सेवन केल्याने काही आजार दूर राहू शकतात. या फळामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दिलासा मिळतो.

किवी
किवीमध्ये फायबर भरपूर असते. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. किवी शरिराला आतमधून थंड ठेवण्याचे काम करते. यामुळे पोटातील उष्णता कमी होऊन पोटासंबंधित समस्या दूर राहू शकतात. पोटासंबंधित समस्या जसे की, गॅस, बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटी झाली असल्यास किवीचे सेवन करू शकता.

संत्र
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि मिनिरल्स असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेसारख्या समस्येपासून दिलासा मिळतो. यामुळे तुम्ही दररोज संत्र्याचे देखील सेवन करू शकता.

पपई
पपई पोटासाठी फायदेशीर मानली जाते. पपईमुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होऊ शकते. जर तुम्ही दररोज पपईचे सकाळी उठल्यानंतर सेवन केल्यास त्याचा अधिक फायदा शरिराला होऊ शकतो.

प्लम
प्लम फळामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने पचनक्रिया सुधारली जाते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास प्लमचे सेवन करू शकता. याशिवाय प्लमच्या सेवनाने चेहऱ्यावर ग्लो देखील येतो. (Health Care)

पेर
पेरमध्ये फ्रुक्टोज आणि सोर्बिटोल सारखे गुणधर्म असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. याशिवाय पेरमध्ये फायबर असते, जे पोटासंबंधित समस्या दूर करते. पेरच्या सेवनाने पोटात थंडावा निर्माण होतो आणि पचनक्रियाही सुधारली जाते.


आणखी वाचा :
जाणून घ्या कोथिंबीरीचे सेवनाचे चमत्कारिक फायदे
आरोग्यासाठी कोणते मीठ चांगले?

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.