Health Care Advice : प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी ब्रेकची गरज भासते. तुम्ही बहुतांशवेळा ऐकले असेल की, ब्रेक घेऊन लोक मोठ्या सुट्टीसाठी जातात. अशातच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुतील खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने आयपीएल 2024 पासून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. ग्लेन मॅक्सवेल पुन्हा कधी खेळण्यास परत येणार याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. यावेळी मॅक्सवेल याने मानसिक आणि शारिरीक रुपात स्वत:ला आराम देण्यासाठी ब्रेक घेतला आहे. जाणून घेऊया मानसिक आणि फिजिकल ब्रेक म्हणजे नक्की काय? का घेतला जातो याबद्दल सविस्तर…..
मानसिक आरोग्यासाठी ब्रेकची गरज
अत्याधिक कामाचा किंवा अन्य गोष्टींचा ताण व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर होतो. पण नोकरीच्या ठिकाणी बॉसने सुट्टी न दिल्यास काहींना त्याचे टेंन्शन येते. याचा परिणामही आरोग्यावर होते. अशातच सातत्याने काम केल्यानंतरही ब्रेक घेणे मानसिक आरोग्य स्थिर राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. नोकरी असो किंवा खेळ अथवा कोणतेही क्षेत्र कामातून स्वत:साठी ब्रेक घेणे अत्यावश्यक आहे.
फिजिकल ब्रेक
जगभरातील खेळाडू दररोज आपल्या खेळाचा सराव करतात. यावेळी काहीवेळेस ते जखमीही होतात. अथवा त्यांचा फिटनेसचा स्तर कधीकधी कमी होते. अशा स्थितीत खेळाडून फिजिकल ब्रेक घेतात. अथवा काही खेळाडू दीर्घकाळ सातत्याने खेळत राहिल्याने थकतात. यावेळीही ते फिजिकल ब्रेक घेतात. सर्व खेळाच्या क्षेत्रांमधील खेळाडू फिजिकल ब्रेक घेतात. कारण फिटनेसासाठी फिजिकल ब्रेक घेणे आवश्यक असते. (Health Care Advice)
क्रिकेटमध्ये ब्रेक
मॅक्सवेल पहिलाच खेळाडू नाहीये ज्याने क्रिकेटच्या सामन्यांमधून ब्रेक घेतला आहे. याआधीही इशान किशनने क्रिकेटमधून काही वेळासाठी ब्रेक घेतला होता. याव्यतिरिक्त विराट कोहलीने वर्ष 2022 मध्ये एशिया कपच्या आधी महिन्याभरासाठी खेळातून ब्रेक घेतला होत. याबद्दल विराट कोहलीने आपला अनुभवही शेअर केला होता. एका मुलाखतीत कोहलीने म्हटले होते की, मानसिक रुपात कमजोर झाल्याने ब्रेकची गरज होती. तरीही मी खूप मेहनत करत होते. पण एका महिन्याच्या ब्रेकमुळे पुन्हा त्याच जोमात उभे राहण्याची ताकदही मिळाली.
(अशाच आरोग्यासंबंधितच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)
आणखी वाचा :