Home » फ्रोजन फूड खराब झाल्याचे हे आहेत संकेत

फ्रोजन फूड खराब झाल्याचे हे आहेत संकेत

बहुतांशवेळा आपण मार्केटमधून फ्रोजन फूड खरेदी करता. जेणेकरुन झटपट एखादा पदार्थ तयार होईल. पण फ्रोजन फूडही खराब होऊ शकते. याचे संकेत कोणते याबद्दल जाणून घेऊया..

by Team Gajawaja
0 comment
Health care Advice
Share

Health Care Advice : एखादी वस्तू दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यावर काही प्रक्रिया केल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे फ्रोजन फूड आहे. यासाठी डीप फ्रिजरचा वापर केला जातो. जेणेकरुन फ्रोजन फूड दीर्घकाळ टिकून राहिल आणि हवे तेव्हा वापरता येईल. पण फ्रोजन फूड्सची चव एका काळानंतर बदलली जाते. खरंतर, फ्रोजन फूडही खराब होते. अशातच फ्रोजन फूड खराब झाल्याचे कोणते संकेत आहेत याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…

फ्रोजन फूडचे पाकिट उघडून पाहा
काहीवेळेस फ्रोजन फूड पाहूनच कळते की, ते खराब झाले आहे. फूड खराब होण्याआधी त्याच्या रंगामध्ये बदल होते. याशिवाय फूडवर काहीवेळेस डागही पडले जातात. ज्या भाज्यांचा रंग फिकट झाला आहे अथवा चिकट झाल्या आहेत अशा भाज्या घेणे टाळा. त्या भाज्या खराब झाल्याचे संकेत आहेत.

5 Mitos Seputar Frozen Food yang Perlu Anda Ketahui - KlikDokter

वास घेऊन पाहा
ताजे फ्रोजन फूड्सचा वास फ्रेश येतो. तर खराब झालेल्या फूडला बुरशी आल्यासारखा अथवा कुबट वास येऊ शकतो. कोणत्याही प्रकारचे मांस खराब झाले असल्यास त्यालाही एक विचित्र वास येऊ लागतो. असे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. अन्यथा आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात.

फ्रोजन फूड चिकट झाल्यास
फ्रोजन फूड पाकिटातून बाहेर काढल्यानंतर चिकट अथवा नरम झाले असल्यास ते खराब झाल्याचे संकेत आहेत. यामुळे खराब फ्रोजन फूड खाण्यापासून दूर रहावे. यामुळे गट हेल्थला नुकसान पोहोचू शकते. (Health Care Advice)

फ्रोजन फूडच्या पाकिटातील बर्फावरुन कळेल
फ्रोजन फूडच्या पॅकेजिंगच्या आतमध्ये जमा होणाऱ्या बर्फावरुनही कळते ही ते खराब झाले आहे की नाही. बर्फ सातत्याने विरघळत असल्यास पदार्थ अधिक चिकट होते आणि खराब होण्यास सुरुवात होते. अशातच त्यामधून एक वासही येऊ लागतो.


आणखी वाचा :
शरिरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर होईल कमी, प्या हे होममेड ड्रिंक
ल्युकेरियाच्या समस्येसाठी ‘हे’ आहेत रामबाण उपाय

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.