Home » Rudraksh : रुद्राक्षचे पाणी पिणे आरोग्यसाठी आहे लाभदायक

Rudraksh : रुद्राक्षचे पाणी पिणे आरोग्यसाठी आहे लाभदायक

by Jyotsna Kulkarni
0 comment
Rudraksh
Share

रुद्राक्ष…सगळ्यांनाच याबद्दल माहिती असेल. रुद्राक्षाला हिंदू धर्मामध्ये मोठे महत्व आहे. भगवान शिव आणि रुद्राक्षाचा खूपच जवळचा संबंध आहे. रुद्राक्ष हे शिवाच्या अश्रूतून निर्माण झाल्याचे मानले जाते. आपल्या पुराणांमध्ये सांगितले आहे की, भगवान शंकरांनी कठोर तपश्चर्येनंतर जेव्हा त्यांचे डोळे उघडले, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पडलेल्या अश्रूंमधून रुद्राक्षाची निर्मिती झाली. तसे पाहिले तर रुद्राक्ष हे एक नैसर्गिक फळ आहे, जे रुद्राक्षाच्या झाडावर उगवते आणि जपमाळेत वापरले जाते. (Rudraksh)

रुद्राक्ष धारण केल्याने अनेक फायदे होतात. रुद्राक्षाला देवाचे रूप देखील मानले जाते. शिवाय आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील रुद्राक्षाला मोठे महत्व आहे. आयुर्वेद शास्त्रामध्ये रुद्राक्षाचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. रुद्राक्षात नैसर्गिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक शक्ती असते, जी शरीरावर आणि मनावर सकारात्मक परिणाम करते. रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक शांती, आत्मविश्वास, एकाग्रता आणि सकारात्मकता वाढते. रुद्राक्षाचे पाणी प्यायल्याने आपल्या आरोग्याला देखील अनेक लाभ होतात. आरोग्याच्या दृष्टीने देखील रुद्राक्ष खूपच उपयुक्त आहे. (Marathi News)

रुद्राक्ष पाणी पिण्याचे फायदे
तणाव पासून मुक्ती
जर तुम्ही येथे नियमितपणे रुद्राक्षाचे पाणी प्यायले तर तुम्हाला तणाव आणि चिंता या समस्यांपासून आराम मिळतो. या विशेष प्रकारचे पाणी तुमच्या आतील अस्वस्थता आणि मानसिक ताण शांत करण्याचे काम करते. या पाण्यामुळे झोप चांगली लागते, चिडचिड कमी होते, आणि मनावरचा भार हलका होतो. (Top Stories)

चांगली झोप येते
रुद्राक्षाचे पाणी प्यायल्याने चांगली झोप येते. जर तुमची झोप चांगली असेल तर इतर आरोग्य समस्या तुम्हाला त्रास देणार नाहीत.

रोग प्रतिकारक शक्ती वाढते
रुद्राक्षाचं पाणी शरीरात नैसर्गिक शक्ती निर्माण करते. यामधील ऊर्जा देणारे गुण इम्यून सिस्टमला मजबूत करतात. त्यामुळे संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळते. खासकरून लहान मुलांना आणि वृद्धांना हे पाणी फार उपयोगी ठरू शकतं.

Rudraksh

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
रुद्राक्षाचे पाणी पिणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याशिवाय, ते हृदयाचे ठोके आणि रक्तदाब सुधारण्याचे काम करते.

ब्लड प्रेशर कंट्रोल होते
आजच्या काळात अनेकांना ​हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे. सतत औषधांमुळे देखील अनेक दुष्परिणाम शरीरावर दिसतात. अशावेळेस काही नैसर्गिक पर्याय शोधणे देखील आवश्यक असते. रुद्राक्षाचं पाणी शरीरात रक्तप्रवाह सुरळीत ठेवतं. त्यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो आणि बीपी नियंत्रित राहतं. उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी जर दररोज सकाळी उपाशीपोटी हे पाणी पिण्यास सुरुवात केली तर काही दिवसांतच बीपी नियंत्रणात येईल. (Top Marathi Headline)

एकाग्रता वाढते
रुद्राक्षाचे पाणी पिल्याने लक्ष केंद्रित आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. रुद्राक्ष आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

==========

हे देखील वाचा : Health : मनात सतत नकारात्मक विचार येताय मग करा ‘हे’ उपाय

==========

बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती वाढवणे
४ मुखी रुद्राक्षाचे पाणी प्यायल्याने स्मरणशक्ती सुधारते आणि निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होते. शिवाय हे पाणी प्यायल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि आत्मविश्वास वाढतो.

रुद्राक्षाचे पाणी कसे बनवावे?

रात्री झोपण्यापूर्वी एका तांब्याच्या किंवा स्टीलच्या स्वच्छ भांड्यात पाणी भरून घ्या. त्यात २ ते ३ शुद्ध आणि चांगल्या गुणवत्तेचे रुद्राक्ष टाका. हे भांडे रात्रभर झाकून ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून प्या. हे पाणी उपाशीपोटी प्यायल्यास अधिक लाभ होतो. मात्र रुद्राक्ष पवित्र मानला जातो, त्यामुळे यासाठी वापरलेले रुद्राक्ष वापरू नयेत. दर २–३ महिन्यांनी हे रुद्राक्ष बदलावा. (Latest Marathi News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.