Health Advice : आजकाल बहुतांश लोक चाऊमीन, मॅक्रोनी आणि पास्ता खाणे पसंत करतात. याची टेस्ट उत्तम असते आणि अगदी झटपट या रेसिपी तयार करता येतात. परंतु फास्ट फूडचे सेवन केल्याने आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. अशातच तुम्ही देखील घरच्याघरी पास्ता तयार करता का? यावेळी तुम्ही कोणत्या अज्ञातपणे चूका करणे टाळले पाहिजे याबद्दल जाणून घेऊया अधिक. जेणेकरुन आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होणार नाहीत.
खाण्याचे प्रमाण
पास्ता हा गहू किंवा ड्यूरम गव्हापासून तयार केला जातो. या दोन्हीमध्ये समप्रमाणात कॅलरीज असतात. मात्र फायबर या दोघांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणाात असतात. यामुळे पास्ताचे सेवन करताना त्याच्या प्रमाणाकडे जरुर लक्ष द्या.
सॉसचा वापर
पास्ता चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये काही सॉसचा वापर केला जातो. आजकाल व्हाइट सॉस खाणे बहुतांशजणांना आवडते. पण आहार तज्ज्ञ म्हणतात की, रेड सॉस पास्ता हा व्हाइट आणि मिक्स सॉलच्या तुलनेत उत्तम असतो. कारण यामध्ये पनीर आणि बटरचा वापर अधिक वापर केलेला नसतो.

Health Advice
तेलाची गुणवत्ता
पास्ता तयार करताना आपण किती प्रमाणात तेलाचा वापर करतो याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो. अशातच पास्ता तयार करताना उत्तम गुणवत्तेचे सामान आणि कमी तेलाचा वापर केला पाहिजे. (Health Advice)
भाज्यांचा समावेश
हेल्दी पास्ता तयार करण्यासाठी त्यामध्ये भाज्यांचा समावेश करावा. भाज्या मोठ्या आकारात कापून घ्याव्यात. पण पास्तामध्ये भाज्या अधिक प्रमाणात शिजवू नये.
पास्ता पाच-सहा तास आधीच उकडवून घ्या
पास्ताची रेसिपी तयार करणार असाल तर लक्षात ठेवा पाच ते सहा तास आधीच पास्ता उकडवून ठेवा. यानंतर तो पास्ता भाज्यांसोबत शिजवून घ्या. या प्रक्रियेला रेसिस्टेंट स्टार्च असे म्हटले जाते. यामुळे तयार केलेला पास्ता पचण्यास हलका जातो.