Home » व्यायाम केल्यानंतर तुमचं डोकं दुखतं? ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष

व्यायाम केल्यानंतर तुमचं डोकं दुखतं? ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष

by Team Gajawaja
0 comment
headache after workout
Share

फिट आणि हेल्थी दिसण्यासाठी बहुतांश लोक व्यायाम करतात. खासकरुन तरुण पिढी जिममध्ये तास न तास घाम गाळून आपले शरीर फीट बनवण्यासाठी खुप प्रयत्न करताना दिसून येतात. मात्र तुम्हाला सुद्धा एखाद्या दिवशी अधिक जड व्यायाम केल्यानंतर डोकं दुखण्यास सुरुवात होते का? जर असे होत असेल तर ते आरोग्यासाठी नुकसानकारक ठरु शकते. कार्डियो वर्कआउट नंतर बहुतांश लोक लोकांना डोकं किंवा बाजूला दुखण्यास सुरुवात होत असल्याचे जाणवते. याला एक्जर्शन हेडेक असे म्हटले जाते. यामागे काही कारणं असू शकतात.(Headache after Workout)

खरंतर डोकं दुखण्याची समस्या ही गंभीर समस्याचे लक्षण नव्हे. पण या दरम्यान व्यक्तीला योग्य आरामची आवश्यकता असते. अखेर व्यायाम केल्यानंतर डोकं दुखण्याची समस्या का होते किंवा त्यावेळी कोणत्या गोष्टींकडे काळजी द्यावी याचबद्दल अधिक जाणून घेऊयात.

एक्जर्शन हेडेक नक्की काय?
हेल्थ डॉट कॉमनुसार धावताना किंवा अधिक व्यायाम केल्यानंतर डोक दुखण्याची समस्या होऊ शकते. दरम्यान अत्याधिक डोकं दुखणे हे मायग्रेन किंवा तणावामुळे सुद्धा असू शकते. हे दुखणे ५ मिनिट ते ४५ मिनिटांपर्यंत असते. तसेच डोक्याचा मागचा आणि पुढचा भाग ही भयंकर दुखतो. डोकेदुखी आर्टरीजच्या असमान्य वेगाने होणाऱ्या विस्तारामुळे सुद्धा होऊ शकते. वर्कआउट दरम्यान, डोक्यापर्यंत पुरेसा रक्ताचा पुरवठा न झाल्याने या स्थितीचा सामना करावा लागतो.

headache after workout
headache after workout

व्यायाम केल्यानंतर डोकेदुखीची कारणं
नॅशनल हेडेक फाउंडेशनच्या मते, अधिक डोकेदुखीची विविध कारणं असू शकतात. ज्यामध्ये ब्रेन ट्यूमर, ब्रेन एन्यूरिज्म, सबराचोनोइड ब्लड फ्लो किंवा हार्ट डिजीज संबंधित आजारांचा समावेश आहे.

डोकेदुखीवेळी कोणती काळजी घ्याल

-शरिराला शांत करा
अधिक व्यायाम केल्यानंतर शरिराला आराम देणे गरजेचे असते. अधिक आणि जड व्यायामामुळे काही वेळा डोक्यापर्यंत रक्ताचा पुरवठा सुरळीत होण्यास अडथळा येतो. त्यामुळे डोकं दुखण्यास सुरुवात होऊ शकते. त्यामुळे नेहमीच अधिक व्यायाम केल्यानंतर शरिर शांत करा.(Headache after Workout)

-हायड्रेटेड रहा
डोके दुखीपासून दुर राहण्यासाठी शरिर हायड्रेटेड ठेवा. त्याचसोबत नियमित रुपात पोषक आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या. यामुळे तुमचे डोकं दुखण्याची समस्या कमी होते की नाही हे तुम्हाला कळू शकेल.

हे देखील वाचा- धावताना ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष अन्यथा होऊ शकते समस्या

-औषधं घ्या
काही वेळा डोकं दुखण्याची समस्या ऐवढी होते की, अशातच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावे लागतात. डोकं दुखणे कमी व्हावे म्हणून नेहमीच सल्ल्यानुसार औषधं घ्यावीत. अधिक व्यायाम केल्यानंतर जर डोकं दुखलं तर त्यानंतर जरुर आराम करा. मात्र अधिकच डोकं दुखण्यास सुरुवात झाली तर डॉक्टरांना भेटा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.