हॉरर सिनेमे, भुताच्या गोष्टी किंवा भुताटकी रेल्वे स्थानक (Haunted Railway Stations) जिथे कोणी ही सहजा ये-जा करत नाही तेथे जाणे टाळतात. कारण त्यांच्या मनात असलेली भीती त्यांना कधीच ती गोष्ट करु देत नाही. अशातच आपण भूताच्या गोष्टी रात्रीच्या वेळी ऐकल्यास आणखीच पंचायत होऊन बसते.भूताचा विषय काढला की भल्या भल्यांची बोबडी वळते आणि ते असतील त्या ठिकाणाहून धूम ठोकतात. मात्र जेव्हा आपण एखादा हॉरर सिनेमा पाहत असतो आणि तेव्हा अचानक आपल्या स्क्रिनवर भूताचा मोठा चेहरा आला की, आपण दचकतो. काही सेकंदासाठी आपल्याला कळत नाही काय झालयं. भूत, प्रेत आणि आत्मा हे सुद्धा शब्द जरी ऐकले तरी आपली फाटतेच पण जेव्हा खरंच अशा ठिकाणी जाण्याचा अनुभव घ्याल तर काय होईल? तर जाणून घ्या भारतातील अशी कोणती रेल्वे स्थानक आहेत तेथे भुताटक्यांचा नेहमीच वावर असतो. त्यामुळे स्थानिक ही तेथून पळ काढतात.
-आंध्र प्रदेशातील चित्तूर स्थानक
आंध्र प्रदेशातील चित्तूर स्थानकात आत्मा दिसतात असे बरीचशी लोक वारंवार सांगतात. यामागील कहाणी अशी सांगितली जाते की, येथे एका सीआरपीएच्या जवानाची त्याच्या मित्राने आणि टीटीईने हत्या केली होती. तेव्हापासून त्याची आत्मा येथे दिसते. मात्र त्याची आत्मा कोणालाही काही करत नाही. परंतु येथे जाण्यास स्पष्ट नकार दिला जातो. त्यामुळे अशा भुताटकी रेल्वे स्थानकात एकटे जाण्याची तुमची हिंमत होईल का?
-पश्चिम बंगाल मधील रबींद्र सरोबर मेट्रो स्थानक
भुताटकी रेल्वे स्थानकांपैकी (Haunted Railway Stations) एक असलेल्या कोलकाता मधील या मेट्रो स्थानकात संध्याकाळ होताच नागरिकांचे येणे-जाणे कमी होत जाते. कारण रात्री साडे दहानंतर लोक येथे फिरकत सुद्धा नाहीत. येथील लोक असे म्हणतात की, साडेदहा नंतर येथे भूत दिसते.
हे देखील वाचा- केरळातील ‘या’ काही Haunted ठिकाणांवर दिवसरात्र मंतरलेला खेळ चाले
-एमजी रोड मेट्रो स्टेशन, दिल्ली
गुरुग्राम येथील मेट्रो स्थानकातील भुताची कथा एकदम फिल्मी स्टाइल आहे. कारण येथील लोकांचे असे म्हणणे आहे की, भूत-प्रेत दिसण्याची गोष्ट अगदी खरी आहे. काही लोकांनी असे म्हटले की, खुप जणांनी एक विचित्र सावली पाहिली गेली आहे. येथे काही वर्षांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत त्या महिलेचा आत्मा सफेद रंगाच्या साडीत दिसते असे लोक मानतात. संध्याकाळ होताच येथे लोक जाणे टाळतात.
-लुधियानातील तिकिट काउंटर
पंजाब मधील लुधियाना मधील पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटीज होत असल्याचे बोलले जाते. असे मानले जाते की, येथील एका तिकिट खिडकीवर विचित्र गोष्टी दिसतात. असे सांगितले जाते की, त्या रिजर्व्हेशन काउंटवर एक सुभाष नावाचा व्यक्ती बसायचा. त्याला आपले काम खुप आवडायचे. मात्र त्याचा मृत्यू कसा झाला आणि कधी झाला याबद्दल कोणालाही माहिती नाही. परंतु त्याच्या मृत्यूनंतर आजपर्यंत त्या तिकिट काउंटवर कोणीही बसण्याचे धाडस करत नाही.(Haunted Railway Stations)
-बडोगा स्थानक, हिमाचल प्रदेश
या स्थानका भुताटक्यांचा वावर असल्याची कथा इंग्रजांशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. कारण येथे असलेल्या टनल क्रमांक ३३ मध्ये पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटीज होतात. या टनलचे बांधकाम ब्रिटिश इंजिनिअर कर्नल बडोग यांनी केले होते. त्यांनी याच टनलजवळ आत्महत्या सुद्धा केली. तेव्हापासून दावा केला जातो की, या टनलमध्ये कर्नल बडोगा याची आत्मा फिरत असते.