श्रीरामभक्त हनुमानाला संकटमोचन म्हणतात. हनुमानजींची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते. ज्याप्रमाणे श्रीरामनवमी उत्साहात साजरी केली जाते, तशीच आपल्याकडे हनुमान जयंती साजरी केली जाते. यावेळी 6 एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे. हनुमान जयंतीसाठी सर्व मंदिरांमध्ये सजावट करण्यात येत असून हनुमान भक्त हनुमान चालीसेचा पाठ करत आहेत. याशिवाय अनेक भक्त हनुमानाचा फोटोही (Hanuman photo) घरी लावून त्याची पुजा करतात. मात्र हनुमानाचा कुठला फोटो (Hanuman photo) कुठे लावायचा यासंदर्भात काही नियम आहेत. घरात हनुमानाचा फोटो लावणे शुभ मानले जाते. मात्र जर हनुमानाचा कुठला फोटो कुठल्या दिशेला लावावा हे जाणून घेणे महत्त्वाचे असते.
हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांची पूजा करण्यासाठी काही नियम सांगितले आहेत. कुठला फोटो किंवा कुठल्या देवाची मुर्ती कुठे ठेवावी यासंदर्भात हे नियम आहेत. हनुमानाच्या फोटो संदर्भातही असेच नियम सांगितले आहेत. शास्त्रानुसार हनुमानाचा उडणारा फोटो (Hanuman photo) घरातील पूजेच्या ठिकाणी कधीही लावू नये. घरामध्ये हनुमानजीची निश्चित मूर्ती ठेवणे नेहमीच शुभ असते. असे केल्याने हनुमानजींची कृपा घरावर राहते, असे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार हनुमानजीचा फोटो किंवा मूर्ती दक्षिण दिशेला ठेवणे शुभ असते. मुर्ती असेल तर ती बसलेल्या आकारची असावी याची काळजी घ्यावी. हनुमानानी रावणाच्या लंकेचे दहन केले. अशावेळी हनुमान क्रोधीत होते. त्यामुळे घरात लंका जाळतानाचा फोटो लावू नये. हनुमानजींचा संतापलेल्या अवस्थेतील फोटो घरात लावणे शुभ मानले जात नाही.
पंचमुखी हनुमानाचा फोटो (Hanuman photo) घरात लावणे अत्यंत शुभ मानले जाते. यासंदर्भात अशी आख्यायिका आहे की, अहिरावणाचा अंत करण्यासाठी हनुमानांनी त्यांचे दिव्य रूप धारण केले. ज्यामध्ये त्यांचे पाच चेहरे प्रकट झाले होते. वास्तू शास्त्रानुसार हनुमानाची अशी प्रतिमा आणि मूर्ती घरात ठेवल्याने सर्व दिशांचे वास्तू दोष दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी नांदते. अशा प्रकारच्या फोटोमुळे वास्तू दोष दूर होतात असे सांगण्यात येते. पंचमुखी हनुमानाचा फोटो घराच्या मुख्य दरवाजावर लावावा. दरवाज्यावरील पंचमुखी हनुमानाचा फोटो वाईट शक्तींना आपल्या घरापासून दूर ठेवतो. घरामध्येही भगवान पंचमुखी हनुमान चित्र लावणे खूप शुभ मानले जाते. शक्य असेल तर पंचमुखी हनुमानाचा फोटो (Hanuman photo) घराच्या मुख्य ठिकाणी लावावा जेणेकरून तो सर्वांच्या नजरेस पडेल. जर कोणाला अधिक भीती वाटत असेल, आत्मविश्वास कमी असेल त्यांनी घरात पर्वत उचलणाऱ्या हनुमानाचा फोटो लावणे शुभ मानले जाते. असा फोटो लावल्यास धाडस आणि मनोबळ वाढवण्यास मदत होते. सफेद रंगाच्या हनुमानाचा फोटो सुद्धा यश मिळण्यास मदत करतो. नोकरीत बढती मिळण्यासाठी घरात अशा प्रकारचा फोटो लावावा, असे सांगण्यात आले आहे.
हनुमानाचा बसलेल्या मुद्रेतील फोटो (Hanuman photo) दक्षिण दिशेला लावावा. हनुमानाचा चेहरा दक्षिण दिशेला असेल तर शुभ मानले जाते. यामुळे सर्व समस्या दूर होतात. परिवारातील सदस्यांना आजारपणापासून दूर ठेवतो, असे सांगितले जाते. हनुमानानी दक्षिण दिशेला असलेल्या लंकेत पराक्रम दाखवला, म्हणून हनुमानाचे तोंड दक्षिणेकडे असले पाहिजे, असेही सांगण्यात येते. हनुमान हे श्रीरामभक्त होते. श्रीरामांच्या दरबारात बसलेल्या हनुमानाचा फोटो (Hanuman photo) हा अतिशय शुभ मानला जातो. असा फोटो नेहमी घराच्या हॉलमध्ये लावण्याचे सांगण्यात येते. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते. तसेच घरातील समस्याही दूर होतात आणि घरातील मुख्य व्यक्तिला नोकरीत उच्च स्थान प्राप्त होते असेही मानण्यात येते.
======
हे देखील वाचा : केरळातील ‘या’ मंदिरात स्री च्या वेशात जातात पुरुष मंडळी
======
श्री हनुमानाला समस्यानिवारक, पवनसूत, बजरंगबली म्हणतात. हनुमानाचे भक्त नियमीत हनुमान चालीसा म्हणून त्याची पूजा करतात. ज्या ठिकाणी हनुमानाची नियमित पूजा केली जाते तेथे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते असे म्हणतात. त्यामुळे बहुधा प्रत्येक हिंदू घरात हनुमानाची मूर्ती आणि फोटो पाहायला मिळतात. पण वास्तू शास्त्रानुसार हनुमानाची मूर्ती योग्य दिशेला आणि योग्य जागी ठेवल्यास त्याचा अधिक फायदा होतो. आता येणा-या हनुमानजयंतीचा मुहूर्त साधत जर हनुमानाचे छायाचित्र लावण्याचा विचार असेल तर नक्कीच कुठला फोटो कुठे लावावा हे आधी जाणून घ्यावे.