10 मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Elections) प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. त्यातच काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालू असे जाहीर केले आहे. कॉंग्रेसचा हा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यावर कर्नाटकमधील प्रचारात हनुमानानं उडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या जाहीरनाम्याची भाजपनं निंदा केली असून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी देशभरात निदर्शने सुरू केली आहेत. मध्यप्रदेशमध्ये कॉंग्रेसचे कार्यालयही फोडण्यात आले. तर कर्नाटकमध्ये सामुहिक रित्या हनुमान चालिसा पठण करण्यात येणार आहे. काही ठिकाणी काँग्रेसचा जाहीरनामा जाळून या गोष्टीचा निषेध करण्यात आला.(Elections)
एकूण कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यामुळे कर्नाटकमधील निवडणूक प्रचारात हनुमानाची एन्ट्री झाली आहे. मुळात कर्नाटक आणि प्रभू रामांचे परमभक्त हनुमान यांचे एक अनोखे नाते आहे. हनुमानाचा जन्म झाला ती किष्किंधा नगरी मानली जाते. त्यामुळे हनुमानाच्या जन्मस्थळाचा अपमान केल्याची भावना बजरंग दलानं व्यक्त केली आहे. मुळात रामभक्त हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला यावरुनही वाद आहे. भारतातील चार स्थळांवर हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा करण्यात येतो. मात्र या सर्वात किष्किंधा नगरीबाबत अनेकांनी हनुमान जन्मभूमी असा उल्लेख केला आहे. त्यामुळेच कर्नाटकच्या प्रचारात कॉग्रेसनं बजरंग दलावर कारवाई करण्यात यईल, असे जाहीरनाम्यात स्पष्ट केल्यावर एकच वाद उफाळला आहे. बजरंगबलीचे सेवक असल्याचा दावा करत बजरंग दलानं आता हनुमान भक्तांना एक होण्याचे आवाहन केले आहे. (Elections)
भगवान श्रीरामांचे परम भक्त हनुमान आणि कर्नाटकाचा जवळचा संबंध आहे. कर्नाटकाची ओळख हनुमानांची जन्मभूमी अशीही आहे. कर्नाटकात चालू असलेल्या निवडणुकीच्या प्रचारात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या भाषणांमध्ये कर्नाटकचा हनुमानाची जन्मभूमी म्हणून गौरव केला आणि कर्नाटक-अयोध्येचे नाते पूर्वापार असल्याचे जाहीर केले. नेमकं यानंतर कॉंग्रेसनं जाहीरनामा प्रसिद्ध करत बजरंग दलावर बंदी घालण्यात येईल असे सूचित केले. या दोन्ही गोष्टींमुळे कर्नाटकातील निवडणुकीत रामभक्त हनुमनानं उडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. यासोबत हनुमानाचे जन्मस्थान मानल्या जाणा-या स्थळांची चर्चा चालू झाली आहे. (Elections)
श्री हनुमान हे प्रभू श्री रामाचे निस्सीम भक्त होते. लंकायुद्धात हनुमानाची भूमिका महत्त्वाची होती. लंकेच्या विजयानंतर हनुमान प्रभू रामांसह अयोध्येला आले आणि अयोध्यावासी झाले. जेव्हा भगवान राम हे जग सोडून जात होते तेव्हा त्यांनी अयोध्येच्या रक्षणाची जबाबदारी हनुमानावर सोपवली. त्यानंतर अयोध्येतील हनुमान गढी येथे श्री हनुमान यांचे निवासस्थान असल्याची श्रद्धा आहे. मात्र हनुमानाचे जन्मस्थान किष्किंधा नगरी असल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही वर्षात हनुमानाचा नेमका जन्म कुठे झाला, हा वाद सुरु झाला होता. तेव्हा कर्नाटकातील संत महंत गोविंद दास यांनी भगवान हनुमानाचा जन्म किष्किंधा म्हणजेच कर्नाटकमध्ये झाल्याचा दावा केला. हा भाग हंपीच्या आसपास आहे. वाल्मिकी रामायणातही याचा उल्लेख आहे. किष्किंधा सध्याच्या हंपीपासून सुमारे 25 किलोमीटर दूर आहे. हे ठिकाण कोप्पल जिल्ह्यातील अनेगुंडी येथे असल्याचे सांगितले जाते. कर्नाटकातील शिवमोग्गा येथील रामचंद्रपूर मठाचे प्रमुख राघवेश्वर भारती यांनी या दाव्यासाठी रामायणाचा हवाला दिला आहे. कर्नाटकने किष्किंधा येथील अंजनाद्रीवर आपल्या हक्काच्या समर्थनार्थ एका प्रकल्पावर कामही सुरू केले आहे. रामायणानुसार हंपी येथे भगवान राम आणि लक्ष्मण यांची पहिल्यांदा हनुमानाची भेट झाली होती. या जागेचा हनुमान जन्मस्थळाच्या नावाने तीर्थक्षेत्र म्हणून विकास करण्यात येत आहे. (Elections)
========
हे देखील वाचा : लादेनला ठार करण्यासाठी ओबामांनी असा बनवला होता सिक्रेट प्लॅन
========
मात्र यासर्वात निवडणुका (Elections) आल्या आणि त्यात हनुमानाचा उल्लेख करण्यात आला. श्री हनुमानाच्या नावानं सुरु झालेल्या बजरंग दलावर बंदी आणली तर तो हनुमानाचा अपमान असेल, असे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे बजरंग दलातर्फे आता कर्नाटकभर हनुमान चालीसा पठण करण्यात येत आहे. एकूण कर्नाटकाच्या 10 तारखेरोजी होणा-या मतदानात प्रभू हनुमान हा प्रमुख मुद्दा राहणार हे स्पष्ट झाले आहे. आता प्रभू हनुमानाची कृपा कोणावर राहिल हे 13 मे रोजी स्पष्ट होणार आहे.
सई बने