Home » हनुनानाच्या काळ्या रंगातील मुर्तीची पूजा करण्यामागील ‘ही’ आहे पौराणिक कथा

हनुनानाच्या काळ्या रंगातील मुर्तीची पूजा करण्यामागील ‘ही’ आहे पौराणिक कथा

देशातील काही ठिकाणी हनुमानाची काळ्या रंगातील मुर्ती स्थापन करण्यात आली आहे. यामागे एक पौराणिक कथा सुद्धा आहे.

by Team Gajawaja
0 comment
Hanuman Temple
Share

‘लाल देह लाली लसे अरु धरी लाल लंगूर, बज्र देह दानव दलन जय जय जय कपि सूर’, याचा अर्थ असा होतो की, हनुमान जी, तुमचे शरिर, तुमची शेपूट आणि तुमचे वस्र लाल आहे. तुम्ही लाल सिंदूर सुद्धा धारण केले आहे. तुमचे शरिर वज्रासारखे कठोर असून तुम्ही दुष्टांना नाश करतात. तुम्ही नखशिखांत लाल रंगच धारण करतात. जर तुम्ही हनुमानाच्या मंदिरात गेला असाल तर तुम्हाला सर्व मंदिरांमध्ये त्याची लाल मुर्ती किंवा केशरी रंगाची दिसेल. मात्र तुम्ही कधी काळ्या रंगातील हनुमानाची मुर्ती पाहिली आहे का? (Hanuman temple)

खरंतर देशातील काही ठिकाणी हनुमानाची काळ्या रंगातील मुर्ती स्थापन करण्यात आली आहे. यामागे एक पौराणिक कथा सुद्धा आहे. त्याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.

सर्वात प्रथम तेलंगणामधील निजामबाद येथील गाजुलपेट मधील बुरुद गलीत श्री नल्ला हनुमान मंदिरम बद्दल जाणून घेऊयात. या मंदिरात प्रत्येक दिवशी शेकडो भाविक हनुमानाचे दर्शन घेण्यास येतात. खरंतर या मंदिरात हनुमानाची काळ्या रंगाची मुर्ती स्थापन करण्यात आली आहे. याची स्थापना १९३६ मध्ये करण्यात आली होती. या व्यतिरिक्त उत्तर प्रदेशातील रायबेरलीत सुद्धा अशाच हनुमानाची पूजा केली जाते.

श्री नल्ला हनुमान मंदिरात काळ्या रंगाची मुर्ती स्थापन करण्यामागे एक कथा सांगितली जाते. त्यानुसार त्यावेळी हे एक घनदाट जंगल होते. एकेदिवशी मुर्तीचे निर्माती मुर्तीला संत शिरोमणी मठात स्थापन करण्यासाठी बैलगाडीवरुन घेऊन जात होते. अचानक बैलगाडी एका ठिकाणी थांबली. त्यांनी बैलगाडी हटवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. मात्र ती जरा सुद्धा हलली नाही. रात्र झाल्यानंतर मुर्तीसह गाडी त्याच ठिकाणी ठेवून निघून गेले. त्याच दिवशी रात्री भगवान हनुमानाने संत शिरोमणी सद्गुरु महाराज स्वामी यांना स्वप्नात दर्शन देत असे म्हटले की,जेथे गाडी थांबली आहे त्याच्या पश्चिम दिशेला स्थापन करावी. त्यांनी १९३६ मध्ये घटनदाट जंगलात सांगितलेल्या ठिकाणी हनुमानाची ती मुर्ती स्थापन केली. (Hanuman temple)

हेही वाचा- मध्यप्रदेशचे अजिंठा-एलोरा अशी ‘या’ मंदिराची ओळख

काळ्या रंगाच्या मुर्तीच्या हनुमानासह मंदिरात भगवान दत्तात्रेयाच्या मुर्तीसमोर एक दुसरी मुर्ती सुद्धा स्थापन केली. आता हे शहर निजामबाद शहराचे केंद्र बनले आहे. पुजारी येथे दररोज हनुमानाची पूजा आणि तेलाने अभिषेक करतात. त्यानंतर श्री नस्ला हनुमानाला चंदनाच्या लेपाने सजवतात. असे म्हटले जाते की, मंदिराला जर १०८ वेळा फेऱ्या मारल्या तर मनाला शांति मिळते.

 

 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.