केसात कोंडा होणे ही अशी एक समस्या आहे ज्याचा सामना आपण कधी ना कधी केला असेल. यामुळे स्कॅल्प फ्लेकी होतात आणि तुम्हाला खाज, इरिटेशन होते. खरंतर कोंड्याची समस्या कधीही होऊ शकते. परंतु थंडीच्या दिवसात होणे सर्वसामान्य बाब आबे. बहुतांश लोकांना थंडीच्या दिवसात कोंड्याची समस्या होतेच. (Hair problem in winter)
अशातच आपण अँन्टी डँड्रफ शॅम्पू वापरतो अथवा काही घरगुती उपायांनी कोंड्याची समस्या दूर करतो. पण थंडीच्या दिवसात कोंड्याची समस्या का वाढली जाते आणि याची कारणे काय आहेत हे जाणून घेऊयात.
हवेत ड्रायनेस असणे
थंडीच्या दिवसात ओलाव्याचा स्तर कमी होतो. या दिवसात हवेत शुष्क असते. त्यामुळे स्कॅल्पसुद्धा ड्राय होऊ शकतात. अशातच स्कॅल्पचे फ्लेकी होणे आणि डँड्रफची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे असा सल्ला दिला जातो की, थंडीच्या दिवसात तुम्ही आपल्या स्कॅल्पच्या ओलाव्याची काळजी घ्यावी. हेअर ऑइल हलके गरम करून त्याने स्कॅल्प मसाज करावे. असे केल्यानंतर थोड्यावेळाने जेंटल शँम्पूच्या मदतीने क्लिन करावे.
गरम पाण्याने अंघोळ करणे
थंडीच्या दिवसात आपण सर्वजण गरम पाण्याने अंघोळ करतो. पण जेव्हा तुम्ही अधिक गरम पाण्याने अंघोळ करता तेव्हा स्कॅल्पमधील नॅच्युरल ऑइल सुद्धा कमी होते. यामुळे ड्रायनेसची समस्या वाढली जाते. यामुळे थंडीच्या दिवसात तुम्ही अधिक गरम पाण्याने अंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करू शकता. त्याचसोबत लॉन्ग शॉवर पासून दूर रहावे.
केस कमी वेळा धुणे
अशी बहुतांश लोक आहेत जी थंडीच्या दिवसात वारंवार केस धुण्यापासून दूर राहतात. तसेच थंड पाण्याने ही केस धुत नाहीत. याच कारणास्तव स्कॅल्पवर ऑइल, घाम किंवा डेड स्किन सेल्स जमा होतात. यामुळेच डँड्रफची समस्या उद्भवते. त्यामुळे थंडीत सुद्धा आठवड्यातून दोन तीन वेळा हेअर वॉश जरुर करावे. (Hair problem in winter)
कॅप घालणे
थंडीच्या दिवसात आपण बाहेर पडतो तेव्हा दीर्घकाळ आपण टोपी किंवा स्कार्फ घालतो.अशातच स्कॅल्पवर गरम आणि ओलसर वातावरण तयार होऊ शकते. त्यामुळे डँड्रफची समस्या होऊ शकते. यामुळे घरात असू तेव्हा उगाचच कॅप घालण्यापासून दूर रहावे.
पाणी कमी पिणे
थंडीच्या दिवसात शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. या दरम्यान आपण फार कमी पाणी पितो. यामुळे शरीरात डिहाइड्रेशनची समस्या उद्भवू शकते आणि स्कॅल्पचे ड्रायनेस वाढते. स्वत:ला हाइड्रेट ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्या.
हेही वाचा- Bottle Gourd Juice Benefits: मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी गुणकारी आहे दूधी भोपळ्याचा रस !