Hair fall mistakes in Summer : लांबसडक केस आपले व्यक्तिमत्त्व अधिक खुलवतात. यामुळे आत्मविश्वासही वाढला जातो. पण उन्हाळा सुरू झाल्यानंतर केसासंबंधित समस्या वाढू लागतात. या काळात केस गळतीची समस्या अधिक वाढली जाते. पण नक्की केस का गळतायत यामागील कारणे बहुतांशजणांना कळत नाहीत. पण सातत्याने केस गळत असल्यास नवे केस येण्यास समस्या उद्भवू शकते. दरम्यान, हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते उन्हाळ्यात केस गळण्यामागे आपल्या काही चुका देखील असू शकतात. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर….
उन्हाच्या संपर्कात येणे
काहीजण कामाच्या कारणास्तव सतत बाहेर असतात. यामुळे उन्हाचा थेट संबंध केसांशी येतो. याच कारणास्तव सूर्याच्या प्रकाशातून निघणारी हानिकारक युव्ही किरणे केसांमधील ओलसरपणा शोषून घेतात. यामुळे केस कोरडे होण्याची समस्या निर्माण होते. तुम्ही उन्हाळ्यात सातत्याने बाहेर जात असाल तर डोक्यात कॅप घाला किंवा स्कार्फ लावा.
डॅड्रफ होणे
उन्हाळ्यात शरिरातून अत्याधिक घाम निघतो. यामुळे केसांमध्ये बॅक्टेरिया सहज तयार होऊ शकतात. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर केसांमध्ये डॅड्रफ होण्याची शक्यता वाढली जाते. अशातच केस हळूहळू गळण्यास सुरूवात होते. (Hair fall mistakes in Summer)
केस घट्ट बांधणे
उन्हाळ्यात केस घट्ट बांधल्याने केस गळतीची समस्या निर्माण होऊ शकते. खरंतर केस घट्ट बांधल्याने केसामध्ये उन्हाळ्यावेळी घाम चिकटून राहतो. अशातच केसांच्या मूळांमध्ये बॅक्टेरिया तयार होऊन केस कमकूवत होतात.
केस न धुणे
उन्हाळ्यात धूळ-मातीमुळे केस चिकट होतात. यामुळे केस आठवड्यातून दोनदा तरी धुवावेत. पण लक्षात ठेवा, तुम्ही केस दररोज शॅम्पूने धुत असल्यास यामुळेही केस गळतीची समस्या उद्भवू शकते.