Hair Care Tips : केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी त्यांची योग्य पद्धतीने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. महिला केसांच्या काळजीसाठी काही प्रोडक्ट्स लावतात. याशिवाय घरगुती उपायही करतात. पण तरीही केस गळतीची समस्या बहुतांश महिलांना सतावते. पण तुम्हाला माहितेय का, तुमच्या चुकीच्या पद्धतीने केसांना लावण्याच्या सवयीमुळेही केस गळण्यासह पातळ होऊ शकतात. यामुळे योग्य पद्धतीने केसांना तेल कसे लावावे आणि तेल लावताना काय काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…..
हलक्या हाताने मसाज करा
केसांना तेल लावताना ते एकमेकांवर घासू नका. तेल लावल्यानंतर सर्वप्रथम केसांच्या मूळांना हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर संपूर्ण केसांनाही हलक्या हाताने तेल लावा. जेणेकरुन केस तुटणार नाहीत.
सकाळी तेल लावू नका
सकाळी केस धुण्याआधी तेल लावू नये. आंघोळीआधी केसांना तेल लावल्यास केस ड्राय होतात. याशिवाय केस तुटण्याची शक्यताही अधिक वाढली जाते. रात्रीच्या वेळेस तेल लावण्याची योग्य वेळ आहे. यानंतर तुम्ही सकाळी आंघोळीवेळी केस धुवू शकता. याव्यतिरिक्त केस धुण्याच्या एक तास आधी केसांना तेल लावू शकता. केसांना तेल लावल्यानंतर ते घट्ट बांधू नका. यामुळे केस गळतीची समस्या निर्माण होऊ शकते.
तेल लावण्याची योग्य पद्धत
केसांसाठी नैसर्गिक तेलाचा वापर करावा. जेणेकरुन केसांचे नुकसान होणार नाही. बहुतांश महिला कोणत्याही प्रकारचे तेल केसांना लावतात. अशातच केसांचे नुकसान होऊ शकते. टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या तेलांच्या जाहिरांमधील तेल कधीच खरेदी करू नये.
(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)