Home » सिल्की आणि मऊ केसांसाठी घरच्याघरी तयार करा हे हर्बल कंडीशनर

सिल्की आणि मऊ केसांसाठी घरच्याघरी तयार करा हे हर्बल कंडीशनर

केसांची काळजी घेण्याबद्दल जेव्हा बोलले जाते तेव्हा केसांना शॅम्पू करणे ऐवढ्या पुरत्या काही गोष्टी मर्यादित नसतात. खरंतर, केस धुतल्यानंतर कंडीशनरही लावले पाहिजे.

by Team Gajawaja
0 comment
Hair Care Tips
Share

Hair Care Tips : केसांची काळजी घेण्याबद्दल जेव्हा बोलले जाते तेव्हा केसांना शॅम्पू करणे ऐवढ्या पुरत्या काही गोष्टी मर्यादित नसतात. खरंतर, केस धुतल्यानंतर कंडीशनरही लावले पाहिजे. सर्वसामान्यपणे मार्केटमध्ये मिळणाऱ्या कंडीशनरचा आपण वापर करतो. पण कधीकधी कंडीशनरमध्ये केमिकलचा देखील वापर केला जातो. अशातच केसांचे नुकसान होऊ शकते. यामुळे सिल्की आणि मऊ केसांसाठी घरच्याघरी काही हर्बल कंडीशनर तयार करू शकता.

पुदीना आणि ग्रीन टी पासून असे तयार करा कंडीशनर
पुदीना आणि ग्रीन टी च्या मदतीने उत्तम हर्बल कंडीशनर तयार करू शकता. पुदीना केसांच्या मूळांर्यंत ब्लड सर्कुलेशन बूस्ट करण्यास मदत करते. यामुळे केसांची वाढ केली जाते. याशिवाय ग्रीन टी मध्ये असलेल्या अँटी-ऑक्सिटेंड्समुळे केसांच्या मुळांना पोषण मिळण्यासह चमक येते. तर जोजोबा ऑइलमुळे केसांच्या मुळांना मॉइश्चराइज होण्यास मदत होते.

आवश्यक सामग्री
-दोन ग्रीन टी बॅग
-मुठभर पुदीनाची पाने
-एक मोठा चमचा जोजोबा ऑइल

वापर करण्याची पद्धत
-एक कप गरम पाण्यात दोन ग्रीन टी बॅग बुडवा
-यामध्ये पुदीन्याची ताजी पाने टाका
-आता पाणी थंड होऊ द्या आणि गाळून घ्या
-यामध्ये जोजोबा तेल टाका
-शॅम्पू केल्यानंतर केसांच्या पाण्यात कंडीशनर बुडवून वापरु शकता.

जास्वंदीचे फुल आणि दह्याचे कंडीशनर
जास्वंदीची फुल आणि दह्याच्या मदतीने कंडीशनर तयार करू शकता. अॅमिनो अॅसिडयुक्त जास्वंदच्या फुलांमुळे केस कंडीशन होण्यासह केसांची मुळ मजबूत होण्यास मदत होते. दह्यामध्ये लॅक्टिड अॅसिड असते जे केसांच्या मुळांसाठी फायदेशीर ठरू शकते.

आवश्यक सामग्री
-10-12 जास्वंदीची फुल
-एक कप दही

असा वापर करा
-जास्वंदीच्या फुलांची पेस्ट तयार करुन घ्या
-पेस्टमध्ये दही मिक्स करा
-या मिश्रणांमधून केस आणि मूळांना अर्धा तास राहू द्या
-अखेर पाण्याच्या मदतीने केस व्यवस्थितीत धुवा

रोजमेरी आणि लेवेंडरपासून कंडीशनर
रोजमेरी केसांच्या वाढीसाठी मदत करते. लेवेंडरमुळे केसांच्या मूळांना आराम मिळतो. याशिवाय अॅप्पल सायडर व्हिनेगर पीएचचा स्तर बॅलेंन्स करण्यासह केसांची चमक वाढली जाते.

सामग्री
-एक चमचा ताजी अथवा सुकलेली रोजमेरी
-सुकलेले लेवेंडर फूल
-एक चमचा अॅप्पल सायडर व्हिनेगर
-पाणी (Hair Care Tips)

असा करा वापर
-2 कप पाण्यामध्ये रोजमेरी आणि लेवेंडर उकळून टाका
-पाण्यात 30 मिनिटांपर्यंत बुडवून ठेवा आणि नंतर पाणी गाळून घ्या
-आता अॅप्पल सायडर व्हिनेगर टाका
-शॅम्पू केल्यानंतर केसांसाठी कंडीशनरसारखा वापर करू शकता.


आणखी वाचा :
सेलिब्रेटींसारखा मेकअप लूक करण्यासाठी या लहान-लहान गोष्टी ठेवा लक्षात
चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील कमी, ट्राय करा हे घरगुती उपाय

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.