केसांच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी आपण खुप काही गोष्टी करतो. हेल्दी केसंसाठी त्यांना तेल लावणे, मालिश करणे, हेअर मास्क, हेअर स्पा सुद्धा केला जातो. परंतु केस व्यवस्थित धुतली गेली नाही तर केसांसंदर्भात समस्या वाढू शकतात. खरंतर आपण केसांना शॅम्पू कसा लावला पाहिजे याची योग्य पद्धत जाणूनच घेत नाही. यामुळे हेअर स्कॅल्प आणि केसांचे टेक्सच खराब होते. या समस्येपासून दूर राहण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत. (Hair Care)
जेव्हा आपण केसांना शॅम्पू लावतो तेव्हा प्रथम तो हातावर घेतो. त्यानंतर थेट केसांना लावतो. जेव्हा त्यामधून फेस येतो तेव्हा आपण केस धुतो. परंतु तुमची ही पद्धत चुकीची असून केसांचे यामुळे नुकसान होते. अशातच तो केसांना थेट लावण्यापूर्वी त्यात थोडं पाणी मिक्स करा. त्यानंतरच त्याचा वापर करा. असे केल्याने शॅम्पू केसांना आणि मुळांपर्यंत थेट लागत नाही. तसेच यामधील काही अॅक्टिव्ह कंपाउंड आणि केमिकल्स सुद्धा केसांना नुकसान पोहचवत नाहीत.
त्यामुळे जर तु्म्हाला तुमच्या केसांची काळजी घ्यायची असेल तर शॅम्पू करण्यापूर्वी केसांना तेल जरुर लावा. असे केल्याने केस कमकुवत होत नाहीत. त्यांची मजबूता टिकून राहते. खरंतर शॅम्पू लावण्यापूर्वी केसांना तेल लावण्याचे काही फायदे आहेत. असे केल्याने केसांचा केमिकल्स पासून बचाव होते. केस ड्राय होत नाही आणि ती धुतल्यानंतर ही मऊ राहतात.
त्यामुळेच जेव्हा कधी तुम्ही शॅम्पू लावून केस धुणार असाल तेव्हा केसांना जरुर तेल लावा. त्यानंतर शॅम्पू पाण्यात मिक्स करुनच ते केसांना लावा. असे केल्यानंतर केसांना लावलेला शॅम्पू व्यवस्थितीत धुवा. यामुळे तुमची केस कमजोर होणार नाही. त्याचसोबत काही समस्या ही दूर होतील. (Hair Care)
हेही वाचा- उन्हाळ्यात चुकूनही घालू नका ‘या’ फॅब्रिक्सचे कपडे
खुप वेळ शॅम्पू केसांना लावून ठेवला तर काय होईल?
बहुतांश शॅम्पू हे केसांना खुप वेळ लावून ठेवू शकत नाहीत. अशामुळे तुमचे केस गळण्यास सुरुवात होऊ शकते. पाण्यात मिक्स केलेला शॅम्पू तुम्ही तुमच्या स्कॅल्पला लावल्यानंतर तो काही मिनिटांसाठी तेथे मालिश करा. तज्ञ बहुतांशवेळा असा सल्ला देतात की, डँड्रफ शॅम्पू लावून केस धुतल्यानंतर रेग्युलर शॅम्पू सुद्धा वापरावा. त्यानंतर कंडिशनर ही लावावे. जर तुमचे केस ड्राय असतील तर शॅम्पू लावण्यापूर्वी ३० मिनिट आधी तेल लावून ठेवा. यामुळे केसांमध्ये थोडाफार मऊपणा राहिलच. पण शॅम्पू केसांना अधिक ड्राय ही करणार नाही.