Home » भारतात H3N2 फ्लू ची लाट, जाणून घ्या लक्षणं

भारतात H3N2 फ्लू ची लाट, जाणून घ्या लक्षणं

by Team Gajawaja
0 comment
H3N2 Virus
Share

देशभरात ‘इन्फ्लुएंजा-ए सबटाइप’ H3N2 ची प्रकरणं अचानक वाढू लागली आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये देशभरातील रुग्णालयांत याची प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये ३-५ दिवस ताप येतो आणि सातत्याने खोकला येत राहतो. जो तीन आठवड्यापर्यंत राहू शकतो. वैद्यकीय तज्ञ या प्रकोपापासून दूर राहण्यासाठी गाइडलाइन्स आणि सावधगिरीचा सल्ला देत आहेत. (H3N2 Virus)

एम्सचे माजी वरिष्ठ चिकित्सक आणि आता चेअरमॅन, इंस्टीट्युट ऑफ इंटरनल मेडिसिन, रेस्पिरेटरी अँड स्लीप मेडिसिन मेदांता डॉ. रणदीप गुलेरिया यांनी असे म्हटले की, एच३एन२ हा एक प्रकारचा इन्फुएंजा वायरस आहे जो, आपण प्रत्येक वर्षी महारोगाच्या या काळादरम्यान पाहतो. हा एक वायरस आहे जो वेळेनुसार बदलतो. ज्याला ‘एंटीजेनिक ड्रिफ्ट’ असे म्हटले जाते. आपल्याकडे H1N1 च्या कारणास्तव काही वर्षांपूर्वी एक आजार होता.

सुरक्षिततेसाठी मास्क घाला
डॉ. गुलेरिया यांनी असे म्हटले की, इन्फूएंजा कोविड प्रमाणे फैलावतो. यामुळे केवळ त्याच लोकांनी सावध राहण्याची गरज आहे ज्यांना आधीपासूनच कोणताच आजार नाही. सुरक्षिततेसाठी मास्क घाला, वेळोवेळी हात धुवा. इन्फुएंजासाठी सुद्धा एक लस आहे. डॉ. गुलेरियाने असे म्हटले की, याची लक्षण ताप, घश्यात खवखव, खोकला, अंग दुखणे आणि सर्दी अशी आहेत.

आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. शालिन मित्राने असे म्हटले की, आम्ही आमच्या क्लिनिकला तयार राहणे आणि तपाच्या क्लिनिक्सला औषधांची पुर्तता सुनिश्चित करण्यासह आयसीएमआरच्या गाइडलाइन्सचे पालन करण्यास सांगितले आहे.

ICMR ने नुकतीच एक अॅडवायजरी जारी करुन लोकांना या इन्फूएंजाच्या प्रकोपासून एंन्टीबायोटिक औषधांच्या वापरापासून दूर राहण्यास सांगितले आहे. त्याचसोबत बहुतांश लोकांनी मास्क न घातल्याने ही हा इंन्फ्लुएंजाचा फैलाव होत आहे. अशातच लोकांनी अतिगर्दीच्या ठिकाणी जात असाल तर मास्क घालावा. स्वत:ला हायड्रेट ठेवावे. (H3N2 Virus)

हे देखील वाचा- वेळेआधीच आलेल्या मेनोपॉजमुळे महिलांच्या शारिरीक-मानसिक आरोग्याला धोका

त्याचसोबत डॉ. गौरव शर्मा जे दिल्लीतील एक बाल वैज्ञानिक आहेत जे प्रतिदिन जवळजवळ ३०-४० रुग्णांवर उपाचार करतात. त्या रुग्णांमध्ये बहुतांश जणांना इंन्फ्लुएंजाची लक्षण आढळून आली. जर मुलांमध्ये ही लक्षणं आढळून आली तर त्यांच्या पालकांना सल्ला दिला जातो की, संक्रमणाच्या फैलाव होऊ नये म्हणून त्यांना शाळेत पाठवू नये. तसेच बाहेरचे तळलेले पदार्थ सुद्धा त्यांना देऊ नये असा सल्ला दिला आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.