डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी H-1B व्हिसा संदर्भातील काही नियम शिथिल केले आहेत, ज्याचा थेट फायदा अमेरिकेत काम करणाऱ्यांना भारतीयांना होणार आहे. या शिथिलतेनंतर, H-1B व्हिसा धारकांना अमेरिकेत पुन्हा प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल. मात्र ही सूट केवळ त्याच लोकांनाच उपलब्ध जे पुन्हा त्याच ठिकाणी जॉइन करतील जिथं व्हिसा बंदीच्या घोषणेपूर्वी होते. नवीन नोकऱ्यांसाठी ही सूट दिली जाणार नाही.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या सल्लागारांनी सांगितले की, आश्रित (जोडीदार आणि मुले) यांना प्राथमिक व्हिसा धारकांसह प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. विभागीय सल्लागार म्हणाले की, यात जे आधीपासून नोकरीवर आहेत त्यांना येण्याची परवानगी दिली आहे. ट्रम्प प्रशासनाने तांत्रिक तज्ञ, ज्येष्ठ-स्तरीय व्यवस्थापक आणि कामगारांनाही परवानगी देण्यात आली आहे. त्याच वेळी, अमेरिकन सरकारने कोव्हिड-19 ला रोखण्यासाठी मदत करणाऱ्या आरोग्य सेवा व्यावसायिकांना सूट दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अनेक व्हिसा तात्पुरते थांबवले होते. कोरोनाच्या परिस्थितीत अमेरिकेत नोकरी करण्याच्या आशेने आलेल्या हजारो लोकांच्या आशांना मोठा धक्का बसला होता. मात्र आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की ते लवकरच एच -1 बी व्हिसासाठी नवीन नियम बनवणार आहेत. या बदलानंतर, प्रतिभावान आणि उच्च कौशल्य असलेल्या लोकांना अमेरिकेत करिअर करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.