Home » Gurupushyamrut Yog : गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय आणि त्याचे महत्व

Gurupushyamrut Yog : गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय आणि त्याचे महत्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Gurupushyamrut Yog
Share

आज गुरुपुष्यामृत योग आहे. अतिशय दुर्मिळ असणारा हा गुरुपुष्यामृत योग एका वर्षात केवळ २/३ वेळाच येतो. त्यामुळे या योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरुपुष्यामृतयोग्य असतो. हा शुभ दिवस मानल्या जातो. या नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा संबोधल्या जाते. या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग बनतो. पुष्य नक्षत्रास नक्षत्रांचा राजा देखील म्हणतात. या नक्षत्रात धनाची देवी लक्ष्मीमाता प्रकट झाली होती, असेही म्हटले जाते. गुरुपुष्यामृत हा योग नारायणाच्या सुदर्शन चक्राइतका शक्तिशाली मानला जातो आणि अभिजीत मुहूर्तापेक्षाही श्रेष्ठ असतो. (Marathi News)

२१ ऑगस्ट गुरुवारी सकाळी ६.२३ वाजेपासून ते २२ ऑगस्टला उत्तर रात्री ००.०८ वाजेपर्यंत गुरुपुष्यामृत योग असणार आहे. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो. पुष्यामृत गुरुवारी येणे हा दुर्मिळ योग आहे. म्हणूनच आपण याला अमृतयोग असेही संबोधतो. पुष्य नक्षत्रात प्रत्येक क्षण शुभ समय असतो. कुठल्याही शुभ कार्यासाठी हा योग खूप महत्वाचा आणि पवित्र मानला जातो. या मुहूर्ताला आपण सर्व शुभकार्याला सुरुवात शुभारंभ करत असतो जसे की गृहप्रवेश, सोने व चांदी खरेदी, मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी, नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादि. सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या योगावर केलेली गुरुसेवा, गुरुभक्तीचे फळ अमाप असते म्हणूनच या दिवशी गुरुमंत्र, गुरूचे नामस्मरण व पारायण केल्यास ते भक्तांना अत्यंत लाभदाई ठरते. (Todays Marathi Headline)

Gurupushyamrut Yog

गुरुपुष्यामृत योगात सोने, चांदी, जमीन, घर किंवा कोणतीही महत्त्वाची संपत्ती खरेदी केल्यास ती दीर्घकाळ टिकते आणि त्यात कोणतेही नुकसान होत नाही, असा विश्वास आहे. या दिवशी खरेदी केलेली संपत्ती केवळ स्थिरच राहत नाही, तर ती भाग्यवृद्धी, समृद्धी, आणि यशाचा मार्ग देखील खुला करते. गुरुपुष्यामृताच्या दिवशी नवीन व्यवसायाची सुरुवात केली जाते, सोनं, घर, वाहन किंवा महागड्या वस्तूंची खरेदी, महत्वाचे आर्थिक व्यवहार, गुंतवणुकीशी संबंधित निर्णय, धार्मिक विधी, पूजन, मंत्र-जप, दानधर्म आणि सामाजिक कार्य आदी कार्य करू शकतो. (Marathi Trending News)

हिंदू धर्मात प्रत्येक तिथी आणि त्यासोबत जुळणाऱ्या शुभ योगांचे विशेष महत्त्व आहे. त्यामध्ये पुष्य नक्षत्र हे 27 नक्षत्रांपैकी सर्वश्रेष्ठ मानले जाते. विशेष म्हणजे, पुष्य नक्षत्रात विवाह सोडून इतर कोणतेही नवीन कार्य सुरू करणे अत्यंत शुभ मानले जाते. गुरुपुष्यामृत योगाचे फायदे देखील अनेक आहेत. जसे की, संपत्तीची वृद्धी आणि आर्थिक स्थैर्य, शुभ कार्यात यश आणि सकारात्मक फलित, नवीन व्यवसाय, गुंतवणूक किंवा खरेदीसाठी उत्तम काळ, घरातील सौख्य, शांती आणि समाधानात वाढते. अन्य कोणत्याही कामांसाठी हा योग शुभ असला, तरी या दिवशी विवाह करत नाहीत. कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे. गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही. (Latest Marathi News)

=========

Ganesh Chaturthi : गणपती बाप्पाला दुर्वा का वाहिल्या जातात?

=========

गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी पहाटे उठून स्नान करुन स्वच्छ वस्त्र परिधान करावी. घरातील देवाऱ्हामध्ये तुपाचा दिवा लावावा. लक्ष्मीमातेसह सर्व देवांना फळ, पुष्प, गंध, नैवेद्य अर्पण करुन पूजा करावी. लक्ष्मीमातेच्या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती-ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे होते. त्याचा अर्थ शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा असा आहे. जाणकारांच्या मते, पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा, असेही म्हणतात. पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी आहे. या नक्षत्रात तीन तारका दिसतात जे बाणाप्रमाणे दिसून येतात. या बाणाचा वरचं टोक म्हणजे वरचा तारा पुष्य क्रांती वर पडतो. (Social News)

(टीप : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.