खरंच नेताजी सुभाष चंद्र बोस आणि गुमनामी बाबा हे एकच व्यक्ती होते? बोस यांनी आपल्या आयुष्यातील अखेरचा काळ हा फैजाबाद मध्ये गुमनाम आयुष्याच्या आधारावर जगले होते? की गुमनामी बाबा (Gumnami baba) नेताजींचे खास होते? तर नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ ७५ वर्षानंतर ही याचे उत्तर अखेर मिळणार आहे. कारण युपी कॅबिनेटकडून गुमनामी बाबा यांचे सत्य शोधण्यासाठी एक कमेटी तयार केली आहे.
१७ सप्टेंबर १९८५ चा कालावधी
ही कथा याच तारखेपासून सुरु होते. जेव्हा फैजाबाद मध्ये गुमनामी बाबा यांचा अचानक मृत्यू झाला. मृत्यूच्या दोन दिवसानंतर १९ सप्टेंबर १९८५ मध्ये संध्याकाळी ४ वाजता फैजाबादच्याच गुफ्तार घाटातील सरयू नदीच्या किनाऱ्यावर त्यांचे अंतिम संस्कार झाले. परंतु त्यांचा चेहरा कोणाला पहायला मिळाला नाही. असे म्हटले जाते की, मृत्यूनंतर आणि अंतिम संस्कारापूर्वी गुमनाबी बाबा यांचा चेहरा एका रसायनाचा वापर करुन विद्रुप करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जेणेकरुन चेहऱ्याची ओळख पटू नये.
गुमनामी बाबांचे मृत्युपूर्वीचे आयुष्याबद्दल कोणालाच काही माहिती नव्हते. त्यामुळे ते अत्यंत रहस्यमय पद्धतीने रहायचे. सामान्य लोकांना त्यांचा चेहरा सुद्धा दिसायचा नाही. वेळोवेळी ते आपले घर बदलत असायचे. ऐवढेच नव्हे तर त्यांचे खासगी सेवक सुद्धा काही महिन्यातच बदल रहायचे. परंतु तेव्हा सुद्धा सर्व काही ठिक होते. पण गुमनामी बाबांच्या मृत्यूनंतर संशय आणि प्रश्न निर्माण होऊ लागले.
फैजाबाद शहरातील सिव्हिल लाइंन्स येथील राम भवनात गुमनामी बाबांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांच्या मृत्यूनंतर जेव्हा सेवकांनी घराची झडती घेतली तेव्हा पहिल्यांदाच एक अफवा अशी आली की ती देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचली गेली. खरंतर काही बॉक्समध्ये बंद असलेले काही सामान बाहेर काढण्यात आले तेव्हा अचानक चर्चा सुरु झाली की, गुमनामी बाबा दुसरे कोणीही नसून नेताजी सुभाष चंद्र बोस होते.
हे देखील वाचा- कारगिल विजय दिवस! तीन दिवस युद्धभूमीवर राहिले होते अटलजी…

आता प्रश्न असा होता की, जर नेताजीच गुमनामी बाबा होते तर १९४५ मध्ये झालेल्या विमान अपघातात कोणाचा मृत्यू झाला होता? कारण भारत सरकारने आतापर्यंत असे सांगत होती की, नेतीजींचा मृत्यू विमान अपघातात झाला आहे. अखेर ते समान काय होते जे गुमनामी बाबांना नेताजी असल्याचे म्हटले जात होते? खरंतर जे सामान गुमनामी बाबा (Gumnami baba) यांच्याकडे मिळाले होते त्यामध्ये कोलकातामधील प्रत्येक वर्षी २३ जानेवारीला साजरा केल्या जाणाऱ्या नेताजींच्या जन्मोत्सवाचे फोटो होते. लीली रॉय यांच्या मृत्यूवेळी झालेल्या शोक सभांचे फोटो सुद्धा होते. नेताजींसारखेच काही चष्मे सुद्धा होते. ५५५ सिगरेट आणि परदेशी दारु सुद्धा होती. सुभाष चंद्र बोस यांच्या आई-वडिलांचे आणि परिवाराची खासगी फोटो सुद्धा होते. एक रोलेक्स घड्याळ सुद्धा होते आणि आजाद हिंद फौज सेनेचा एक युनिफॉर्म सुद्धा होता.
ऐवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी नेताजींच्या विमानाचा अपघात झाला त्याचे काही नकाशे सुद्धा होते. आजाद हिंद फौजेचे गुप्तचर शाखेचे प्रमुख पवित्र मोहन रॉय यांना लिहिलेले शुभेच्छा पत्र सुद्धा त्यात होती. जेव्हा हे सर्व सामान एकत्रित जप्त करण्यात आले तेव्हा हळूहळू गुमनामी बाबांच्या कथा फार प्रसिद्ध होऊ लागल्या.
तर फैजाबाद मधील स्थानिक लोकांच्या मते गुमनामी बाबा किंवा भगवानजी ७० च्या दशकात तेथे पोहचले होते. सुरुवातीला ते अयोध्येतील लालकोठी मध्ये भाडोत्री म्हणून राहत होते. त्यानंतर काही दिवसानंतर ते वस्तीत जाऊन राहू लागले. परंतु त्यांना तेथील परिस्थिती पटली नाही आणि गुमनामी बाबा (Gumnami baba) पुन्हा अयोध्येत येत पंडित रामकिशोर पंडा यांच्या घरी राहू लागले होते. त्यानंतर काही वर्षांनी ते अयोध्येतील भाजी मार्केटच्या मधोमध लखनऊवा हाता येथे ते गुप्त पद्धतीने राहिले.
आयुष्याच्या अखेरच्या काळात ते फैजाबाद मधील राम भवनातील दोन खोल्यांच्या एका घरात राहत होते आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. गुमनामी बाबांच्या मृत्यूनंतर जे काही सामान मिळाले त्यावरुन लोकांना तेच सुभाष चंद्र बोस असल्याचे वाटू लागले. असे सांगितले जाते की, जेव्हा गुमनामी बाबांच्या मृत्यूची बातमी पसरु लागली तेव्हा नेताजींची भाची ललिता बोस कोलकाता येथून फैजाबाद येथे आल्या होत्या. तेव्हा त्यांनी सुद्धा बंद बॉक्समध्ये मिळालेले सामान पाहिले तेव्हा ते पाहून त्या सुद्धा हैराण झाल्या आणि ते सर्व सामान आपल्या काकांचेच असल्याचे त्यांनी म्हटले. त्यानंतर गुमनामी बाबा हेच नेताजी असल्याचा तपास करण्यासाठी काही ठिकाणी आंदोलन ही झाली आणि ती दीर्घकाळ चालली.