Home » गुजरातमधील ऐतिहासिक शहर चंपानेर, जाणून घ्या खासियत

गुजरातमधील ऐतिहासिक शहर चंपानेर, जाणून घ्या खासियत

पावसाळ्यात ऐतिहासिक ठिकाणी फिरण्याची एक वेगळीच मजा असते. भारतातील प्रत्येक राज्याची आपली एक वेगळी ओखळ आहे. अशातच गुजरातमधील ऐतिहासिक शहर म्हणून ओखळल्या जाणाऱ्या चंपानेरबद्दल जाणून घेऊया.

by Team Gajawaja
0 comment
gujarat champaner
Share

Gujrat Champaner : पश्चिम भारतातील व्यापाराचे राज्य म्हणजे गुजरातमधील युनेस्कोद्वारे संरक्षित करण्यात आलेले शहर चंपानेर आहे. चंपानेर शहर पंचमहल जिल्ह्यात स्थित आहे. या शहराला कधीकाळी गुजरातची राधनाची होण्याचा मान मिळाला होता. इतिहासकारांनुसार, 8 व्या शतकात चावडा शासक राजा वनराज चावडा यांनी चंपानेर शहर वसवले आणि विकसित केले. वनराज चावडा यांनी आपला सेनापती चंपाच्या नावावरुन शहराला चंपानेर नाव ठेवले होते.

15 व्या शतकाच्या सुरुवातीला चंपानेर शहरावर राजस्थानचे शासक चौहान राजपुतांनी विजय मिळवला होता. 1482 मध्ये गुजरातमधी युवा सुल्तान महमूद बेगडा यांनी युद्ध जिंकून चंपानेरवर विजय मिळवला होता. यानंतर सुल्तान महमूद बेगडाने पावागढ किल्ल्यावर आक्रमण करण्यासाठी घेराबंदी सुरु करत पावागढवर विजय मिळवला होता. आपल्या शासनकाळात सुल्तान महमूदने पावागढने नाव बदलून मुहम्मदाबाद केले आणि गुजरातची राजधानीला अहमदाबाद येथून मुहम्मदाबाद स्थानांतरित केले होते. यादरम्यान, सुल्तानने काही ऐतिसाहिक इमारतींची उभारणी केली. त्यामध्ये चंपानेरमधील जामा मस्जिदचा समावेश आहे.

जामा मस्जिद
जामा मस्जिदची वास्तुकला अत्यंत सुंदर आहे. यामध्ये एक घुमट असून मस्जिदच्या दोन्ही बाजूला मीनारे आहेत. यांची उंची 30 मीटर आहे. जामा मस्जिदमध्ये 172 खांबे असून त्यावर सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. याच्या दरवाज्यावरही आकर्षक नक्षीकाम देखील आहे. मुघल शासन काळादरम्यान बादशाह हुमायूने गुजरातचे बादशाह बहादुर शाह यांना पळ काढण्यास मजबूर केले होते. यानंतर चंपानेरसह पावागढाच्या किल्लावरही ताबा मिळवला होता. पावागढ किल्ला एका पहाडावर आहे.

कालिका माता मंदिर
चंपानेर शहर आपल्या पुरातात्विक, ऐतिहासिक महत्व आहे. 16 व्या शतकात गुजरात राज्याची राजधानी असल्याचे अवशेष आजही तेथे आहेत. याशिवाय 8व्या ते 14 व्या शतकापर्यंत ऐतिहासिक अवशेषांमध्ये किल्ला, महल, धार्मिक भवनांचा समावेश आहे.

शक्तीची देवी असणारी कालिका मातेच मंदिर पावागढच्या पहाडावर आहे. हे एक भाविकांसाठी महत्वपूर्ण तीर्थक्षेत्र आहे. शरद आणि चैत्र नवरात्रीवेळी कालिका माताची विशेष पूजा केली जाते. याचे बांधकाम 900 ते 1000 ईसवी सना वेळी करण्यात आले आहे. हे कालिका माता मंदिर पावागढच्या पुरातत्व पार्क येथे आहे. कालिका माता मंदिर दुमजली असून याच्या पहिल्या मजल्यावर सदन शाह नावाची एक सूफी कबर आहे. (Gujrat Champaner)

चंपानेरमधील पर्यटन स्थळे
चंपानेर शहरात पाहण्यासारखी अनेक स्थळे आहेत. येथे जामा मस्जिद, सहर मस्जिद, नागीना मस्जिद, केवडा मस्जिद, लाल गुबंद मस्जिदसह उडन खटोला, सात कमान, अमीर मंजिल, चंपानेर किल्ला, महमूद बेगडाचा किल्ला अशा काही ठिकाणांना भेट देऊ शकता.


आणखी वाचा :
या धरणाचे पृथ्वीलाही ओझे !
राष्ट्रपतींच्या भेटवस्तू खरेदी

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.