Home » गुजरातमध्ये १४० वर्ष जुना हँगिग पुल तुटला, १०० हून अधिक जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये १४० वर्ष जुना हँगिग पुल तुटला, १०० हून अधिक जणांचा मृत्यू

by Team Gajawaja
0 comment
Gujrat Bridge Accident
Share

गुजरात मधील मोरबी जिल्ह्यातील माच्छू नदीवर उभारण्यात आलेला शंभर वर्ष जुना पूल पडल्याची दुर्घटना घडली आहे. पुल अचानक तुटल्याने पुलावरील लोक एकदम नदीच्या पाण्यात पडली. या दुर्घटनेत जवळजवळ १३५ लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच जवळजवळ १०० लोक जखमी झाले आहेत. असे सांगितले जात आहे की, दुर्घटनेवेळी पुलावर क्षमतेपेक्षा अधिक लोक उभी होती. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्याचसोबत यामध्ये मृतांच्या परिवाराला ४ लाख आणि जखमींना ५० हजाराची मदत जाहीर करण्यात आली आहे.(Gujrat Bridge Accident)

अधिकाऱ्यांनी असे सांगितले की, नुकतीच या पुलाची डागडुजी करण्यात आली होती. त्यानंतर तो नागरिकांसाठी पुन्हा सुरु करण्यात आला होता. पण क्षमतेपेक्षा अधिक लोक त्या पुलावर उभी राहिल्याने ही दुर्घटना घडली आहे. अद्याप त्याच ठिकाणी बचाव कार्य ही सुरु आहे. प्रत्यक्षदर्शींनी असे म्हटले की, ज्यावेळी पुल तुटला तेव्हा त्यावर काही महिला आणि मुलं होती. अपघातानंतर लोकांना रुग्णालयात पोहचण्यासाठी रुग्णवाहिका वेळीच आल्यानंतर तातडीने पोहचवण्यात आले.

Gujrat Bridge Accident
Gujrat Bridge Accident

बचाव आणि मदत कार्य सुरु
गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी असे म्हटले की, मोरबी मध्ये सस्पेंशन ब्रिज दुर्घटनेप्रकरणी मी दु:खी आहे. या ठिकाणी सध्या बचाव आणि मदत कार्य वेगाने सुरु आहे. जखमींना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या संबंधित जिल्हा प्रशासनासोबत सातत्याने संपर्कात असल्याचे ही पटेल यांनी म्हटले आहे.

१८८० मध्ये तयार झाला होता पुल
दरम्यान, या ब्रिजचे उद्घाटन २० फेब्रुवारी १९७९ मध्ये मुंबईचे गर्वनर श्री रिचर्ड टेम्पल यांनी केले होते. त्यावेळी हा पुल जवळजवळ ३.५ लाख रुपयांच्या खर्ताच १८८० मध्ये तयार झाला होता. सस्पेंशन पूल दरबारगढ ते नजरबाग येथ पर्यंत जोडण्यात आला होता. यामध्ये लागणारे दोरखंड हे इंग्लंड वरुन मागवण्यात आले होते. नुकतीच याची डागडुजी ही करण्यात आली होती. ज्यावर २ कोटी रुपयांचा खर्च केला गेला होता. (Gujrat Bridge Accident)

हे देखील वाचा- साउथ कोरियात हॅलोविन पार्टीत मृत्यू तांडव, गर्दीमुळे शंभराहून अधिक बळी

याच महिन्यात आणखी एक हँगिग पुल तुटलाय
याआधी १४ ऑक्टोंबरला दक्षिण गोव्यात दूग्धसागर धबधब्याच्या पाण्यातून ४० हून अधिक जणांना वाचवण्यात आले होते. कारण जबरदस्त पावसामुळे येथील एक पुल टुटला होता. ही घटना १४ ऑक्टोंबरच्या संध्याकाळी गोवा-कर्नाटक सीमेवर जबरदस्त पाऊस झाल्यामुळे झाली होती.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.