Grapes Washing Tips : द्राक्ष असे फळ आहे जे बाराही महिने मिळते. लाल, काळ्या किंवा हिरव्या रंगातील द्राक्षे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. यामध्ये भरपूर प्रमाणात पोषण तत्त्वे असतात. पण याचे सेवन करताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. सध्या मार्केटमध्ये फळं पिकवण्यासाठी किटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामुळे मार्केटमधून आणलेली द्राक्षे केवळ पाण्याने धुवून खाता का? पुढील माहिती जरुर वाचा.
द्राक्षांवरील किटकनाशके हटवण्याची सोपी पद्धत
तुम्ही मार्केटमधून द्राक्षे खरेदी करून आणली असल्यास ती केवळ पाण्याने धुवून खाण्याची चूक करू नका. कारण द्राक्षांच्या वाढीसाठी त्यावर मोठ्या प्रमाणात किटकनाशकांचा वापर केला जातो. द्राक्षांवरील किटकनाशके दूर करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात द्राक्षे काढा. त्यामध्ये पाणी टाकत दोन चमचे डिस्टिल्ट व्हिनेगर किंवा अॅप्पल सायडर व्हिनेगर मिक्स करा. यामध्ये द्राक्षे दहा ते पंधरा मिनिटे राहू द्या. अशाप्रकारे द्राक्षांवरील किटकनाशके दूर होण्यास मदत होईल. (Grapes Washing Tips)
-दुसरा पर्याय असा की, एका भांड्यात पाणी भरा. आता त्यामध्ये दोन चमचे सी सॉल्ट आणि दोन चमचे बेकिंग सोडा मिक्स करा. आता द्राक्षे टाका आणि ती त्यामध्ये पाच मिनिटे भिजू द्या. यानंतर स्वच्छ पाण्याने द्राक्षे पुन्हा धुवून घ्या.
View this post on Instagram