लग्न हा आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वाचा मोठा क्षण असतो. यासाठी वेगवेगळी स्वप्न पाहिली जातात. लग्नाच्या आठवणी कायम लक्षात राहण्यासाठी कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली जात नाही. जगात एकापेक्षा एक महागडे विवाहसोहळे पार पाडले जातात. यातच आणखी एक भर पडली आहे. खरंतर या लग्नसोहळ्याला यंदाच्या वर्षातील सर्वाधिक महागे रूप आले आहे. याचीच सर्वत्र चर्चा होत आहे.(Grand wedding)
भारतात देखील महागडे विवाहसोहळे झाले. परदेशातून काही नातेवाईक देखील भारतात डेस्टिनेशन वेडिंसाठी येतात. तर काही नातेवाईक परदेशात लग्नासाठी जातात. पण ज्या महागड्या लग्नसोहळ्याबद्दल बोलत आहोत त्यासाठी तब्बल 500 कोटींचा खर्च करण्यात आला.
मुलीच्या लग्नासाठी पाण्यासारखा खर्च केला पैसा
जगभरातील बहुतांश परिवार लग्नासाठी बक्कळ खर्च करतात. याच पार्श्वभूमीवर, पॅरिसमध्ये एक जबरदस्त विवाह सेलिब्रेशन झाले. याचा अंदाज या गोष्टीवरून लावला जातो की, यासाठी तब्बल 500 कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला.
26 वर्षीय मॅडेलाइन ब्रॉकवे असे नवंवधूचे नाव असून तिच्या वडिलांनी लग्नासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. अमेरिकेत ब्रॉकवे परिवाराचा कार डिलरशिपचा व्यवसाय आहे. मॅडेलाइन ब्रॉकवेने पॅरिसमध्ये भव्यदिव्य विवाहसोहळा प्रियकर जॅकब लाग्नोनसोबत केला. पण या लग्नसोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Grand wedding)
7 दिवस सुरू होता विवाहसोहळा
वेडिंग सेलिब्रेशन जवळजवळ सात दिवस सुरू होते. या लग्नासाठी करण्यात आलेली व्यवस्था पाहून सर्वजण हैराण झाले. मॅडेलाइन आणि जॅकबने एक सुंदर ड्रेस परिधान केला होता. वेडिंग प्रोग्रामसाठी वर्सेल्सच्या प्रतिष्ठित पॅलेसमध्ये बुकिंग करण्यात आले होते. या पॅलेसमध्ये एका रात्रीचे भाडे 2 ते 11 लाखांपर्यंत आहे. या पॅलेसमध्ये सर्व पाहुण्यांना प्रायव्हेट जेटने आणले गेले होते. मॅडेलाइन आणि जॅकब यांनी 18 नोव्हेंबरलाच लग्न केले. मॅडेलाइन ब्रॉकवेने सोशल मीडियात तिच्या भव्य लग्नसोहळ्याचे व्हिडीओ आणि फोटो शेअर केल्याने ते तुफान व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
या लग्नासाठी नवंवधूचे वडील रॉबर्ट बॉब ब्रॉकवे यांनी बक्कळ पैसा खर्च केला. मुलीचा विवाहसोहळा लक्षात राहण्यासाठी सर्व व्यवस्था केली होती. बॉब ब्रॉकवे, कार डीलरशिप इंडस्ट्रीमध्ये एका मोठ्या पदावर आहेत. जे बिल नर्सरी मोटर्सचे सीईओ आणि अध्यक्ष आहेत.
हेही वाचा: त्रियुगी नारायण मंदिर सध्याचे आवडते वेडिंग डेस्टिनेशन…