Home » उत्तराखंडातील गोपीनाथ मंदिर झुकल्यानं खळबळ…

उत्तराखंडातील गोपीनाथ मंदिर झुकल्यानं खळबळ…

by Team Gajawaja
0 comment
Gopinath Temple
Share

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील मुख्यालय असलेल्या गोपेश्वर येथील प्रसिद्ध गोपीनाथ मंदिराच्या (Gopinath Temple) गाभार्‍यात पाणी गळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली असलेले गोपीनाथ मंदिर नगारा शैलीत बांधण्यात आले आहे. मंदिर बांधण्याची शैली हिमाद्री शैली म्हणूनही ओळखली जाते. गोपीनाथ मंदिर 9 व्या ते 11 व्या शतकादरम्यान कात्युरी शासकांनी बांधले गेल्याचे सांगण्यात येते. गोपीनाथ मंदिर (Gopinath Temple) हे भगवान शंकराला समर्पित असे मंदिर आहे. अत्यंत प्राचिन अशा या मंदिराला भेट देण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक येथे येतात. या मंदिराच्या गाभा-यातही पाणी साचले आहे. तसेच या मंदिराभोवती भेगा पडल्यानं खळबळ उडाली आहे. या मंदिरात गेल्या काही वर्षापासून बदल होत आहेत, पण आता थेट गोपीनाथ मंदिराच्या (Gopinath Temple) गाभा-यातच पाणी शिरल्यानं पुजारी भयभीत झाले आहेत. ही घटना म्हणजे, भविष्यात होणा-या अघटीत घटनांची सुरुवात असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरु झाली आहे. मात्र सततची होणारी अतिवृष्टी आणि भूपातळीमध्ये होणा-या हालचाली यामुळे या मंदिराच्या परिसरात भेगा पडत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या भेगांमुळेच मंदिराला नुकसान झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.  

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या गोपेश्वरमध्ये असलेल्या गोपीनाथ मंदिर (Gopinath Temple) हे भक्तांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात भाविकांची कायम गर्दी असते. मात्र गेल्या काही वर्षापासून  काही बदल होत असल्याचे स्थानिक पुजारी सांगतात. याबाबत स्थानिकांनी पुरातत्व विभागालीही माहिती दिली आहे. त्यातून पुरातत्व विभागानं या भागाची पाहणीही केली आहे. मात्र यावर्षीच्या पावसाळ्याची सुरुवात होतानाच या मंदिरात गळती सुरु झाली आहे आणि हे मंदिर एका बाजुला झुकल्याचे स्पष्ट झाले आहे.  

गोपीनाथ मंदिराचे (Gopinath Temple) गर्भगृह 30 स्क्वेअर फूट पसरलेले आहे. या मंदिराची ओळख ही रुद्रनाथ भगवानांचे हिवाळी आसन म्हणून आहे. या मंदिराची जबाबदारी पुरातत्व विभागाकडे देण्यात आली आहे. आता या मंदिराच्या गाभा-यात पाणी साचल्यानं प्रशासनानं याबाबत गंभीर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. या भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. गोपीनाथ मंदिर (Gopinath Temple) हे भगवान शंकराला समर्पित असे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर त्याच्या भव्यतेमुळेही ओळखले जाते. या मंदिरचा घुमट अतिशय प्रशस्त असून मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी अनेक दरवाजे आहेत. या गोपीनाथ मंदिराच्या परिसरात अनेक मुर्ती आहेत. या मुर्ती तुटलेल्या अवस्थेत आहेत.  या मुर्तींची येथे प्राचीन काळी मंदिरे होती अशी माहिती स्थानिक देतात. या मुर्ती तुटलेल्या अवस्थेत असून त्यांची जोपासना पुरातत्व विभागातर्फे करण्यात येत आहे.  

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील मुख्यालय असलेल्या गोपेश्वर येथे अनेक पुरातन मंदिरे आहेत. यापैकीच गोपीनाथ मंदिर एक आहे.  मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग स्थापित केले आहे. या मंदिरात परशुराम आणि भैरवजींची मूर्तीही आहे. मंदिरापासून काही अंतरावर वैतरणी नावाचे कुंड आहे. या मंदिरात हिवाळ्यात रुद्रनाथजींची उत्सवमूर्तीही बसते. उत्तराखंडमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च मंदिर असाही या मंदिराला मान आहे. मंदिराच्या प्रदक्षिणा स्थळावर अनेक शिवलिंगे आहेत. भगवान शंकाराचे हे मंदिर त्याच्या स्थापत्यशैलीसाठीही ओळखले जाते. या मंदिराच्या परिसरात 5 मीटर उंच त्रिशूळ आहे. भगवान शंकराच्या भक्तांसाठी हे त्रिशूळ श्रद्धेचे स्थान आहे. हे त्रिशूल 12 व्या शतकातील असल्याचे सांगण्यात येते. या त्रिशूळाची निर्मिती अष्टधातूपासून झाली आहे. त्यामुळे कोणत्याही ऋतुचा या त्रिशुळावर परिणाम होत नाही. 13व्या शतकात नेपाळच्या राजा अनेकमल्लाची स्तुती करणारे शिलालेखही या भागात आहेत. यावर या त्रिशुळाची माहितीही आहे.  देवनागरी लिपीमध्ये लिहिलेले असे चार शिलालेख या मंदिर परिसरात आहेत. त्यापैकी तीन शिलालेखांचा उलगडा करण्यात आला आहे.  त्यावरुन या गोपीनाथ मंदिराचे (Gopinath Temple) पुरातन महत्त्व उलगडले आहे.  

=========

हे देखील वाचा : 2025 मध्ये होणा-या महाकुंभाची तयारी सुरु

=========

या गोपीनाथ मंदिरातील (Gopinath Temple) त्रिशुळाबाबत अनेक कथा सांगण्यात येतात. कामदेवाला मारण्यासाठी भगवान शंकरानं त्रिशूळ मारला होता, तो हाच त्रिशूळ असल्याचे सांगण्यात येते. या त्रिशुळावर हवामानाचा कोणताही परिणाम होत नाही आणि हा एक चमत्कार असल्याचे सांगण्यात येते.  आणखी एक म्हणजे, हा त्रिशूळ हलवण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र ते फोल ठरले आहेत. गोपीनाथ मंदिर हे बद्रीनाथ धाम आणि केदारनाथ धामच्या मार्गावरील प्रमुख मंदिर आहे. आता सुरु होणा-या श्रावण महिन्यात कावड यात्रेकरुंची गर्दी या मंदिरात अधिक असते. हेच अत्यंत पवित्र गोपीनाथ मंदिर एकाबाजुला झुकल्यानं भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.