सकाळच्या गुड मॉर्निंगच्या सुविचारापासून ते रात्रीच्या जेवणाच्या ऑर्डरपर्यंत, बातम्या वाचण्यापासून पत्ता शोधण्यापर्यंत, दिवसभरात कितीतरी गोष्टींसाठी आपण ‘गुगल’ वापरत असतो. गुगलसुद्धा कोण, कधी आणि काय सर्च करतंय यावर बारीक लक्ष ठेवून असतं, बरं का! नुकतीच गुगलने गेल्या वर्षभरात भारतात झालेले ‘टॉप १० सर्च ट्रेंड्स’ कुठले होते, याची यादी जाहीर केली आहे (Google searches in India 2021).
गुगलने प्रकाशित केलेली ही यादी एकूण ९ भागांमध्ये विभागली असून प्रत्येक भागाचे टॉप १० सर्च ट्रेंड्स जाहीर केले आहेत. त्यापैकी सुरुवातीचे दोन महत्वाच्या म्हणजे ओव्हरऑल सर्च आणि निअर मी या विभागांमधील टॉप १० सर्च कोणते आहेत, याची आपण माहिती घेऊया (Google searches in India).
१. ओव्हरऑल (Overall)
ओव्हरऑल म्हणजे भारतीय नागरिकांनी गुगलवर सर्वात जास्त सर्च केलेल्या गोष्टी. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या यादीवर कोरोना नाही, तर क्रीडाजगताचं वर्चस्व आहे.
१. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही भारतीय लोकांनी गुगलवर सर्वात जास्त सर्च केलं ते आयपीएल- IPL अर्थात (Indian Premier League). त्यामुळे या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे ‘आयपील’.
२. दुसऱ्या नंबरवर आहे भारतामध्ये कोरोना लसीकरणासाठी तयार करण्यात आलेला ‘COWIN’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म
३. भारतीय नागरिक क्रिकेटसाठी प्रचंड वेडे आहेत, हे यादीतील तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रेंडने दाखवून दिले आहे. कारण तिसऱ्या क्रमांकावर आहे ‘ICC T20 World Cup’
४. भारतात फुटबॉल प्रेमींची संख्याही काही कमी नाही. क्रिकेट प्रेमींपेक्षा तुलनेने यांची संख्या कमी असली तरी त्यांना अगदीच दुर्लक्षित करून चालणार नाही. कारण टॉप सर्च रिझल्टमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे ‘युरोपिअन फ़ुटबाँल चॅम्पियनशिप अर्थात Euro cup’.
५. पाचवा क्रमांक अनेकांना आश्चर्यचकित करणारा आहे. कारण ग्लोबल सर्च ट्रेंड्सच्या यादीत स्थान न मिळालेला ‘टोकियो ऑलिम्पिक’ भारतात चक्क पाचव्या स्थानावर आहे.
६. सहाव्या क्रमांकावर आहे आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय ‘कोरोना व्हॅक्सिन (COVID vaccine)’.
७. सातव्या क्रमांकाचा सर्च रिझल्ट सर्वात जास्त थक्क करणारा आहे. कारण या क्रमांकावर आहे, लोकप्रिय गेम ‘फ्री फायर’चा रिडिम कोड (Free Fire redeem code).
८. फुटबॉल प्रेमीही क्रिकेटप्रेमींच्या तोडीस तोड आहेत बरं का! कारण आठव्या क्रमांकावर आहे ‘कोपा अमेरिका’ (COPA America) अर्थात साऊथ अमेरिकन फुटबॉल चॅम्पियनशिप.
९. नवव्या क्रमांकावर आहे ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणारा देशाचा खराखुरा हिरो ‘नीरज चोप्रा’.
१०. गुगलच्या ओव्हरऑल सर्च रिझल्टच्या टॉप १० मधलं शेवटचं नाव आहे ड्रग्ज प्रकरणात अडकलेला बॉलिवूडच्या किंग खानचा मुलगा ‘आर्यन खान’.
२. निअर मी (Near me)
आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टीं आपल्या आसपास कुठे आहेत , हे देखील आपण गुगलवर सर्च करतो. या यादीमधले ट्रेंड्स मात्र भारतातील नागरिकांवर झालेला कोरोनाचा परिणाम स्पष्ट करतायत.
१. ‘निअर मी’ या विभागामध्ये सर्वात जास्त सर्च झालं आहे नजीकचे लसीकरण केंद्र अर्थात “COVID vaccine near me”.
२. दुसऱ्या क्रमांकावर आहे नजीकचे कोव्हीड टेस्ट सेंटर (COVID test near me).
३. कोरोनाचा परिणाम हॉटेलिंगवरही झाला. परंतु, होम डिलिव्हरीची सर्व्हिस सुरु असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आणि नजीकचा फूड डिलिव्हरी पर्याय म्हणजेच ‘Food delivery near me’ या सर्चने या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे.
४. चौथा क्रमांक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आलेली भीषण परिस्थिती अधोरेखीत करतोय कारण ऑक्सिजन सिलेंडरची उपलब्धता शोधण्यासाठी हतबल नागरिकांनी अखेर गुगलचा आधार घेऊन त्यावर Oxygen cylinder near me सर्च केलं.
५. दुसरी लाट खूपच भयानक होती. त्यामुळे नजीकचे कोव्हीड हॉस्पिटल शोधण्यासाठीची धडपड अधोरेखित करणारा Covid hospital near me हा सर्च ट्रेंड पाचव्या क्रमांकावर आहे.
६. या काळात कोव्हीड पेशंट्स आणि त्यांच्या नातेवाईकांनी टिफिन सर्व्हिसेसचाही शोध मोठ्या प्रमाणावर घेतला, तसेच जूननंतर हळूहळू ऑफिसेस सुरु झाल्यामुळेही लोकांनी टिफिन सर्व्हिसेसचा शोध घेतला. त्यामुळे सहाव्या क्रमांकाचा सर्च रिझल्ट आहे – Tiffin service near me हा सर्च ट्रेंड सहाव्या क्रमांकावर आहे.
७. सातव्या क्रमांकावर आहे, कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणारी चाचणी ‘सिटी स्कॅन टेस्ट’ करण्यासाठी केलेला सर्च CT scan near me.
८. दुसरी लाट ओसरल्यावर जनजीवन पूर्वपदावर येत असताना सर्च झालेला Takeout restaurants near me हा सर्च रिझल्ट आठव्या क्रमांकावर आहे.
हे ही वाचा: ‘आर्या (Aarya)’ – या वेबसिरिजने केवळ करिअरच नाही तर, सुश्मिताच्या आयुष्यातही बदल घडवला
९. कोव्हिडची दुसरी लाट ओसरून पुन्हा एकदा जनजीवन सुरळीत होत असल्याचा पुरावा म्हणजे नवव्या क्रमांकावरचा सर्च रिझल्ट ‘Fastag near me’.
हे सुद्धा वाचा: जगातील सर्वात पहिला कम्प्युटर व्हायरस पाकिस्तान मधील ‘या’ दोन पठ्ठ्यांनी बनवला होता
१०. बसच्या संपामुळे म्हणा किंवा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक वाहनातून प्रवास करायची भीती वाटत असल्यामुळे म्हणा, पण नागरिक स्वतंत्र वाहनाचा पर्याय निवडत आहेत. म्हणूनच या विभागातील शेवटचा सर्च रिझल्ट आहे, नजीकचे ड्राइविंग स्कुल (Driving school near me).
तर, हे होते भारतीयांनी सर्च केलेले ट्रेंड्स. या व्यतिरिक्त अजूनही सात विभाग आहेत. ते म्हणजे- How to, What is, व्यक्तिमत्व, रेसिपीज, स्पोर्ट्स इव्हेंट्स, मुव्हीज आणि न्यूज इव्हेंट्स.