Home » PIN शिवाय करता येईल गुगल पे वर पेमेंट

PIN शिवाय करता येईल गुगल पे वर पेमेंट

by Team Gajawaja
0 comment
Google Pay payment
Share

जर तुम्ही युपीआय पेमेट प्लॅटफॉर्म फोनपेचा वापर करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. खरंतर गुगल पे युजर्ससाठी युपीआय पेमेंट करणे आता आणखी सोप्पे झाले आहे. खरंतर कंपनीने आपल्या युपीआय लाइट फिचरला रोलआउट केले आहे. त्यामुळे युजर्सला पिन न टाकता ही २०० रुपयांपर्यंतचे पेमेंट करता येणार आहे. नुकत्याच पेटीएम आणि फोनपे कडून हे फिचर सुरु करण्यात आले आहे. (Google pay payment)

युपीआय लाइटला सप्टेंबर २०२२ मध्ये भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या द्वारे लो-वॅल्यूचे युपीआय पेमेंटला वेग मिळावा आणि ही प्रक्रिया सोप्पी व्हावी म्हणून लॉन्च केले होते. युपीआय लाइटच्या माध्ममातून तुम्ही दररोज होणारे लहान-लहान ट्रांजेक्शन करु शकता.

२०० रुपयांपर्यंतच्या ट्रांजेक्शनवर पिनची गरज नाही
युपीआय लाइट वॉलेट युजर्सला २०० रुपयांपर्यंतच्या इंस्टंट ट्रांजेक्शनची परवानगी देते. २०० रुपयांपर्यंतच्या ट्रांजेक्शनवर कोणत्याही युपीआय पिनची गरज भासत नाही. यामुळे पेमेंट प्रक्रिया अगदी सोप्पी आणि वेगवान होणार आहे. यामध्ये अधिकाधिक २ हजार रुपये अॅड करता येणार आहेत. तुम्ही २४ तासात युपीआय लाइटच्या माध्यमातून अधिकाधिक ४ हजार रुपयांपर्यंत खर्च करु शकता.

Google Pay वर कसे अॅक्टिव्हेट कराल फिचर
-सर्वात प्रथम गुगल पे सुरु करा
-अॅपच्या होम स्क्रिनवर सर्वात वर डाव्या बाजूला असलेल्या प्रोफाइल पिक्चरवर क्लिक करा
-आता UPI Lite Pay Pin Free वर क्लिक करा आणि गाइडलाइन्सचे पालन करा
-पैसे अॅड केल्यानंतर एक बँक खाते निवडण्याचा पर्याय तु्म्हाला दाखवला जाईल, जो युपीआय लाइटला सपोर्ट करेल
-युपीआय पिन टाकल्यानंतर युपीआय लाइट अकाउंट यशस्वीपणे अॅक्टिव्ह होईल
-लक्षात ठेवा तुम्ही गुगल पे वप केवळ युपीआय लाइट अकाउंटच तयार करु शकता (Google pay payment)

या व्यतिरिक्त युजर्सला डेबिट कार्डशिवाय आपला पिन सेट करता येणार आहे. सध्याच्या काळात ही सुविधा बँक अकाउंट होल्डर्ससाठी सुरु करण्यात आली आहे. UIDAI च्या डेटानुसार भारतात ९९.९ टक्क्यांहून अधिक लोकांकडे आधार काड्र आहे. ते महिन्यातून कमीत कमी एकदा तरी त्याचा वापर करतात. गुगलने असे म्हटले की, युपीआयवर आधार आधारित ऑनबोर्डिंग सुविधा मोठ्या संख्येने युजर्सला प्राप्त व्हावी म्हणून सुरु करण्यात आले आहे.

हेही वाचा- आर्थिक चणचणीपासून दूर राहण्यासाठी असे करा प्लॅनिंग

तर आधार बेस्ड युपीआयसाठी युजर्सला आधार आणि बँक खाते एकमेकांना लिंक असावे. म्हणजेच एक क्रमांक दोन्ही ठिकाणी असावा. त्यानंतर युजर्स गुगल पे वर डेबिट कार्ड किंवा आधार बेस्ड युपीआय ऑनबोर्डिंगदरम्यान निवडू शकतात. आधारचा ऑप्शन निवडल्यानंर आपल्या आधार कार्डचे सुरुवातीचे ६ अंक इंटर करावे लागतील. त्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल.त्यानंतर आपला युपीआय पीन सेट करता येईल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.