जर तुम्ही पेमेंट अॅप गुगल पे चा वापर करत असाल तर काही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आपण अज्ञातपणे काही अशा चुका करतो त्यानंतर आपल्याला भारी पडतात. तुम्हाला माहितेय का, गुगल पे सोबत लिंक असलेले तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते? (Google pay)
तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली तर याच्या नुकसानीपासून दूर राहू शकता. तुम्ही काही वेळेस ऐकले किंवा वाचले असे गुगल वेळोवेळी प्ले स्टोरवर अॅप रिमूव करतो. कारण असे अॅप जे युजर्सच्या प्रायव्हेसी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव धोकादायक असतात. जर तुमचे सुद्धा गुगल पे अकाउंट एखाद्या अशा अॅपशी लिंक असेल जे धोकादायक आहे तर तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.
अशातच तुम्ही एखाद्या असुरक्षित अॅप सोबत तुमचे गुगल पे अकाउंट लिंक केले असेल तर फोनमधून ते अॅप तातडीने डिलिट करावे. अॅपला अनइंस्टॉल करण्यापूर्वी अॅप मधून लिंक केलेले अकाउंट रिमूव करणे विसरू नका.
स्वत:ला सुरक्षित ठेवा
एखादी लहानशी चुक सुद्धा तुमचे खाते रिकामे करू शकते. जेव्हा कधी पुढील वेळेस तुम्ही गुगल प्ले स्टोरच्या माध्यमातून एखादे अॅप डाउनलोड करत असाल किंवा APK फाइलच्या माध्यमातून एखादे अॅप इंस्टॉल करत असाल तर तेव्हा कोणतेही पेमेंट अॅप त्यासोबत लिंक करू नका.
ऐवढेच नव्हे तर APK च्या माध्यमातून कोणतेही अॅप इंस्टॉल करू नका, केवळ प्ले स्टोरच्या माध्यमातून ही अॅप इंस्टॉल करू शकतात. अॅप डाउनलोड करण्यापूर्वी युजर्सने रिव्हू आणि रेटिंग्स उत्तमपणे वाचावेत. जर गुगल पे वर एखादी समस्या येत असेल किंवा ट्रांजेक्शनसाठी समस्या येत असेल तर कस्टमर केअरशी संपर्क करावा. गुगलच्या अधिकृत साइटवर दिलेल्या क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता. (Google pay)
याव्यतिरिक्त सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे युपीआय पेमेंट करताना सर्वाधिक महत्वाचे असे की, त्यासाठी वापरला जाणारा चार किंवा सहा अंकी युपीआय पिन. हा फार महत्वाचा आहे कारण पेमेंट करण्यापूर्वी तुम्हाला तो द्यावा लागतो आणि नंतरच तुमचे पेमेंट पूर्ण होते. त्यामुळे हा युपीआय पिन तुम्ही कोणासोबत ही शेअर करु नका. तर युपीआय आयडी तयार करताना तुम्हाला युपीआय पिन जनरेट करावा लागतो.
हेही वाचा- पेमेंट करण्यासाठी QR कोड स्कॅन करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या, अन्यथा होईल फसवणूक