उत्तरप्रदेशच्या अयोध्येमधून श्रीराम (Shri Ram) भक्तांसाठी एक खुशखबर आली आहे. अयोध्येमधील भव्य अशा श्रीराम मंदिरात रामलल्लांची प्रतिष्ठापना कधी होणार याची उत्सुकता होती. मात्र आता श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक निमंत्रण पाठवले आहे. हे निमंत्रण आहे प्रभू रामांच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे. पुढील वर्षी 22 जानेवरी रोजी हा भव्य सोहळा होणार आहे. या सोहळ्याची प्रतिष्ठा जगभरातील रामभक्तांना आहे. हा भव्य सोहळा अयोध्येतील श्रीराम (Shri Ram) मंदिरात 22 जानेवारी रोजी होणार असून त्या सोहळ्याच्या तयारीसाठी संक्रातीपासूनच म्हणजे, 14 जानेवारीपासून अयोध्यानगरीमध्ये विविध सोहळे होणार आहेत. या सोहळ्यासाठी जगभरातून रामभक्त अयोध्येत येणार असल्यानं स्थानिक प्रशासनानं आतापासून या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून तयारी सुरु केली आहे.
2024 हे वर्ष प्रभू रामाच्या (Shri Ram) भक्तांसाठी खास ठरणार आहे. या नव्या वर्षात अयोध्येतील भव्य असे राममंदिर रामभक्तांसाठी खुले होणार आहे. या नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात सर्व अयोध्यानगरी रामभक्तीमध्ये लीन होणार आहे. कारण 22 जानेवारी रोजी राममंदिरात प्रभू रामांच्या मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यासाठी तमाम अयोध्या नगरीला उत्सवाचे स्वरुप प्राप्त होणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या तारखेची घोषणा झाली असून त्यामुळे प्रभूरामाच्या भक्तांनी आनंद व्यक्त केला आहे. हा सर्व सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत रामलल्लांचा अभिषेक करणार आहेत.

अयोध्येत उभारण्यात येणा-या श्रीराममंदिराचे सूंपूर्ण काम पूर्ण व्हायला अजून एक वर्षाचा अवधी असला तरी रामभक्तांसाठी या मंदिराचा मुख्य भाग खुला करण्यात येणार आहे. यामुळे प्रभूरामांचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून येणा-या लाखो भक्तांचा आनंद द्विगुणित होणार आहे. अयोध्येत राम मंदिराच्या गर्भगृहाच्या उभारणीच्या कामाला वेग आला आहे. राम मंदिराचा तळमजला जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. राम मंदिराचे उद्घाटन 2024 मध्ये मकर संक्रांतीनंतर होईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसारच हा समारंभ होईल, हे आता स्पष्ट झाले आहे. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी मकरसंक्रातीपासून विविध पूजाविधी सुरु होणार आहेत. 14 ते 26 जानेवारी दरम्यान अयोध्येतील सर्वच मंदिरात विशेष पुजांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाण श्रीरामचरितमानसचे वाचन करण्यात येणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे या सर्व सोहळ्याचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच पंतप्रधानांसह देशभरातील मान्यवरांना या सोहळ्याचे आमंत्रण पाठवण्यात येणार आहे. शिवाय या सोहळ्यासाठी अनेक साधूसंतही उपस्थित राहणार आहेत. सध्या अयोध्येत प्रभूरामांच्या (Shri Ram) दर्शनासाठी येणारे भक्त रामलल्लांचे दर्शन तात्पुरत्या उभारलेल्या मंदिरातून घेत आहेत. 22 जानेवारीपासून आता प्रभूरामांचे भक्त भव्य अशा मंदिरातून दर्शन घेऊ शकणार आहेत.
अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम गेल्या अनेक दिवसांपासून जोरात सुरू आहे. राममंदिराची उभारणी सुरु झाल्यापासून उत्तरप्रदेशमध्ये धार्मिकस्थानावरील पर्यटनातही लक्षणीय वाढ झाली आहे. अयोध्येत तर काहीवेळा दिवसाला लाखाहून अधिक भाविक भेट देत आहे. यामुळे आसपासच्या सर्वच हॉटेलमध्ये वर्षाचे पूर्ण दिवस भाविकांचा मुक्काम असल्याचे येथील हॉटेल व्यावसायिक सांगतात. राममंदिर भाविकांसाठी खुले झाल्यावर या आकड्यात भर पडणार आहे. यासाठी हॉटेल संघटनेकडूनही व्यापक विचार सुरु आहे. मंदिरच्या आसपासची मोठी घरे ज्यांना भाड्यानं द्यायची आहेत, अशा घरांमध्येही भाविकांना राहण्याची सोय करुन देण्यासाठी आता या भागात प्रयत्न सुरु आहेत. अयोध्येतील श्री राम विमानतळही भव्य असे होत आहे.
=========
हे देखील वाचा : प्रिन्स हॅरीला स्पेअर भोवणार…
=========
सप्टेंबर-ऑक्टोबर 2023 पर्यंत हे विमानतळ पूर्णरुपानं काम करु शकणार आहे. विशेष म्हणजे, अयोध्येत दिवाळीला परदेशी पर्यटक मोठ्या संख्येनं येत आहेत. त्यांच्यासाठी ही विमानसेवा उपयोगी पडणार आहे. दिवाळीपासून सुरु झालेली भाविकांची गर्दी श्रीरामांच्या प्रतिष्ठापना सोहळ्यापर्यंत कायम राहिल असा अंदाज व्यक्त होत आहे. 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू रामलल्ला गर्भगृहात विराजमान होतील. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी उत्तरप्रदेशातील सर्वच मंदिरे सजवण्यात येण्याचा मानस श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. राममंदिरात होणार हा प्राणप्रतिष्ठा सोहळा देशातील विविध ठिकाणी लाईव्ह दाखवण्याची सोय करुन देण्यात यणार आहे. मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी होणा-या गर्दीच्या व्यवस्थापनाबाबतही संपूर्ण तपशीलवार आराखडा तयार करण्यात आला आहे. या राममंदिराचा पहिला मजला ऑक्टोबर 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे. 22 जानेवारी रोजी होणारा मुख्य कार्यक्रम पुढे सात दिवसही होणार आहे. त्यानंतरच रामभक्तांना रामललाच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.
सई बने