जगभरात असे काही शानदार हॉटेल्स आहेत ज्यां पाहून अथवा ज्यांच्याबद्दल ऐकून तुम्ही नेहमीच आश्चर्यचकित होता. अशा हॉटेल्समध्ये तुम्हाला लक्झरी लाइफ जगण्याचा अनुभव मिळतो. एखाद्यामध्ये हेलीपॅड असतो तर गगनचुंबी इमारतीच्या अगदी टॉपला स्विमिंग पूल बांधलेला असते. या हॉटेल्सचे इंटिरियर सुद्धा सुंदर असते. मात्र तुम्ही कधी अशा हॉटेलबद्दल ऐकले आहे का, जे पूर्णपणे सोन्याने तयार केले आहे. खरंतर जगभरात एकमेव असे एक सोन्याचे हॉटेल आहे. (Golden hotel)
सोन्याने तयार करण्यात आलेले हे हॉटेल वियतनामची राजधानी हनोई मध्ये आहे. या हॉटल मधील प्रत्येक गोष्ट ही सोन्याने तयार करण्यात आलेली आहे. म्हणजेच या हॉटेलचे दरवाजे, खिडक्या, वॉशरुम, फर्निचरच नव्हे तर नळ सु्द्धा सोन्याचे आहेत. ऐवढेच नव्हे तर या हॉटेलमधील टेबल्स आणि भांडी सुद्धा सोन्याची आहेत. हॉटेलच्या भिंतींवर सोन्याचा वर्ख लावण्यात आलेला आहे. या हॉटेलचे नाव आहे ‘डोल्से हनोई गोल्डन लेक’. हॉटेल हे २५ मजली असून त्यात ४०० खोल्या आहेत. हॉटेलची संपूर्ण लॉबी सोन्याच्या फर्निचरने सजवण्यात आलेली आहे. येथील प्रत्येक गोष्टीवर कलाकुसर करण्यात आलेली आहे.

golden hotel
डोल्से हनोईचा प्रत्येक कोपरा तुम्हाला आलिशान आयुष्य जगण्याचा अनुभव देतो. येथील खोल्यांमध्ये गोल्ड प्लेटेड वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. एकूणच काय सोन्याचे हॉटेल म्हटले की, सर्वकाही सोन्याचेच आहे.
हॉटेलला एक रुफटॉप इन्फिनिटी स्विमिंग पूल आहे. या पूलमधून तुम्ही शहराचे सौंदर्य पाहू शकता. याची खासियत अशी की, याच्या बाहेरच्या भितींसुद्धा सोन्याने तयार करण्यात आलेल्या आहेत. या शानदार हॉटेलचे बांधकाम २००९ मध्ये सुरु करण्यात आले होते. जवळजवळ ११ वर्षामध्ये याचे बांधकाम पूर्ण झाले. हॉटेल मॅनेजमेंटचे असे मानणे आहे की, सोन्यामुळे मानसिक तणाव दूर होतो. हिच गोष्ट लक्षात घेता या सोन्याच्या हॉटेलचे बांधकाम केले. येथे येऊन लोक शांत आणि आरामाने वेळ घालवू शकतील.
हेही वाचा- इजिप्तचे पिरॅमिड परग्रहींनी बांधले…
होल्से हनोई गोल्डन लेक हॉटेलमध्ये जर तुम्हाला रहायचे असेल तर यासाठी तुम्हाला लाखो रुपये खर्च करावे लागतील.याचे सुरुवातीचे भाडे अधिक नाही. या हॉटेलमध्ये सहा प्रकारच्या खोल्या आणि सहा प्रकारचे सूइट्स आहेत. खोल्यंची सुरुवाती किंमत २३ हजार रुपये प्रति दिवस अशी आहे. डबल बेडरुम सुइट्सचे भाडे ७५ हजार रुपये, प्रेसिडेंशियल सूइट्स ४.८५ लाख रुपये प्रति दिन आहे. या सर्व रुम्सला गोल्डन असे नाव दिले गेले आहे. जर तुम्हाला काहीतरी वेगळे आणि अनोखे पहायचे असेल तर तुम्ही या हॉटेलला नक्की भेट देऊ शकता.