शरिराच्या आतमध्ये जर सोन्याचे धडधड करणारे हृदय आहे असे सांगितले तर तुम्हाला विश्वास बसेल का? जीभ ही सोन्याची आहे. पण यावर कोणीही लगेच विश्वास ठेवणार नाही. परंतु मिस्रच्या असाच एक ममी सापडला असून त्याचे हृदय आणि जीन ही सोन्याची आहे. खास गोष्ट अशी की, या ममीने जवळजवळ २१ प्रकारची ४९ सोन्याची ताबीज घातले आहेत. त्यामुळेच त्याला गोल्डन बॉय ममी (Golden Boy Mummy) असे नाव दिले गेले आहे.
गोल्डन बॉय ममी हा १९१६ मध्ये सापडला होता. तेव्हापासून मिस्रची राजधानी काहिरीच्या मिस्र संग्रहालयात त्याला ठेवण्यात आले. आता काहिरा युनिव्हर्सिटीचे डॉ. सेहर यांनी या ममीचा सिटी स्कॅन केला. त्यामध्ये २१ प्रकारची विविध ४९ ताबीज मिळाले आहेत. तपासात असे ही समोर आले की, हा ममी एक अल्पवयीन आहे. खासीयत अशी की, तो जवळजवळ २३०० वर्ष जुना असल्याचे सांगितले जात आहे.
ममी ही अशी एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये व्यक्तीचे शरिर दीर्घकाळ टिकून राहते. केवळ मनुष्यच नव्हे तर जानवरांचे सुद्धा ममी असतात. प्राचीन मिस्रमध्ये व्यक्तींव्यतिरिक्त मांजर, चिमणी, घोडा, बैल, मगर यांचे सुद्धा ममी तयार केले जायचे. असे म्हटले जाते की, धार्मिक कारणास्तव जनावरांचे ममी तयार केले जायचे.
ममी खरंतर या दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे नैसर्गिक आणि दुसरी आर्टिफिशियल. मिस्रमध्ये जे ममी तयार केले जातात ते आर्टिफिशयल आहेत. खरंतर कोणाचा ही मृत्यू झाल्यानंतर शरिराचे स्वत: हून डिकंपोज होण्यास सुरुवात होते.पोटाच्या आतमध्ये जे बॅक्टेरिया असतात ते आधीच शरिराचे अवयवय संपवतात आणि नंतर हाडं ही संपवतात. मात्र यासाठी गरजेचे असे की, त्यांना ऑक्सिजन मिळाले पाहिजे. मिस्र मध्ये शवांवर केमिकल्स आणि सॉल्डचा लेप लावून यासाठी लेनिनचा कापड गुंडाळला जायचा की, जेणेकरुन सुर्याच्या प्रकाश त्याला मिळावा. यामुळे शरिर ऐवढ्या दिवसापर्यंत सुरक्षित राहते.(Golden Boy Mummy)
हे देखील वाचा- जैसलमेर मधील ‘हे’ किल्ले भुताटकी कथांसाठी आहेत प्रसिद्ध
एक नैसर्गिक ममी म्हणजे, जे ग्लेशियर किंवा वाळवंटात असतात. ते असे स्थान असते जेथे ओलावा किंवा ऑक्सिजन नसते. असे शरिर वर्षानुवर्ष खराब ही होत नाही. नुकत्याच ६०० वर्ष जुनी सांघा टेन्जिनचा ममी मिळाला आहे. ज्यावर कोणत्याही प्रकारचा लेप नाही किंवा शव एकदम सुरक्षित आहे. केवळ प्राचीन मिस्र नव्हेच तर दक्षिण अमेरिकन संस्कृतींव्यतिरिक्त चीन, कॅनरी बेट आणि गोल्चेज मध्ये सुद्धा ममी तयार करण्याची परंपरा आहे.