Home » पावसाळ्यात गोव्याजवळ या 5 ठिकाणी करू शकता ट्रेकिंग

पावसाळ्यात गोव्याजवळ या 5 ठिकाणी करू शकता ट्रेकिंग

गोव्यात पावसाळ्यात फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर काही अनोखी ठिकाणे आहेत. यामुळे ट्रिपची मजा द्विगुणीत होऊ शकते.

by Team Gajawaja
0 comment
Monsoon travel tips
Share

Goa Monsoon Destinations: बहुतांशजणांना पावसाळ्यात गोव्याची ट्रिप करायची असते. येथे देश-विदेशातून टुरिस्ट फिरण्यासाठी येतात. गोव्याला बीचेस ते सी-फूड पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. दरम्यान, गोव्यात बीचेस नव्हे येथे काही अॅडव्हेंचर्स अॅक्टिव्हिटीज देखील करू शकता. यापैकीच एक म्हणजे ट्रेकिंग.

फार कमी जणांना माहिती असते की, गोव्यात टुरिस्टला ट्रेकिंगची मजा लुटता येते. खरंतर, गोव्याजवळ काबी उत्तम ठिकाणे असतात जेथे तुम्ही ट्रेकिंग करू शकता. अशातच पावसाळ्यात पुढील काही ठिकाणी ट्रेकिंग करु शकता.

दूग्धसागर फॉल्स ट्रेक
गोव्यामध्ये ट्रेकिंग करण्याचा विचार करत असल्यास दूग्धसागर फॉल्स ट्रेकचा विचार करू शकता. दूग्धसागर ट्रेक 14 किमी लांब असून घनदाट जंगलातून तुम्हाला जावे लागते. दूग्धसागर गोव्यातील सर्वाधिक उंच वॉटरफॉलपैकी एक आहे. याची उंची 310 मीटर आहे.

नेत्रावली वाइल्डलाइफ सॅन्चुरी
नेत्रावली वाइल्डलाइफ सॅन्चुरी पणजीपासून 65 किमीवर आहे. येथे ट्रेकिंग करण्याची मजा घेऊ शकता. या ठिकाणी सावरी वॉटरफॉल असून जो एक सोपा ट्रेक आहे.

वाघेरी हिल्स
वाघेरी हिल्स वालपोईजवळ पणजीपासून 50 किमी दूरवर आहे. येथे ट्रेकिंग करताना तुम्हाला आसपासच्या घाटातून आणि जंगलातून मनमोहक दृश्यांचा आनंद घेता येऊ शकतो. वाघेरी हिल्सला पहिल्यांदाच ट्रेकिंगला जाणार असाल तर थोडे मुश्किल होऊ शकते.

आरामबोळ ट्रेक 
गोव्याच्या उत्तर भारात केरी येथील आरामबोळ ट्रेक अगदी सुंदर आहे. याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. तुम्ही केरी येथून आरामबोळदरम्यान आणि पालीम हिल पर्यंत ट्रेक करू शकता. या ट्रेकवेळी तुम्हाला अरबी समुद्राचे सौंदर्य पाहायला मिळेल. (Goa Monsoon Destinations)

सोंसोगोर ट्रेक
दुग्धसागर झऱ्याशिवाय सोंसोगोर ट्रेक हा गोव्यातील ट्रेकिंगसाठी फार प्रसिद्ध आहे. येथे आल्यानंतर शहरातील गर्दी-गोंधळापासून दूर आल्यासारखे वाटेल. हा ट्रेक जवळजवळ 15 किलोमीटरचा आहे.


आणखी वाचा :
चालत्या ट्रेनमध्ये तिकीट हरवल्यास अथवा फाटल्यास काय करावे?

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.