Home » Mamata Banerjee : GO BACK ममता !

Mamata Banerjee : GO BACK ममता !

by Team Gajawaja
0 comment
Mamata Banerjee
Share

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा उल्लेख बंगालची वाघिण म्हणून कऱण्यात येतो. 70 वर्षाच्या ममता बॅनर्जी गेली 14 वर्ष पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची कमान सांभाळून आहेत. या वर्षात त्यांच्यावर अनेकवेळा टिका करण्यात आली. पश्चिम बंगलाच्या राजकारणाला हादरे देतील, अशा घटना झाल्या. त्यातून ममता बॅनर्जी यांच्या खुर्चीला धोका असल्याचे बोलले गेले. पण ऐनवेळी ममतादीदींच्या जादुनं पश्चिम बंगालच्या नागरिकांची मनं जिंकली, आणि दीदी विजयी झाल्या. पश्चिम बंगाल असो वा भारतातील कुठल्याही राज्यात गेल्यावर होणा-या पत्रकार परिषद असो, ममता दीदी यांना पश्चिम बंगालमधील कुठल्याही वादाबाबत प्रश्न विचारला तर त्या प्रश्न विचारणा-या पत्रकारावर प्रचंड चिडतात आणि आपल्या भक्कम राजकीय स्थानाचा हवाला देतात. (Mamata Banerjee)

 

मात्र याच ममता बॅनर्जींनी लंडनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात आरसा दाखवण्यात आला. शिवाय GO BACK ममता या घोषणा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांसमोर भाषण करायला उभ्या राहिलेल्या ममता बॅनर्जी यांना लंडनमधील विद्यार्थ्यांनी नेमके बंगालमधील घोटाळ्यांचे एकापाठोपाठ एक प्रश्न विचारले. यामुळे भेदरलेल्या दीदींनी आपल्यावरही कधीकाळी हल्ला झाला होता, असे सांगून वेळ मारुन नेली. मात्र भारताची अर्थव्यवस्था ही प्रगतीपथावर आहे, तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न विचारल्यावर ममता दीदी भारतीय अर्थवस्थेची प्रगती मान्य करण्यास तयार झाल्या नाहीत. त्यांनी यावर संभ्रमीत करणारे उत्तर दिल्यावर विद्यार्थ्यांनी GO BACK ममता या घोषणा दिल्या. अर्थातच झाल्या प्रकारानं संतापलेल्या ममता दीदींनी कार्यक्रमातून निघून जाणे पसंद केले. (Latest News)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री लंडनच्या दौ-यावर आहेत. त्यांचे लंडनमध्ये साडी घालून मॉर्निंग वॉक करतानाचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. मात्र त्यापाठोपाठ आलेल्या बातमीनं लंडनच्या विद्यार्थ्यांनी दीदींचे स्वागत कसे केले, याच्या चर्चाही रंगल्या आहेत. लंडनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या केलॉग कॉलेजमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाषण ठेवण्यात आले होते. या भाषणादरम्यान, उपस्थित विद्यार्थ्यांनी दीदींवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यात बंगालमधील हिंसाचार आणि आरजी कार कॉलेजमध्ये घडलेल्या प्रकरणात राज्यसरकारची संशयास्पद भूमिका याबाबत प्रश्न विचारले. यावर नाराजी व्यक्त करत ममता बॅनर्जी यांनी हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे आणि ते केंद्र सरकारकडे असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी राजकीय व्यासपीठ तयार करु नये, असेही आवाहन केले. यानंतर पश्चिम बंगालमधील विकासाचा बातम्या सांगायला लागलेल्या दीदींना विद्यार्थ्यांनी टाटा प्रकल्पाला तुम्ही विरोध का केलात, असा प्रश्न विचारला. यामुळे ममता दीदी चिडल्या. (Mamata Banerjee)

मी फक्त सामाजिक विकास आणि एकतेचे महत्त्व अधोरेखित करणा-या प्रश्नांनाच उत्तरे देईन, असे त्यांनी सांगितले. काही विद्यार्थ्यांनी ममता यांना बंगालमधील हिंदूंना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल प्रश्न विचारला. त्यावर ममता दीदींनी मी सर्व धर्मांसाठी आहे, माझ्यासाठी हिंदू आणि मुस्लिम सर्व समान असल्याचे सांगितले. ममता दीदींचा राग वाढवण्यासाठी आणखी एक प्रश्न कारणीभूत ठरला, तो म्हणजे, भारताची प्रगती. ममता बॅनर्जी यांना भारताच्या आर्थिक प्रगतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे. भारतानं ब्रिटनला मागे टाकले आहे. भारत लवकरच पाचव्या क्रमांकावरून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. 2060 पर्यंत भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार हे निश्चित आहे, अशा प्रश्न ममता बॅनर्जी यांना विचारण्यात आला. तेव्हा मात्र ममता बॅनर्जी यांची गोची झाली. (Latest News)

=======

हे देखील वाचा : Donald Trump : महासत्ता करणार भारताचे अनुकरण !

Hiroo Onoda : युद्ध संपलं तरी तो २९ वर्ष लढत होता!

=======

कारण त्यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीबाबत कौतुक केले, तर त्यांच्या विरोधक असलेल्या भाजपाचे कौतुक केल्यासारखे झाले असते, त्यामुळे ममता दीदींनी यावर सावध प्रतिक्रीया दिली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, कोरोना विषाणूनंतर जगभरात आर्थिक अस्थिरता आहे. जोपर्यंत ही अस्थिरता कमी होत नाही तोपर्यंत याबद्दल स्पष्ट उत्तर मिळणे शक्य होणार नाही. परंतु माझा देश सर्वोतोपरयी प्रयत्न करेल, असे उत्तर त्यांनी दिल्यावर मात्र समोरच्या विद्यार्थ्यांनी GO BACK ममता अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर ममता दीदींनी कार्यक्रमातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. या सर्वादरम्यान ममता बॅनर्जी यांना निषेधाचे फलकही दाखवण्यात आले. तसेच आरजी हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरला न्याय कधी मिळणार असे प्रश्नही विचारण्यात आले. या सर्वांचे आता सोशल मिडियावर व्हायरल होत असून बंगालची वाघिण ख-या प्रश्नांना का घाबरली असा प्रश्न ममता बॅनर्जी यांना विचारण्यात येत आहे. (Mamata Banerjee)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.