हिंदू धर्मातील सर्वात मोठे महाकाव्य म्हणजे ‘महाभारत’. महाभारत हे काव्य जेवढे पांडव आणि कौरव यांच्या युद्धासाठी ओळखले जाते, त्यापेक्षा जास्त ते श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या गीता उपदेशासाठी ओळखले जाते. भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रात अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले. म्हणजेच त्यांनी युद्धभूमीवर अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील मोक्षदा एकादशी तिथीचा होता. तेव्हापासून मोक्षदा एकादशीला गीता जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. महाभारताच्या या युद्धात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जी शिकवण दिली त्याला गीता ज्ञान म्हणतात, ज्याला हिंदू धर्मात श्रीमद भगवद्गीता असेही म्हणतात. यंदा सोमवार, १ डिसेंबर रोजी गीता जयंतीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. त्याच निमित्ताने जाणून घेऊया गीतेबद्दल काही रंजक गोष्टी. (Gita Jayanti 2025)
– सुमारे सात हजार वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णानी अर्जुनाला युद्धभूमीवर गीता सांगितली. कुरुक्षेत्रावर रणांगणामधे युद्धाच्या सुरुवातीला सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून त्यामध्ये श्रीकृष्णानं अर्जुनाच्या शंकांचे निरासन केलं आहे. विविध उदाहरणं आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णानं अर्जुनाला योग आणि वेदान्त यांबद्दल मार्गदर्शन केलं व अवघ्या ४५ मिनिटामध्ये संपूर्ण गीता ऐकवली होती. (Marathi)
– ‘महाभारत’ या महाकाव्याचा एक भाग असलेल्या या ग्रंथात एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत. भारतीयांसाठी हा अतिशय पवित्र धर्मग्रंथ समजला जातो. हा ग्रंथ संस्कृत भाषेत काव्यस्वरूपात लिहिलेला आहे. या ग्रंथाची पवित्रता इतकी आहे की, न्यायदानाच्या न्यायालयात देखील कायम साक्षीदार, आरोपी यांना याच गीतेवर हात ठेवून ते खरंच बोलतील अशी शपथ घेण्याची प्रथा आहे. (Bhgwat Geeta)

– गीताई हे आचार्य विनोबा भावे यांनी केलेले गीतेचे मराठीत ओवीबद्ध भाषांतर आहे. भगवत् गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. (Top Stories)
– भगवद्गीतेत असे सांगितले गेले आहे की, गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतःचे विश्वरूप दर्शन दाखविले आणि त्याला तो देव असल्याची खात्री देखील पटवून दिली होती. श्रीकृष्णाने असे विश्वरूपदर्शन बालपणी यशोदामातेला आणि वृद्धापकाळी उत्तंक ऋषीलाही दाखविले आहे. (Todays Marathi Headline)
– गीतेला ‘योगोपनिषद’ किंवा ‘गीतोपनिषद’ ही म्हणले जाते आणि तिला उपनिषदांचा दर्जा दिला जातो. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला ‘उपनिषदांचे उपनिषद’ असेही म्हटले जाते. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला ‘मोक्षशास्त्र’ म्हणले गेले आहे. (Marathi News)
– महाभारतातल्या ‘भीष्म पर्वा’मध्ये गीतेचा अंतर्भाव आहे. महाभारतातल्या २५व्यापासून ते ४२व्या अध्यायांत संपूर्ण गीता येते. संस्कृत भाषेतल्या विविध अलंकारांचा वापर करून लिहिली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. (Top Marathi News)
– गीतेमधील तत्त्वज्ञान हे कालातीत आहे असे मानले जाते. कुठल्याही युगात त्याचे महत्त्व आपण नाकारू शकत नाही. म्हणूनच विद्वानांच्या मते आध्यात्मिकदृष्ट्या गीता कधी लिहिली गेली अथवा कधी सांगितली गेली याला फारसे महत्त्व नाही. (Latest Marathi Headline)
– भगवद्गीतेच्या प्रभावातून हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या कालखंडांत इतर विविध गीता निर्माण झाल्या. यात अष्टावक्रगीता, ईश्वरगीता, कपिलगीता, गणेशगीता, पराशरगीता, भिक्षुगीता, व्यासगीता, रामगीता, शिवगीता, सूर्यगीता, हंसगीता, यमगीताही लिहिली गेली. (top Trending News)
=========
Gita Jayanti : जाणून घ्या गीता जयंतीचे महत्त्व
=========
– गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती|
ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्तगेहिनी||
अर्धमात्रा, चिदानंदा, भवग्नी, भयनाशिनी|
वेदत्रयी, परा, अनंता, तत्त्वार्थज्ञानमंजिरी||
ही गेय स्वरूपातली गीतेची अठरा नावे नित्य घेतल्यास गीता पठणाचे पुण्य लाभते, अशी मान्यता आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
