जगातील बहुतांश लोक आपल्या विविध मान्यतांच्या कारणास्तव नेहमीच चर्चेत असतात. प्रत्येक ठिकाणच्या मान्यता या एकमेकांपेक्षा वेगळ्या असतातच आणि अन्य देशातील लोकांना त्या विचित्र वाटतात. अशीच एक मान्यता चीनमध्ये सुद्धा आहे. ज्याला भुतांचे लग्न असे म्हटले जाते. येथे लग्नाप्रमाणेच एका अविवाहित पुरुष आणि महिलेचा विवाह केला जातो. फक्त फरक ऐवढाच असतो की, तो दोघांच्या मृत्यूनंतर केला जातो. (Ghost Marriage)
ही अशी प्रथा चीन मध्ये खरोखर आहे. तर बीबीसीच्या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार चीनमध्ये घोस्ट मॅरिजचा इतिहास ३०० वर्ष जुना आहे. या लग्नामध्ये अविवाहित मृत पावलेल्या लोकांचे लग्न केले जाते. याचे कारण असे की, त्यांना विवाहाचे सुख जिवंतपणी नाही मिळाले पण मृत्यूनंतर तरी मिळावे. जेणेकरुन पुढील आयुष्य किंवा मृत्यूनंतर तो खुश असतील. लग्नात मुलाच्या कबरीत महिलेची हाडं टाकली जातात. त्यामुळे ते एकत्रित राहू शकतात.
मृतांचे लग्न लावले जाते
हे लग्न सर्वसामान्य लग्नाप्रमाणे धुमधडाक्यात होते. जेथे वराचा परिवार वधूसाठी धनाची मागणी करतात आणि हुंडा सुद्धा दिला जातो. हुंड्याच्या रुपात दागिने, नोकर आणि घर दिले जाते. हे सर्व काही एका पेपरवर लिहिले जाते. मात्र सत्यात तसे होत नाही. ही परंपरा दीर्घकाळापर्यंत चीनमधील काही हिस्स्यांमध्ये पार पाडली जात होती आणि मृत लोकांनाच येथे सहभागी करुन घेतले जायचे. बहुतांश प्रकरणी असे सुद्धा झाले होते की, मृतदेह हे चोरले गेले किंवा जीवंत महिलांना मृत्यूच्या दारात ढकलले गेले. (Ghost Marriage)
हे देखील वाचा- जगातील विचित्र गाव… जेथे लोक अचानक झोपतात
५ लाखांना विक्री केले जातात मृतदेह
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, चीनमध्ये २०१४ च्या जनगणनेने असे सांगितले की, तेथए प्रत्येक ११५.९ मुलांच्या मागे फक्त १०० मुलीच आहेत. मुल हवे म्हणून मुलींना गर्भातच मारुन टाकले जाते. आता याच कारणास्तव लोकांना घोस्ट मॅरेजसाठी मुली मिळत नाही. हेच कारण आहे की, मुलींच्या मृतदेहांना सुद्धा लोक सोडत नाहीत आणि त्यांना कबरीमधून चोरतात. रिपोर्टमध्ये असे ही सांगितले गेले की, ५ लाख रुपयांमध्ये तरुणींचा मृतदेह किंवा त्यांची हाडं विक्री केली जातात. बक्कळ कमाई करण्यासाठी तरुणींना मारुन टाकले जाते. सर्वाधिक ही प्रथा शैंगजी प्रांतात केली जाते. जेथे कोळश्याच्या खाणी आहेत आणि काही अविवाहित तरुण तेथे काम करतात. त्यांच्या मृत्यू खाणीत कोसळून पडल्याने काही वेळेस होते आणि अशातच मृत्यूनंतर आनंद मिळावा म्हणून त्यांचे लग्न मृत देहासोबत लावून दिले जाते.