Home » विमानतळावर कोणत्या शब्दांचा वापर करण्यावर बंदी? अन्यथा तुरुंगात जावे लागेल

विमानतळावर कोणत्या शब्दांचा वापर करण्यावर बंदी? अन्यथा तुरुंगात जावे लागेल

सध्याच्या काळात बहुतांशजण विमानाने प्रवास करणे पसंत करतात. पण तुम्हाला माहितेय का, विमानतळावर अशा कोणत्या शब्दांचा वापर करण्यास बंदी आहे? अन्यथा तुम्हाला तुरुंगाची शिक्षा देखील होऊ शकते. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

by Team Gajawaja
0 comment
General Knowledge
Share

General Knowledge : सध्यच्या काळात बहुतांशजणांकडे स्मार्ट फोन आणि इंटरनेटची सुविधा असते. पण काही नियमांची फारशी माहिती नसल्यास काही युजर्स विचित्र वागतात आणि यामुळे शिक्षा होते. जसे की, बहुतांशजण विमानतळावर रिल्स तयार करताना बॉम्ब, हायजॅक अशा काही शब्दांचा वापर करतात. पण तुम्हाला माहितेय असे शब्द मजा-मस्ती म्हणून वापरण्यावरही बंदी आहे. जाणून घेऊया भारतासह कोणत्या विमानतळावर असे कोणते शब्द वापरण्यावर बंदी आहे याबद्दल सविस्तर..

विमानतळावर कोणते शब्द वापरण्यावर बंदी
विमानतळावर हायजॅक, दहशतवादासंबंधित शब्द जसे की, बॉम्बस एक्सप्लोसिव्ह शब्दांचा वापर करणे कायदेशीर गुन्हा आहे. एखाद्या प्रवाशाने या शब्दांचा वापर केल्यास त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाही होऊ शकते. ऐवढेच नव्हे सुरक्षारक्षक व्यक्तीला तुरुंगातही पाठवू शकतात.

कोणत्या कलमाअंतर्गत होते कारवाई
भारतात अशी काही प्रकरणे आहेत त्याची तपासणी सुरक्षारक्षकांकडून केली जाते. त्यावेळी काही प्रवासी मजामस्ती म्हणून बॉम्ब थोडी घेऊन जातोय अथवा दहशवादासंबंधित शब्दांचा वापर करतात. याच कारणास्तव व्यक्तीच्या विरोधात कायद्यातील वेगवेगळ्या कलमांनुसार कारवाई केली जाऊ शकके. काही प्रकरणात कलम 182, 505(1)(b)आणि कलम 268 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (General Knowledge)

कोणत्या शब्दांवर आहे बंदी?
टर्कीट्या पेगासस एअरलाइन्सने फेडरल एविएशन अॅडमिनिस्ट्रेशनची एक लिस्ट तयार केली आहे. या लिस्टच्या हवाल्यानुसार आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, दहशतवादी, बॉम्ब, क्षेपणस्र, बंदूक अथवा गोळीबार अशा शब्दांवर बंदी आहे. देशानुसार शब्दांवर बंदी घालण्यात आली आहे. जसे की, अमेरिकेत 9/11 हल्ल्याच्या उल्लेख करणे मोठी समस्या निर्माण करण्यासारखे आहे. थायलँडच्या विमानतळाच्या अथॉरिटीने एप्रिल 2023 रोजी आपल्या फेसबुकच्या पेजवर इन्फोग्राफिक्स पोस्टच्या माध्यमातून कोणत्या शब्दांवर बंदी आहे याची माहिती दिली होती.


आणखी वाचा :
होर्डिंग लावण्यासाठी पाळावे लागतात ‘हे’ नियम
गाडी लॉक किंवा खिडकी बंद करणे पुरेसे नाही, या 5 पद्धतीने कार हकिंगपासून राहा दूर

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.