Home » गरबा आणि दांडियाचा आनंद ‘ही’ गाणी करतील द्विगुणित

गरबा आणि दांडियाचा आनंद ‘ही’ गाणी करतील द्विगुणित

by Jyotsna Kulkarni
0 comment
Navratri 2024
Share

नवरात्र….आदिमाया आदिशक्तीच्या जागर…देवीच्या नऊ रूपांच्या आराधनेचा काळ. या नवरात्रीमध्ये दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला आणि समाजाला त्याच्या त्रासातून मुक्त केले. या नवरात्रीच्या काळात सर्वच लोकं देवीची भक्ती करतात, तिची सेवा करतात. तिला प्रसन्न करून घेण्यासाठी विविध गोष्टींचा अवलंब करतात. या देवीच्या नवरात्रीमध्ये उपवास, पाठ यासोबतच महत्व असते ते गरबा आणि दांडिया यांना. देवीसमोर रोज सगळे गरबा आणि दांडिया खेळत नवरात्री जागवतात. याच गरबा आणि दांडियाचा उत्सव आणि आनंद द्विगुणित करण्यासाठी बॉलिवूडची ‘ही’ गाणी नक्कीच ठरतील खास.

नगाड़ा संग ढोल (राम लीला)

अभिनेत्री दीपिका पदुकोणवर चित्रित झालेले रामलीला सिनेमातील ‘नगाड़ा संग ढोल’ हे गाणे जणू गरबा अँथम बनले आहे. या गाण्यातील दीपिकाचा डान्स आणि गाण्याची एनर्जी एकदमच हाय क्लास आहे.

शुभारंभ (काय पो छे! )

काय पो छे या चित्रपटातील शुभारंभ हे अतिशय सुंदर गरबा गाणे आहे. आजही या गाण्याची लोकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.

ढोली तारो ढोल बाजे (हम दिल दे चुके सनम)

संजय लीला भन्साळी यांच्या हम दिल दे चुके सनम सिनेमातील या गाण्याला बरीच वर्ष झाली. मात्र आजही हे गाणे तोच फील, तीच एनर्जी देते. गाण्यातील सलमान आणि ऐश्वर्या यांचा गरबा डान्स आजही भाव खाऊन जातो.

चोगाडा, लव्हयात्री

असीस कौर आणि दर्शन रावल यांनी गायलेले हे फ्यूजन तुफान गाजले आहे. आयुष शर्मा आणि वारीना हुसैन यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्यात कमालीचा गरबा डान्स असून गाणे फास्ट असल्यामुळे यावर गरबा करण्याची मजा काही औरच आहे.

ढोलीडा, गंगूबाई काठियावाडी

२०२२ साली आलेल्या गंगूबाई काठियावाडी सिनेमामधील आलिया भट्टवर चित्रित झालेले हे गाणे तुफान लोकप्रिय गाणे आहे. हे गाणे देखील गरबा खेळण्याचा उत्साह नक्कीच वाढवेल.

कमरिया, मित्रो

डिजे चेतस आणि दर्शन रावल यांचे मॉडर्न गरबा गाणे तरुणाईमध्ये कमालीचे हिट आहे. या गाण्यामुळे नवरात्र उत्सवाचा साज आणि गरब्याचा उत्साह नक्कीच वाढणार आहे.

रंगतारी, लव्ह यात्री

लव्ह यात्री सिनेमातील ‘रंगतारी’ हे गाणे नवरात्रीचा एकदम परफेक्ट सॉंग आहे. देव नेगी, राजा हसन आणि रॅपर हनी सिंह यांच्या आवाजातील हे गाणे दांडिया उत्सवासाठी उत्तम आहे.

उड़ी उड़ी जाए (रईस)

रईस सिनेमातील या गाण्यात शाहरुख खान गरबा खेळताना दिसला आहे. गाणे स्लोव असले तरी गरब्याची अतिशय उत्तम आहे. या गाण्यावर गरबा आणि दांडिया अतिशय चांगल्या पद्धतीने खेळता येईल.

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.