Home » बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर गंगूबाई ‘या’ दिवशी येणार ओटीटीवर

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर गंगूबाई ‘या’ दिवशी येणार ओटीटीवर

by Team Gajawaja
0 comment
गंगूबाई काठियावाडी
Share

आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट लोकांना खुप आवडला. या चित्रपटातील आलियाच्या कामाचेही खूप कौतुक झाले होते. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट आलियाच्या कारकिर्दीतील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे.

आलिया भट्टचा हा चित्रपट आता ओटीटीवर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. थिएटरनंतर हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत नेटफ्लिक्स इंडियाकडून अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे.

Netflix ने तारीख केली जाहीर

गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट नेटफ्लिक्सने आपल्या ट्विटर हँडलवर जाहीर केली आहे. हा चित्रपट 26 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या अधिकृत ट्विटर पेजवर गंगूबाई काठियावाडीचा प्रोमो व्हिडिओ टाकला असून, हा चित्रपट आता लवकरच OTT वर पाहता येईल.

====

हे देखील वाचा: अजय देवगणने केली त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा

====

गंगूबाई काठियावाडी हा एक बायोपिक आहे ज्यामध्ये आलियाने मुख्य भूमिका साकारली आहे. रिलीजपूर्वी हा चित्रपट खूप वादात सापडला होता. या चित्रपटाबाबत गंगूबाईच्या कुटुंबीयांनी सांगितले की, गंगूबाईचे पात्र चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे.

हे प्रकरण न्यायालयात पोहोचले पण अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचे केवळ प्रेक्षकांनीच नव्हे तर सेलिब्रिटींनीही खूप कौतुक केले होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.