येत्या २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे. घरांमध्ये, सार्वजनिक पंडालमध्ये १० दिवसांसाठी श्रीगणेश विराजमान होणार आहेत. तर काही ठिकाणी दीड, पाच, सात दिवसांचा गणरायाचा मुक्काम असणार आहे. गणपती बाप्पा दरवर्षी आपल्या भेटीला येतो. त्याचा हा मुक्काम इतका खास असतो, की बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वच मंडळी तहान भूक विसरून तयारी करत असतात. गणेश उत्सव म्हणजे भक्तांच्या उत्साहाला नुसते उधाण आलेले असते. ६४ कलांचा अधिपती असणारा गणपती बाप्पा समस्त भक्तजनानांचा लाडका आहे. गणपती हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. (Ganesh Chaturthi)
१० दिवसांच्या या गणेशोत्सवात आणि इतरही दिवशी गणपतीचा जयजयकार केला जातो. गणेशोत्सवामध्ये तर गणपतीच्या जयघोषाने संपूर्ण आसमंत दुमदुमून जातो. हा जयघोष म्हणजे, ‘गणपती बाप्पा….. मोरया….’. आता सर्वत्र आपल्याला हेच ऐकायला मिळणार आहे. मात्र तुम्हाला या जयघोषांगची आख्ययिका माहित आहे का…? गणपती बाप्पासोबत ‘मोरया’च का म्हटले जाते? तसे पाहिले तर या विषयी फार कमी लोकांना कदाचित माहिती असेल. गणपती बाप्पासोबत मोरया शब्द कुठून जुळून आला यामागे ६०० वर्ष जुनी एक कथा आहे. चाल तर मग जाणून घेऊया याबद्दलची महिती. (Todays Marathi Headline)
‘मोरया’ नावामागची कथा
महाराष्ट्रातील पुणे शहरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या चिंचवड या भागातील ही कथा आहे. या गावामध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्रीगणेशाचे एक निस्सीम भक्त होते. मोरया गोसावी प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून दूर ९५ किलोमीटर अंतरावर अष्टविनायकांपैकी एक असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असत. पुढे ते याच ठिकाणी स्थायिक झाले. सतत ४२ दिवस तप करून त्यांनी गणपती बाप्पाला प्रसन्न केले होते. (Latest Marathi News)
मयुरेश्वर गणेश मंदिर हे महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे. असे सांगितले जाते की, वयाच्या तब्बल ११७व्या वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले. परंतु, पुढे वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होत नव्हते. आपल्याला देवाचे दर्शन होत नाही या विचाराने मोरया गोसावी नेहमी दुःखी राहू लागले. मग, बाप्पाला तरी आपल्या भक्ताचे दुःख कसे पाहवेल? मग, एके दिवशी गणपती बाप्पाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की, उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईन. (Top Trending News)
=========
Ganesh Chaturthi : गणपती बाप्पाला दुर्वा का वाहिल्या जातात?
Lalbaugcha Raja : ‘लालबागचा राजा’ गणपतीची सुरुवात कशी झाली?
=========
दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले. कुंडामध्ये स्नान करून पूजा करत असताना, त्यांच्या ओंजळीमध्ये श्रीगणेशाची एक छोटी मूर्ती होती. गणपती बाप्पाने स्वतः त्यांना दर्शन दिले होते. पुढे हीच मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली. काही काळानंतर मोरया गोसावी यांनी समाधी घेतली. ही समाधी देखील या मंदिराजवळच आहे. हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते. मोरया गोसावी हे बाप्पाचे निस्सीम भक्त होते, म्हणून यांचे नाव गणेशाच्या नावाआधी जोडले गेले. हे ‘मोरया’ नाव इतके पक्के जोडले गेले आहे की लोक फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया असेच म्हणतात. पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आणि पुढे देशभरात गणपती बाप्पा मोरया म्हटले जाऊ लागले. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics