सध्या गणेशोत्सवाची नुसती धूम सुरु आहे. आज गणेशोत्सवाचा तिसरा दिवस आहे. आता गणपती पाठोपाठ गौरींचे देखील आगमन होईल. त्यामुळे सर्वत्र केवळ आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. घरांसोबतच मंडळांमध्ये देखील बाप्पांचे आगमन झाले असून, सध्या सगळीकडे बाप्पाचे लाड केले जात आहे. बाप्पाची प्रत्येक मूर्ती इतकी विलोभनीय, आकर्षक आणि मोहक असते की तिच्यावरून नजर हटतच नाही. बाप्पांच्या मूर्तीचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे, बाप्पाचे दात. बाप्पांला एक मोठा आणि एक अतिशय छोटा दात आहे. याच दातांमुळे गणेशाला एकदंत नाव पडले आहे. गणेशाचे एकदंत रूप संयम, त्याग, ज्ञान आणि कर्तव्यनिष्ठा दर्शवते. दात तुटल्यानंतरही गणपतीने ज्ञानाचा प्रसार, लेखन व कर्तव्य थांबू दिले नाही, ही शिकवण भक्तांसाठी प्रेरणादायी आहे. गणेशाच्या या एकदंत नावामागे देखील काही कथा सांगितल्या जातात. एकदंत नाव पडण्यामागे चार कथा आहेत. आपण त्याच जाणून घेऊया. (Ganesh Chaturthi)
आख्यायिका – १
ब्रह्मवैवर्त पुराणात दिल्या प्रमाणे, एकदा भगवान परशुराम आपल्या भगवान शंकराला भेटण्यासाठी कैलाश पर्वतावर येतात. त्यावेळी भगवान शंकर माता पार्वतीसोबत आपल्या कक्षेत असतात. ते देवी पार्वतीला श्री रामाची कथा ऐकवत असतात. कथेमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून ते गणपतीला आज्ञा देतात की कुणालाही आत आत सोडू नको. पित्याच्या आज्ञाप्रमाणे गणेश परशुरामांना भेटण्यासाठी अडवतात भगवान परशुराम श्री गणेशास समजावण्याचा बराच प्रयत्न करतात तरी सुध्दा गणेश परशुरामांना महादेवांची भेट घेण्यास अडवतात. (Todays Marathi Headline)
तेव्हा भगवान परशुराम गणेशावर क्रोधित होतात. भगवान परशुराम आणि गणेश यांच्यात युध्द होते. यातच परशुरामांच्या परशु गणेशच्या दातावर लागतो आणि या युद्धात गणपती बाप्पाचा एक दात तुटतो. हे समजल्यावर भगवान शंकर परशुराम यांना गणपती आपला मुलगा असल्याचे सांगतात. गणेशाचा दात तुटलेला पाहून पार्वती क्रोधित होते. पार्वतीचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान परशुराम गणेशास वरदान देतात की आता श्री गणेश एकदंत नावाने ओळखले जातील. ऋषी परशुरामाने देवी पार्वतीची क्षमा मागतात आणि बाप्पाला त्यांची शक्ती, सामर्थ्य आणि ज्ञान देतात. (Top Marathi Headline)

आख्यायिका – २
गणपतीच्या तुटलेल्या दाताबद्दल आणखी एक आख्यायिका प्रचलित आहे. एकदा कार्तिकेय आपल्या कामात मग्न होता. गणपती त्यांच्या कामात वारंवार अडथळे निर्माण करत होते. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्तिकेयाने गणपतीचा एक दात तोडला. महादेवाच्या सांगण्यावरून कार्तिकेयाने गणपतीला तो दात परत केला, पण त्याचवेळी गणेशजींना हा तुटलेला दात नेहमी हातात ठेवावा लागेल असे सांगितले. (Latest Marathi News)
आख्यायिका – ३
या कथेनुसार, जेव्हा वेद व्यासांनी गणेशाला महाभारत लिहिण्यासाठी आमंत्रित केले तेव्हा गणेशजींनी त्यांच्यासमोर एक अट ठेवली. जोपर्यंत वेद व्यास बोलत राहील तोपर्यंत गणेश कथा लिहीत राहील. वेद व्यास यांचे बोलणे थांबवताच, भगवान गणेश त्याच वेळी महाभारत लिहिणे थांबवतील आणि निघून जातील. वेद व्यासांनी गणेशाचा हा मुद्दा मान्य केला. मात्र जेव्हा गणपती महाभारत लिहीत होते तेव्हा सतत त्यांची लेखणी तुटत होती. शेवटी त्यांनी त्यांचा एक दात तोडला आणि त्याने संपूर्ण महाभारत लिहिले. (Top Trending News)
========
Gauri Puja : गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त आणि या सणाचे महत्व
Ashtavinayak : अष्टविनायकांमधील तिसरा गणपती- सिद्धटेकचा सिद्धिविनायक
=========
आख्यायिका – ४
गजमुखसुर नावाच्या असुराने वरदान मिळवले होते की, तो कोणत्याही शस्त्राने मारला जाऊ शकणार नाही. यामुळे गजमुखासूर जवळजवळ अमर झाला. यामुळे तो निर्भय झाला आणि देव आणि मानवांना त्रास देऊ लागला. गणेशाचे गजमुखसुराशी युद्ध झाले. तेव्हा भगवान गणेशाने मानव आणि देवता वाचवण्यासाठी गजमुखासुराचा स्वतःच्या दाताने वध केला. यामुळे त्याला त्याचा एक दात गमवावा लागला आणि तो एकदंत झाला. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
