Home » गणपतीचे एकमेव मंदिर जेथे व्यक्तीरुपी गणेशाची होते पूजा

गणपतीचे एकमेव मंदिर जेथे व्यक्तीरुपी गणेशाची होते पूजा

सध्या गणेशोत्सवाचे दिवस सुरु आहे. सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. देशभरात गणेशोत्सावाचा सण मोठ्या दिमाखात साजरा केला जातो.

by Team Gajawaja
0 comment
Ganesh Chaturthi
Share

सध्या गणेशोत्सवाचे दिवस सुरु आहे. सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. देशभरात गणेशोत्सावाचा सण मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. खासकरून महाराष्ट्रात. सिद्धिविनायक ते देशभरातील अन्य प्रसिद्ध गणपतींच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. या सर्व मंदिरांमध्ये सोंड असलेल्या गणपतीच्या मुर्तीची पूजा केली जाते. मात्र तुम्हाला माहितेय का, देशात एकमेव असा गणपती आहे जेथे त्याची मुर्ती ही व्यक्ती रुपात आहे. (Ganesh Chaturthi)

आदिविनायक मंदिर
गणपतीची ही मुर्ती तमिळनाडू येथे आहे. या मंदिराचे नाव आदिविनायक असे आहे. येथे व्यक्तीरुपी गणपतीची पूजा केली जाते. खास गोष्ट अशी की, जगभरात अशी मुर्ती केवळ येथेच आहे. या मंदिरात मेंबप्पाच्या शरीरावर गजमुख नाही तर व्यक्तीचे मुख आहे.

मंदिराचा संबंध प्रभू रामाशीही आहे
आदि विनायक मंदिर भगवान रामाशी संबंधित आहे कारण भगवान रामाने देखील येथे भेट दिली होती. असे मानले जाते की राजा दशरथाच्या मृत्यूनंतर, भगवान राम जेव्हा पिंड दान करत होते, तेव्हा त्यांच्या तांदळाचे गोळे कीटकांमध्ये बदलत होते.

अशा परिस्थितीत जेव्हा प्रभू रामाने महादेवांना उपाय विचारला तेव्हा त्यांनी भगवान रामाला आदिविनायकाकडे जाऊन पिंडदान करण्यास सांगितले. आदिविनायक मंदिरात प्रभू रामाने पिंड दान केले तेव्हा सर्व पिंड शिवलिंगात बदलले. म्हणूनच आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे येतात.

का केली जाते पूजा
अशी मान्यता आहे की, जेव्हा शंकर गणपतीवर रागवले होते तेव्हा त्यांनी गणपतीचे शीर हे धडापासून वेगळे केले होते. त्यानंतर त्याला हत्तीचे शीर लावण्यात आले. मात्र गणपतीची त्या रुपात पूजा केली जाते. त्यामुळे मंदिराचे नाव सुद्धा आदि विनायक असे पडले आहे, कारण गणपतीच्या आधीच्या स्वरुपाची पूजा होते. (Ganesh Chaturthi)

हेही वाचा- ‘या’ बाप्पाची पूजा केली की पडतो पाऊस…

गणपतीचे हे मंदिर तमिळनाडूतील तिरुवरुर जिलह्यातील कुटनूर पासून जवळजवळ तीन किमी दूर असलेल्या तिलतर्पण पुरी नावाच्या ठिकाणी आहे. या मंदिरात तुम्ही विमानाच्या माध्यमातून सुद्धा पोहचू शकता. मंदिराच्या सर्वाधिक जवळ तिरुचिरापल्ली एअरपोर्ट आहे. त्याचे अंतर 110 किमी आहे. जर तुम्ही ट्रेनच्या माध्यमातून येथे पोहचू पाहत आहात तर तुम्हाला चेन्नईहून तिरुवरूरसाठी ट्रेन पकडावी लागेल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.