सध्या गणेशोत्सव मोठ्या जल्लोषामध्ये सुरु आहे. सगळीकडे फक्त आणि बाप्पा आणि बाप्पा आहे. आज तर बाप्पांसोबचत गौरींचे देखील आगमन होत आहे. गौरी गणपतीचा सण म्हणजे सर्वच लोकांसाठी पर्वणी असते. बाप्पा येऊन काही दिवस झाले आहे. या काळात आपण सतत बाप्पांच्या विविध गोष्टी, माहिती ऐकत आहोत, वाचत आहोत. आजवर आपण बाप्पांच्या अनेक कथा ऐकल्या असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला बाप्पांशी संबंधित एक जरा वेगळीच मात्र रंजक माहिती देणार आहोत. (Ganesh Chaturthi)
गणपती बाप्पा म्हणजे प्रथमपुज्य देवता आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात बाप्पांच्या पूजेशिवाय कधीच सुरु होत नाही आणि पूर्ण देखील होत नाही. पूजा लहान असो किंवा मोठी आधी मान बाप्पाला मिळतो. आपण जेव्हा केव्हा कोणती पूजा बघतो तेव्हा गुरुजी सर्वात आधी यजमानांना विड्याच्या पानावर एक नाणे आणि त्यावर सुपारी ठेऊन त्याची पूजा करायला सांगतात. पण ते असे का करतात याची माहिती आहे का तुम्हाला? चला जाणून घेऊया याबद्दल. (Latest Marathi News)
याचे मुख्य कारण म्हणजे सुपारीची स्थापना गणपती म्हणून केली जाते. पूजेमध्ये गणपती म्हणून सुपारीची पूजा केली जाते. मात्र सुपारीचीच पूजा गणपती म्हणून का करतात? कोणत्याही शुभकार्यात गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. गणपती म्हणून सुपारीची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा केली जाते. गणपती म्हणून सुपारीची पूजा करण्याचा उल्लेख स्मृतिग्रंथात आढळतो. या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे सुपारी हे पूर्ण फळ आहे. कुठल्याही प्रकारची पोकळी नसलेले हे फळ आहे. (Todays Marathi Headline)
भारतीय संस्कृतीत प्रत्येक पूजेदरम्यान गणपती म्हणून सुपारीची प्रतिष्ठापना करून पूजा केली जाते. कोणतीही पोकळी नसणारे सुपारी हे पूर्ण फळ आहे. प्रत्येक पूजेत गणपतीची मुर्ती ठेवता येत नसल्याने प्रत्येक पूजेत आपला लाडका बाप्पा सुपारीच्या रुपात पूजेत हजर होत असतो. याशिवाय सुपारी ही संस्कृती आणि मांगल्याचे प्रतीक आहे. विशेष म्हणजे भारतीय संस्कृतीत सुपारीला महत्त्वाचे स्थान आहे. विवाहसोहळा, गणेशोत्सव, सत्यनारायण पूजा, दिवाळी, दसरा, वास्तुशांती, गृहप्रवेश, बारसे आदी प्रत्येक शुभ कार्यात सुपारी ही ठेवली जाते. सुपारीच्या पूजेशिवाय कोणताही धार्मिक विधी पूर्णच होत नाही. (Marathi Top Headline)
कुठल्याही शुभकार्याप्रसंगी, पूजेच्या वेळी तांदळाच्या राशीवर किंवा नाण्यावर सुपारीची प्रतिष्ठापना केली जाते. त्या सुपारीला ध्यान, आवाहन, आसन अर्घ्य, पंचामृत स्नान, गंधोदक स्नान, सुमंगलस्नान, पुष्पस्नान, हिरण्यस्नान, शुद्धोदक स्नान या पद्धतीने त्या सुपारीवर उपचार करून, सुपारीची प्रतिष्ठापना केली जाते. (Latest Marathi News)
प्राचीन काळी आपले ऋषी-मुनी आपल्या साधनेने देवांचे ध्यान करून त्यांना आवाहन करायचे. त्यांच्या कठीण तपश्चर्येमुळे देव प्रकट व्हायचे आणि त्यांना दर्शन द्यायचे. मात्र, कलियुगात हे शक्य नाही. त्यामुळे आता धार्मिक ग्रंथांमध्ये दिलेल्या माहितीनुसार जर आपण कुठल्याही पूर्ण फळाची प्रतिष्ठापना केल्यास त्यात देवता वास करेल. म्हणूनच शुभ कार्यांमध्ये त्यामुळे तांदळाच्या राशीवर सोळा उपचाराने सुपारीचे पूजन केल्यास त्यामध्ये देवता वास करते, अशी मान्यता आहे. तांदूळ हे देवाचे अन्न असल्याने ते पवित्र मानले जाते. तसेच मंत्रोच्चाराने त्या देवतेला बोलावले जाते. त्या आराधनेच्या बळावर त्या पूजेत आपला लाडका बाप्पा सुपारीच्या रूपात तेथे हजेरी लावतो. (Top Trending News)
======
Ganesh Chaturthi : जाणून घ्या मानवी मुख असलेल्या अद्भुत गणेश मंदिराबद्दल
======
सुपारीचे झाड देखील कल्पवृक्षच समजले जाते. कारण या झाडाच्या प्रत्येक भागाचा वापर केला जातो. आणि सुपारीचे देखील अनेक फायदे आहेत. सुपारीमध्ये ‘ॲरेका कॅटेचिन’, ‘एपीकॅटेचीन’ ही टॅनिन द्रव्ये, गॅलिक ॲसिड, टर्पीनिऑल, ॲरेकोलाईन ही रासायनिक द्रव्य आहेत. कमी प्रमाणात सुपारी खाल्ल्यास पोटातले जंत, उलट्या कमी होतात. कफ आणि पित्त दोष देखील यामुळे नाहीसे होतात. काही आयुर्वेदिक औषधांमध्ये विशिष्ट प्रमाणात सुपारीचा उपयोग केला जातो. विड्याच्या पानाबरोबर सुपारी खाल्ल्यास तिची चव लवंगेतल्या ‘युजेनॉल’सारखी लागते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics