भाद्रपद महिना लागला की चाहूल लागते ते गणपती बाप्पांच्या आगमनाची. संपूर्ण वर्षभर सगळेच बाप्पांची आतुरतेने वाट बघत असतात. गणेशोत्सव म्हणजे मोठा उत्सव, आनंद आणि जल्लोष. सर्वत्र अतिशय प्रसन्न आणि मोहक वातावरण असते. घरोघरी आणि लहान मोठ्या सार्वजनिक पंडालमध्ये गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि पुढे दहा दिवस त्यांचा पाहुणचार केला जातो. असा हा गणेशोत्सव म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच लोकांचा आवडता सण. श्रावण लागला की, सगळीकडे गणपतीची तयारी वेग घेऊ लागते. सर्वात आधी सगळे लोकं बाप्पाची मूर्ती बुक करतात आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी ती मोठ्या आनंदाने घरी आणतात. (Marathi News)
मात्र अनेक लोकांना बाप्पाची मूर्ती घरी कशी आणावी याबद्दल जास्त माहिती नसते. त्यामुळे आज आपण आपल्या शास्त्रोक्त पद्धतीने बाप्पाची मूर्ती घरी कशी आणावी याबद्दल जाणून घेऊया. सर्वात आधी म्हणजे जेव्हा तुम्ही गणेशाची मूर्ती घ्याल तेव्हा ती मूर्ती बाप्पाच्या मूळ रूपाशी जितकी साम्य असणारी असेल, तितकी ती तुम्हाला लाभकारक असते. ऋषीमुनी आणि संत यांनी शास्त्रे लिहिली आहेत. त्यांना देवतांचा जसा साक्षात्कार झाला, तशी त्यांनी देवतांची वर्णने शास्त्रांत केली आहेत, म्हणून शास्त्रांत सांगितल्याप्रमाणे मूर्ती बनवावी. (Latest Marathi Headline)

बाप्पाची मूर्ती घरी कशी आणावी?
– शक्यतो गणेशमूर्ती आदल्या दिवशीच आणून ठेवावी.
– मूर्ती घरी आणण्यासाठी घरातील कर्त्या पुरुषाने स्वतः रात्र सदस्यांसोबत जावे.
– मूर्ती हातात घेणार्याने हिंदू वेशभूषा करावी, म्हणजे सदरा-धोतर किंवा कुर्ता-पायजमा. त्याने डोक्यावर टोपीही घालावी.
– मूर्ती आणतांना तिच्यावर रेशमी, सुती किंवा खादीचे स्वच्छ वस्त्र घालावे.
– मूर्ती घरी आणतांना मूर्तीचे मुख आणणार्याकडे आणि पाठ समोरच्या दिशेस असावी.
– मूर्ती घेतल्यानंतर घरी येते तोपर्यत श्री गणेशाचा जयजयकार आणि भावपूर्ण नामजप करावा.
– मूर्ती घरी आणल्यानंतर घराच्या उंबरठ्याबाहेर उभे राहिल्यावर घरातील सुवासिनीने मूर्ती आणणार्याच्या पायांवर दूध आणि नंतर पाणी घालावे.
– घरात प्रवेश करण्यापूर्वी मूर्तीचे मुख समोरील दिशेस करावे. यानंतर मूर्तीचे औक्षण करून ती घरात आणावी.
– सजवलेल्या पाटावर किंवा चौरंगावर थोड्या अक्षता घालून त्यावर बाप्पाची मूर्ती ठेवावी. मूर्तीवर एखादे वस्त्र किंवा रूमाल घालून ती झाकून ठेवावी.
– मूर्ती बेडरूममध्ये, गॅरेजमध्ये किंवा लॉन्ड्री एरियामध्ये, बाथरूमजवळ किंवा पायऱ्यांखाली गणेशमूर्ती ठेवू नये.
– गणपतीची मूर्ती थेट जमिनीवर ठेवू नये. देवाची मूर्ती पाट किंवा चौरंगावर लाल कापड पसरवून विराजित करावी.
– बाप्पाची मूर्ती घरी आणताना ती बसलेल्या स्थितीत असणारी मूर्ती आणणे शुभ मानले जाते. कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात सुख-समृद्धी राहते.
– गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतो. तर उंदीर हे त्याचे वाहन आहे. त्यामुळे गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करताना मूर्तीसोबत मोदक आणि उंदीर असणे आवश्यक आहे. (Top Trending News)
=========
Ganesh Chaturthi : गणपती बाप्पाला दुर्वा का वाहिल्या जातात?
=========
दरम्यान, पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील चतुर्थी तिथीची सुरुवात मंगळवार, २६ ऑगस्ट रोजी दुपारी १.५४ वाजता होणार आहे. तर बुधवार, २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३.४४ वाजता त्याची सांगता होईल. गणेश चतुर्थी उत्सवाची सुरुवात २७ ऑगस्ट रोजी होणार आहे तर शनिवार, ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीपर्यंत हा उत्सव चालेल. गणेशाची स्थापना करण्याचा सर्वात शुभ काळ म्हणजे दुपार. बुधवार, २७ ऑगस्ट रोजी मध्यान्हाच्या काळात गणपती बाप्पाच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ११.०५ ते दुपारी १.४० पर्यंत असेल. (Top Marathi Stories)
यंदा गणेश चतुर्थीचा दिवस खूप खास मानला जात आहे. कारण यावेळी गणेश चतुर्थीची सुरुवात बुधवारपासून होत आहे. जे शुभ मानले जाते. या दिवशी चार शुभ योग तयार होत आहेत. शुभ योग, शुक्ल योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग हे शुभ योग तयार होत आहे. तसेच हस्त नक्षत्र आणि चित्रा नक्षत्र देखील तयार होत आहे. (Social News)
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
