केवळ आठच दिवसांवर गणपती बाप्पांचा सण येऊन ठेपला आहे. सगळ्यांच्या तयारीला आणि कामाला वेग आला आहे. एवढ्या कमी दिवसात भरपूर काम पूर्ण करण्याचे टेन्शन सगळ्यांनाच आहे. अतिशय भक्तिपूर्व वातावरणात प्रत्येक जणं बाप्पाच्या आगमनाची तयारी करत आहे. बाजारपेठा देखील गणपती बाप्पांच्या लागणाऱ्या सामानाने गच्च भरल्या आहेत. बाजारात फिरताना अनेक सुंदर वस्तू आपले लक्ष वेधून घेतात. शिवाय बाजार बाप्पांच्या अतिशय आकर्षक आणि सुरेख मूर्ती आल्या आहेत, त्यांना न बघता कोणीच पुढे जाऊ शकत नाही. अनेक लोकं बाप्पांच्या मूर्ती बुक करण्यासाठी आता जातील, किंवा काही लोकं त्याच दिवशी, हरतालिकेच्या दिवशी बाप्पांना थेट घरीच घेऊन येतात. (Marathi)
बाजारात आपल्याला गणेशाच्या विविध रूपातील मूर्ती भुरळ घालतात. कुठे बाप्पा गाडीवर बसून गाडी चालवतात, तर कुठे बाप्पा शिक्षक बनलेले दिसतात, कुठे बाप्पाने तर एकदमच आधुनिक कपड्यांमध्ये स्टायलिश वाटतात. एकूणच काय तर काळाप्रमाणे आता गणेशच्या मुर्त्यांमध्ये देखील अनेक बदल होऊ लागले आहेत. लोकं देखील हौस म्हणून किंवा मुलांचा हट्ट म्हणून अशा मुर्त्या घेता आणि त्या स्थापित देखील करतात. मात्र खरंच अशा मुर्त्या स्थापित केल्या पाहिजे की नाही? गणेश मूर्ती घेताना आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? गणेश मूर्ती घेण्याचे कोणते नियम आपल्या धर्मात सांगितले आहेत? (Ganesh Chaturthi)
गणपती अथर्वशीर्षामधे गणेशाची मूर्ती कशी असावी याचे उत्तम वर्णन केले आहे.
एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम्। रदं च वरदं हस्तैर्विभ्राणं मूषकध्वजम्। रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्। रक्तगंधानु लिप्तांगं रक्तपुष्पै: सुपुजितम्। भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम्। (Marathi News)
अर्थात श्री गणपती अथर्वशीर्षात गणेशाचे रूप “एकदन्तं चतुर्हस्तं” म्हणजे एकदंत, चतुर्भूज, पाश आणि अंकूश धारण करणारा, एका हाती (मोडलेला) दात धारण करणारा आणि दुसर्या हाताची वरदमुद्रा असलेला, ज्याचा ध्वज मूषकचिन्हांकित आहे, असा रक्त म्हणजेच लाल वर्ण असलेला, लंबोदर अर्थात मोठे पोट आहे असा, सुपासारखे कान असलेला, रक्त-लाल वस्त्र नेसलेला, अंगाला रक्तचंदनाचा अनुलेप लावलेला आणि रक्त (लाल) पुष्पांनी पूजन केलेला. असावा. श्री गणेश हा एका हाती (मोडलेला) दात धारण करणारा आहे, असे त्याचे रूप अथर्वशीर्षात सांगितले आहे. श्री गणेश ही मुख्यत्वे ज्ञानाची (विद्येची) देवता आहे. ‘मोदक’ हे ज्ञानाचे प्रतीक आहे. या कारणामुळे श्री गणेशाच्या हातात मोडलेल्या दाताच्या स्थानी मोदक दाखवण्याची पद्धत पडली असावी. (Todays Marathi Headline)
– गणेशाची मूर्ती ही चिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून बनवलेली असावी असे आपल्या शास्त्रविधीमध्ये सांगितले आहे. गणेशाची मूर्ती कधीही प्लास्टर ऑफ पॅरिस, कागदाचा लगदा आदी गोष्टींपासून बनवलेली नसावी. मूर्ती निवडताना ती शक्यतो बसलेल्या स्वरुपातील असावी. तिच्या डोक्यावर मुकुट असावा. (Top Trending News)
– डाव्या बाजूला सोंड असलेली मूर्ती शुभ मानली जाते आणि ती घरी आणल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होतात. घरात सुख-शांती नांदण्यासाठी डाव्या सोंडेची बाप्पाची मूर्ती बसवावी, असे पुराणात म्हटले आहे. (Top Marathi Headline)
– उजव्या बाजूला सोंड असलेली गणेशमूर्ती घरी आणू नये. अशा मूर्तीची प्रतिष्ठापना घरात करू नये, असे सांगितले जाते. कारण उजव्या बाजूला सोंड ठेवून गणपतीची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत. (Latest Marathi News)
– एक ते दीड फुटांपेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी.
– मूर्ती एकदंत, चतुर्भुज, पाश आणि अंकुश धारण केलेली असावी. मूर्तीच्या एका हाती मोदक आणि दुसर्या हात वरदमुद्रेत असावा.
– मूर्ती ही पाटावर किंवा सिंहासनावर बसलेल्या स्थितीतील असावी. गणेशमूर्तीची शरीरयष्टीत बदल करणे योग्य नाही. चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये. (Top Stories)
– गणेशाची मूर्ती सुबक, प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेले असेल अशी घ्यावी. मूर्ती भंगलेली, रंग उडालेली नसावी. कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही. शिव-पार्वतीसोबत बसलेल्या गणपतीची मूर्ती निषिद्ध आहे. (Social News)
==============
हे देखील वाचा : Lord Shiva : महादेवाचे वाहन असणाऱ्या नंदीबद्दल रंजक माहिती
Haritalika Vrat : जाणून घ्या हरितालिका व्रताचा मुहूर्त आणि पूजा विधी
Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि शुभ वेळ
===============
गणेश मूर्तीशी संबंधित वास्तू टिप्स
– वास्तुशास्त्रानुसार, हिरवी गणेशमूर्ती उत्तर दिशेला बसवल्यास पैशासंबंधीच्या समस्या दूर होतात.
– वास्तूनुसार, मानसिक तणाव आणि रोग दोषांपासून मुक्ती पाहिजे असल्यास काळ्या रंगाची गणेशमूर्ती उत्तर- पूर्व दिशेला ठेवली पाहिजे.
– जीवनात सुख, शांती आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी पांढऱ्या रंगाची गणेशमूर्ती घरी आणावी. या रंगाचा गणपती उत्तर-पश्चिम दिशेला ठेवावा.
– वास्तूशास्त्रानुसार, घरात गणपतीच्या जास्त मूर्ती ठेवू नयेत.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. आम्ही त्याची हमी देत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics