आज गणेश चतुर्थीचा सातवा दिवस आहे. आज गौरींचे विसर्जन होणार आहे. बोलता बोलता गणपती बाप्पा येऊन सहा दिवस झाले देखील. आता बाप्पांचा एवढा मोठा उत्सव म्हटल्यावर अष्टविनायक यात्रेबद्दल चर्चा होणार नाही असे नाही. या गणेशोत्सवादरम्यान अष्टविनायक यात्रा करण्याला मोठे महत्व आहे. याच यात्रेतील सातवा गणपती म्हणजे महड येथील वरदविनायक. नवसाला पावणारा गणपती अशी वरदविनायक गणपतीची ख्याती आहे. बाप्पांच्या मंदिरातून कोणीही रिकाम्या हाताने, नाराज चेहऱ्याने माघारी परतत नाही. असे या गणपतीबद्दल बोलले जाते. या गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते. (Ashtavinayak)
श्री वरदविनायक मंदिर हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महाड गावात वसलेले आहे. पुरातन काळात महडचे नांव मणिपूर वा मणिभद्र होते. पुणे – मुंबई महामार्गापासून सुमारे ३ किलोमीटर दूर खोपोलीजवळ आणि पुण्याहून ८० किमी अंतरावर हे मंदिर वसलेले आहे. हा गणपती “वरदविनायक” (इच्छापूर्ती करणारा) म्हणून ओळखला जातो. या मंदिरातील गणपतीची मूर्ती स्वयंभू स्वतः प्रगट झालेली आहे आणि मंदिराला मठ असेही संबोधले जाते. गाणपत्य संप्रदायाचे आद्य प्रवर्तक व ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्रद्रष्ट्ये तसेच ‘गणानां त्वा’या मंत्राचे प्रवर्तक ऋषी गृत्समद यांनी श्री वरद विनायकाची येथे स्थापना केली. (Ganesh Chaturthi)
वरदविनायक मंदिराचा जिर्णोद्धार झाला असला तरी या मंदिराचा गाभारा पेशवेकालीन आहे. या वरदविनायक मंदिराचे बंधाम हे हेमांडपंथी आहे. गणपती येथे वरदविनायक अर्थात समृद्धी आणि यश देणाऱ्या रूपात वास्तव्यास असे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावात १६९० साली सापडली. १७२५ साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले आणि महाड गाव वसवले. (Marathi News)
========
Ovsa : कोकणात साजरा होणारा ओवसा म्हणजे काय?
========
वरदविनायकाचे मंदिर अतिशय साधे आणि कौलारू आहे. ८ फूट बाय ८ फूट असलेल्या मंदिराला २५ फूट उंचीचा घुमट आणि सोनेरी कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. तसेच मंदिराच्या चारही बाजूंना चार हत्तींच्या मूर्ती कोरलेल्या आहे. या मंदिरात दोन मूर्ती असून डाव्या सोंडेची मूर्ती शेंदूरने माखलेली तर उजव्या सोंडेची शुभ्र संगमरवरी मूर्ती आहे. १६९० मध्ये धोंडू पौडकर यांना तलावात सापडलेली मूर्ती गाभाऱ्याबाहेर ठेवली आहे, तर नवीन मूर्ती गाभाऱ्यात आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा प्रज्वलित असतो, असे म्हणतात की हा दिवा १८९२ पासून पेटता आहे. मंदिराच्या उत्तरेला गौमुख आहे, जिथून पवित्र तीर्थ प्रवाहित होत असते. पश्चिमेला पवित्र तलाव आहे. भक्तांना वरदविनायक गणपतीच्या मूर्तीला स्पर्श करून स्वतः पूजा आणि अभिषेक करण्याची परवानगी आहे. ही इतर मंदिरांपेक्षा अनोखी परंपरा आहे. तसेच मंदिरात रिद्धी-सिद्धी, मुषिका, नवग्रह आणि शिवलिंग यांच्या मूर्तीही आहे. (Todays Marathi Headline)
वरदविनायक मंदिराची आख्यायिका
फार प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला. त्याला मूलबाळ नसल्याने तो दुःखी होता. तेव्हा तो आपल्या राणीसह अरण्यात गेला. त्याचे दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला. मग राजाने उग्र तपश्चर्या सुरु केली. त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला. ”तुलालवकरचपुत्रप्राप्ती होईल” असा त्याने राजाला वर दिला.काही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला. त्याचे नाव रुक्मांगद. रुक्मांगद मोठा झाल्यावर राजाने सारा राज्यकारभार त्याच्यावर सोपविला व त्यालाही एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले.एकदा रुक्मांगद शिकारीसाठी वनात भटकत असता तो वाचक्नवी ऋषींच्या आश्रमात गेला. (Top Marathi News)
त्या ऋषीच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा. रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्यावर अनुरुक्त झाली, पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही. त्यामुळे कामविव्हल झालेल्या मुकुंदेने ‘तू कुष्ठरोगी होशील’ असा रुक्मांगदाला शाप दिला. शाप मिळता क्षणीच सुवर्णाप्रमाणे कांती असलेले रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले. त्यामुळे दुःखी झालेला रुक्मांगद अरण्यात भटकत असता त्याला नारदमुनी भेटले. त्यांच्या आदेशानुसार रुक्मांगदाने कदंब नगरातील कदंब तीर्थात स्नान केले व तेथील चिंतामणी गणेशाची आराधना केली. त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला. (Latest Marathi News)
इकडे त्या मुकुंदेची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदाचे रूप घेतले व मुकुंदेची इच्छा पूर्ण केली. त्याच्यापासून मुकुंदेला पुत्र झाला. त्याचे नव गृत्समद. हाच तो ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्रदृष्टा व द्वितीय मंडळाचा करता. गृत्समदाच्या जन्माची कथा सर्वांना माहित झाली होती. त्यामुळे त्याचा पदोपदी पाणउतारा होऊ लागला. मातेच्या पापाचरणामुळे सर्वजण गृत्समदाला हीन लेखू लागले. तेव्हा गृत्समदाने आईकडून सत्य जाणून घेतले व तिला शाप दिला. मग तो पापक्षालनार्थ पुष्पक (भद्रक) वनात तप करू लागला. त्याने विनायकाची आराधना केली. त्यामुळे विनायक प्रसन्न झाला. विनायकाने त्याला वर मागण्यास सांगितले. (Top Trending News)
=========
Ashtavinayak : अष्टविनायकातील सहावा गणपती – लेण्याद्रीचा गिरिजात्मक
=========
तेव्हा तो म्हणाला, ”तू याच वनात वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण कर.” विनायकाने ते मान्य केले व त्या वनात राहू लागला. ते पुष्पक किंवा भद्रक वन म्हणजेच आजचे महाड क्षेत्र. या ठिकाणी गृत्समदाला वर मिळाला म्हणून येथील विनायकाला ‘वरद विनायक’ म्हणतात. गृत्समद हा गाणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक समजला जातो. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics