तिबेटीयांचे सर्वोच्च धर्मगुरु दलाई लामा यांना नुकत्याच गांधी मंडेला पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशातील मॅक्लॉडगंजचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथन अर्लेकर यांनी दलाई लामा यांना हा शांति पुरस्कार दिला. यावेळी दलाई लामा यांनी असे म्हटले की, ते दया, एकता आणि अहिंसेवर जोर देतात. करुणा आणि दया व्यक्तीला शक्ति देते. आजचा काळ असो किंवा प्राचीन काळ मनाची शांति ही नेहमीच महत्वपूर्ण राहिली आहे.(Gandhi Mandela Awards)
हा पुरस्कार गांधी मंडेला फाउंडेशन नावाच्या NGO कडून दिला जातो. ही संघटना स्वातंत्रता आणि मानवाधिकारांना प्रोत्साहन देते. तर जाणून घेऊयात हा पुरस्कार का दिला जातो आणि यामध्ये कोणत्या ज्युरी मेंबर्सचा समावेश आहे.
गांधी मंडेला पुरस्कार काय आहे?
गांधी मंडेला फाउंडेशन यांनी महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांची विरासत पुढे नेणाऱ्यांना सन्मानित करण्यासाठी राष्ट्रपिता गांधी यांच्या १५० व्या जयंतीपासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. या पुरस्काराचे लक्ष्य हे महात्मा गांधी आणि दक्षिण अफ्रिकेतील पहिले अश्वेत राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांच्या अहिंसावादी विचारांना प्रोत्साहन देणे आहे. हा एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
गांधी मंडेला फाउंडेशन यांचे मुख्याल नवी दिल्लीत आहे. जगभरात या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर अमेरिका, अफ्रिका, रशिया, लंडन, स्विर्त्झलँन्ड, चीन, नेपाळ आणि बांग्लादेशात याचे कार्यालय सुद्धा आहे. या संघटनेचे अध्यक्ष भारताचे हिंदू आधात्मिक नेता स्वामी अवधेशानंद गिरी जी महाराज आणि संरक्षक स्वामी राम देव आहेत. ज्युरीसह तीन देशाचे माजी मु्ख्य न्यायाधीशांचा समावेश आहे.
कोणाला दिला जातो हा पुरस्कार?
हा पुरस्कार अशा व्यक्तीला दिला जातो जो महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेल यांच्या विचारांची विरासत पुढे नेतात. या व्यतिरिक्त ते शांति, सामाजिक कार्य, कल्चर, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, खेळ आणि इनोवेशन क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. याआधी सुद्धा काही लोकांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यामध्ये नेपाळचे पंतप्रधान केपी ओली, बांग्लादेशाचे पहिले राष्ट्रापती दिवंगत शेख मुजीबुर्रहमान, भारताचे माजी उप-पतंप्रधानमंत्री लाल कृष्ण अडवाणी यांचा समावेश आहे.(Gandhi Mandela Awards)
नोबेलचा शांति पुरस्कार सुद्धा मिळाला आहे दलाई लामांना
ही पहिलीच वेळ नाही की जेव्हा दलाई लामा यांना शांति पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यापूर्वी १९८९ मध्ये त्यांना नोबेल शांति पुरस्कार दिला गेला आहे. नोबेल शिंती पुरस्काराच्या अधिकृत वेबसाइटनुसार, दलाई लामा यांनी जो शांतिचा विचार धारण केला आहे तो मानव जाति आणि प्रकृतिला जवळ आणतो.
हे देखील वाचा- आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेती भारतातील पहिली लेखिका – गीतांजलि श्री
कोण होतात लामा?
तिबेटीयन धर्मगुरु आणि बौद्ध साधुंना लामा असे म्हटले जाते. तिबेटीन भाषेत लामा याला ब्ला मा असे म्हटले जाते. त्याचा अर्थ असा होतो की, महान व्यक्ती. तर दुसऱ्या धर्मांप्रमाणेच लोकांना ते सुद्धा मार्गदर्शन करतात. खरंतर बौद्ध भिक्षुकांना लामा असे म्हटले जाते. मात्र सर्वाधिक वरील स्थान दलाई लामा यांचेच असते.