Home » Mills to Mafia : म्हणून गिरणी कामगारांच्या मुलांनी अंडरवर्ल्डचा रस्ता धरला!

Mills to Mafia : म्हणून गिरणी कामगारांच्या मुलांनी अंडरवर्ल्डचा रस्ता धरला!

by Team Gajawaja
0 comment
Mills to Mafia
Share

मुळशी पॅटर्न आपल्या सगळ्यांनीच पाहिला असेल. बिल्डरांनी जमिनी खाल्ल्यानंतर राहुल्या शेतकरी राहत नाही, शेती वगैरे सोडून तो थेट गुन्हेगारी विश्वात घुसतो…भाई बनतो… सुपाऱ्या घेतो, बक्कळ पैसा कमावतो आणि आपल्याच कर्मांमुळे तो मारतो हा भाग वेगळा. पण असंच काहीसं मुंबईच्या बाबतीत घडलं होतं. आजच्या पिढीला गिरणी आणि गिरणी कामगार ही गोष्टच माहित नसावी… आपल्याच आजा-पंज्यांनी एकेकाळी या गिरण्यांमध्ये काम केलं होतं. पण नंतर काही कारणांमुळे या गिरण्या बंद पडल्या, लाखो लोकं बेघर, बेरोजगार झाली. त्याचंवेळी गिरणी कामगारांनी ऐतिहासिक संप पुकारला होता. पण याच वेळी काहींनी अंडरवर्ल्डचा रस्ता धरला. म्हणायला गेलं तर कामगार क्षेत्रातच अंडरवर्ल्ड घुसलं होतं. पण नंतर हे गुन्हेगारी विश्व, गँगवॉर संपल. ९ जुलै २०२५ ला भारतभरातल्या कामगारांनी काही मागण्यांसह संप पुकारला आणि पुन्हा एकदा हा गिरणी, कामगार, संप, बेरोजगारी हा विषय समोर आला. आज याच गिरणी कामगार, अंडरवर्ल्ड या विषयाबद्दल जाणून घेऊ.(Mills to Mafia)

मुंबईत पहिली गिरणी ताडदेवला उभी राहिली. १८५३ ला त्याच्यानंतर मोठमोठ्या गिरण्या उभं राहायला सुरुवात झाली. रोजगार आला. लाखो माणस कामगार म्हणून रुजू झाली. कामासोबतच एक समाजव्यवस्था इथे उभी राहिली. पहिली गिरणी उभी राहिल्यानंतर पुढच्या १०० वर्षात एकट्या मुंबईत ८ हजारांच्या वर FACTORY होत्या. १९८० पर्यंत हीच संख्या १६ हजारांवर पोहोचली. १९८२ चा जो ऐतिहासिक संप झाला. तेव्हा १० लाख कामगार Active होते. पण जशी नवीन टेक्नोलॉजी येत गेली, तसं कापड उद्योगसुद्धा पॉवरलूमच्या अंडर गेलं. तसं पाहायला गेलं तर… एकीकडे उंच उंच बिल्डिंगी उभ्या राहत होत्या, तर दुसरीकडे चाळींच साम्राज्य होतं. या चाळींमध्ये हा गिरणी कामगार राहायचा. काम असलं तर ती कुटुंब पोसता येईल इतक्या पगाराचं नव्हतं. त्यावेळी काम करणारा एक आणि खाणारी तोंड अनेक अशी परिस्थिती होती. एका माणसावर अख्ख कुटुंब होतं. त्यामुळे कामगारांनी पगारवाढ हा मुद्दा पुढे करून संपाची मागणी केली. दुसरीकडे पॉवरलूमचं टेन्शन ! १९५० साली जे पगाराचं STANDARD होतं, तेच १९८२ पर्यंत सुरु होत, म्हणून कामगार कंटाळले होते.(Top Stories)

शिवसेना त्यावेळी १५-२० वर्षांची पार्टी होती… त्यात बाळासाहेबांनी महाराष्ट्रात आणि खास करून मुंबईत आपलं वजन वाढवलं होतं. त्यामुळे बाळासाहेबांनी कामगारांच्या मागण्यासाठी पुढाकार घ्यावा, लीड करावं, अशी कामगारांची इच्छा होती. १९८१ साली फक्त एक दिवस संप पुकारला गेला, तेव्हा बाळासाहेबांनी घोषणा केली की, कामगारांना २०० रुपये इतकी पगारवाढ केली नाही, तर गिरण्या बंद होतील. कामगारांना यावेळी पगारवाढीचं काम होईल, असच वाटलं होतं. पण बाळासाहेबांनी त्यावेळचे मुख्यमंत्री ए आर अंतुले यांच्यासोबत काहीतरी चर्चा करून मी हा संप करणार नाही, असं जाहीर केलं. कामगारांची प्रचंड निराशा झाली. आता नेतृत्व कुणाला द्यायचं, याचा विचार ते करत होते आणि यामध्ये एन्ट्री झाली कामगार नेते डॉक्टरसाहेब दत्ता सामंत यांची ! (Mills to Mafia)

१७ जानेवारी १९८२ ला दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात ऐतिहासिक संप पुकारण्यात आला. हा लढा शिस्तीने सुरु होता. २ लाख कामगार रस्त्यावर उतरले होते. २ महिने हा संप चालून होता. पण निर्णय होत नसल्यामुळे संप चिघळत गेला. कामगारांचा गोंधळ उडाला होता. संपांचा काहीच तोडगा लागला नाही. चर्चेच्या फेऱ्या झाल्या. इतकच काय तर दत्ता सामंत थेट दिल्लीला इंदिरा गांधीची भेट घ्यायला गेले होते, मात्र गांधींनी भेट टाळली. संपाचा काहीच तोडगा निघाला नाही, राजकारणसुद्धा मध्ये आलं. जवळपास दीड वर्षानंतर संप विखुरला गेला आणि लाखो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे अनेक कामगार आपापल्या गावाला निघून गेले, ते परत आलेच नाहीत. काहींनी आपले दागदागिने, घरं, जमिनी सगळ काही विकलं. (Top Stories)

कुटुंब पोसायला काहींनी बिजनेस सुरु केला. पण बिजनेस सगळ्यांचाच तत्वात बसण्यासारखं नव्हतं. हा तोच काळ होता, जेव्हा मुंबईवर अंडरवर्ल्डचं राज्य होतं. आता जे बेरोजगार होते, त्यांना पैसा कमावण्यासाठी काहीतरी हाताला हवंच होतं, त्यामुळे गिरणीत काम करणाऱ्या काही तरुणांनी आणि यासोबतच अनेक कामगारांच्या मुलांनी आता गुन्हेगारीशीच हात मिळवायचा असं ठरवलं. थेटरबाहेर तिकीट black करण्यापासून ते वेगवेगळे दोन नंबरचे धंदे ते करू लागले. यातली काही मोठी नावं म्हणजे अरुण गवळी, अमर नाईक, रमा नाईक,अश्विन नाईक, बाबू रेशीम ! या सर्वांचं BACKGROND गिरणी कामगार family चच… अरुण गवळी स्वत: गिरणीमध्ये काम करायचा. गिरण्या बंद पडल्या आणि ही लोकं अंडरवर्ल्डमध्ये आली. (Mills to Mafia)

मग पुढे मटका, सुपाऱ्या, मर्डर, स्मगलिंग वगैरे वगैरे… रमा नाईक, बाबू रेशीम आणि अरुण गवळी यांनी एक GANG पण बनवली होती… BRA GANG ! जी भायखळा, परेल भागात active होती. पण रमा आणि बाबू यांचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. अरुण गवळीने आपलं बस्तान दगडी चाळीत बसवलं आणि त्याने ही काम सुरूच ठेवली. अरुण गवळी हा कमलाकर जामसंडेकर यांच्या मर्डर केसमध्ये जेलात होता. सध्या बेलवर बाहेर आहे. रमा नाईकनेही अंडरवर्ल्डमध्ये मोठ नाव केलं. पण १९९५ साली विजय साळसकर यांनी त्याचा एन्काऊंटर केला. (Top Stories)

आता जेव्हा मी गिरणी कामगारांच्या संपाचा विषय सांगत होतो, तेव्हा दत्ता सामंत हे नाव घेतलं. गिरण्या बंद होऊन १६ वर्ष झाली होती. १६ जानेवारी १९९७ ला दत्ता सामंत आपल्या पवईतल्या घरातून संघटनेच्या ऑफिसला निघाले होते. ते आपल्या टाटा सुमो गाडीत बसले… तेवढ्यात काही अज्ञात माणस तिथे आली आणि त्यांनी दत्ता सामंत यांच्यावर १७ गोळ्या झाडल्या. त्यांच्या डोक्यात छातीत आणि पोटावर या गोळ्या लागल्या आणि कामगारांचा नेता गेला. ते कामगारांसाठी ते झटत होते आणि त्यांचा जीव अंडरवर्ल्डमुळे गेला. त्यांच्या मर्डरची planning छोटा राजनने केली होती, ज्याचं खरं नाव राजेंद्र निकाळजे ! (Mills to Mafia)

बेरोजगारी माणसाला कुठल्या थराला नेते याचं हे उदाहरण अजून एक गोष्ट सांगू, मिल बंद पडल्या, अंडरवर्ल्ड संपुष्टात आलं, १९८२ साली घोषित झालेला तो ऐतिहासिक संप अजूनही मागे घेण्याची कसलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.